Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) रमजान महिन्यांमध्ये पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नगरपालिकेने नळांना पाणी न सोडल्यामुळे जनतेचे खूपच हाल झाले . त्यामुळे नागरिकांना शनिवारी कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले .
 याबाबतअधिक माहिती घेतली असता नगरपालिकेतर्फे दर शनिवारी कोरडा शनिवार पाळला जातो . परंतु सध्या मुबलक पाणी असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तो पाळला गेलेला नाही . सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे 25 मे पर्यंत शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा केला जाईल असे नगरपालिकेने जाहीर केले होते .
त्यामुळे नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला धन्यवाद दिले . मात्र शुक्रवारी सायंकाळी शहराच्या काही भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला . चार-पाच तास वीज गायब असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला . त्यातच रात्री अकरा वाजता नगरपालिके मार्फत सोशल मीडिया वर मेसेज टाकून शनिवारी सकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले . वास्तविक पाहता थोडा उशिरा पाणीपुरवठा केला असता तरी लोकांना पाणी मिळाले असते . कारण रात्री अकरा पासून वीज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरायला भरपूर वेळ होता . सध्या रमजान महिना चालू असल्यामुळे मुस्लिम बांधवांना दररोज पाच वेळा वजू साठी पाण्याचा वापर करावा लागतो . शनिवारी पाणी येणार नाही याची कोणतीही पूर्व कल्पना नसल्यामुळे लोकांनी भरपूर पाणी वापरले . परंतु रात्री अकरा वाजता जेव्हा नगरपालिकेने सकाळी पाणीपुरवठा होणार नाही असे जाहीर केले तेव्हा मात्र लोकांनी संताप व्यक्त केला . शहरातील पाण्याचे दोन्ही तलाव भरलेले आहेत . भंडारदारा धरणातही मुबलक पाणी आहे . म्हणजे सध्या उन्हाळा असूनही पाण्याची कुठेच टंचाई नाही . प्रवरा कालवा सुद्धा पाण्याने तुडुंब वाहत आहे .असे असताना रमजान महिन्याच्या पवित्र काळामध्ये पाण्याअभावी लोकांचे हाल केल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . वार्ड नंबर 2 मध्ये सात-आठ नगरसेवक राहतात . परंतु त्यांनी सुद्धा याबाबत कोणतीही नोंद न घेतल्याने जनतेने या नगरसेवकांबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे .नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली . नगरपालिकेने आधी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी नियमित पाणीपुरवठा करावा किंवा शनिवारचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी बंद ठेवावा . जनतेच्या भावनेशी खेळू नये . अशी संतप्त प्रतिक्रिया वार्ड नंबर 2 मधील महिला भगिनींनी व्यक्त केली .
 नगरसेवक ताराचंद रणदिवे यांची तत्परता
सकाळी 11:00 वाजता देखील नळांना पाणी न आल्यामुळे गुलशन चौक परिसरातील नागरिकांनी या भागाचे कर्तव्यदक्ष व जागरूक नगरसेवक ताराचंद रणदिवे यांना पाणी न आल्याबाबत विचारणा करून घरात पाणी नसल्याचे सांगितले . त्यांनी तातडीने नगरपालिकेचा टॅंकर पाठवून या परिसरातील लोकांना पाणी उपलब्ध करून दिले.याबद्दल या भागातील जनतेने त्यांना धन्यवाद दिले.

शिर्डी राजेंद्र गडकरी -राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे तीन दिवस संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय गाव पातळीवर व ग्रामपंचायती मार्फत घेण्यात आला आहे, नागरिकांनी तीन दिवस भाजीपाला, किराणादुकाने सर्व बंद राहणार असल्यामुळे घराबाहेर पडू नये ,असे आवाहन करण्यात आले आहे,
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक हे गाव नगर-मनमाड महामार्गालगत असल्याने व येथे शिर्डी जवळ असल्याने व सावळीविहीर हे आसपासच्या सर्व गावांचे बाजारपेठेचे केंद्र असल्याने येथे लॉकडाउन काळात सुद्धा कोण येते कोण जाते हे लवकर कळत नाही, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तेथेही शिर्डी व परिसरातून लोक आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी करत होते, त्याप्रमाणे येथे दररोज भाजीपाला विक्री दुकाने सुरू होती, अनेकांनी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रीचे दुकाने थाटली आहेत, मात्र लॉकडाउनचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, त्यामुळे या भाजीपाला विक्री केंद्रांवर मोठी गर्दी होत होती, त्याचप्रमाणे किराणा दुकानात ही कोणतेही लॉक डाऊन चे नियम पाळले जात नव्हते ,सोशल डिस्टंन्स ,मास्क याचा वापर होत नव्हता, सावळी विहीरबुद्रुक मध्ये येणारे जाणारे कळत नव्हते, यामुळे कोरोणाची भीती जास्त|  असल्यामुळे सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ यांनी आज सकाळी एकमुखी निर्णय घेत सावळीविहीर बुद्रुक गाव तीन दिवसासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे, हा निर्णय घेताच गावातील सर्व दुकानदारांना तसा संदेश देऊन दुकाने बंद करण्यात आली, मेडिकल व दवाखाना सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत, कोणीही घराबाहेर पडू नये ,लॉक डाउनचे  नियम पाळावेत, सोशल डिस्टंन्स व मास्क वापरावेत, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, तरी सर्वांनी घरात रहा सुरक्षित रहा ,असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे, उपसरपंच वृषाली ओमेश जपे ,ग्रामसेवक रावसाहेब खर्डे, कामगार तलाठी गायके व ग्रामस्थांनी केले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-   कोरोनो मुळे  लांबणीवर पडलेला विवाह सोहळा काही मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत घरातच संपन्न झाला वधु वर यांनी सोशल डिस्टनचे नियम पाळत एकमेकाना आयुष्यभर सांथ देण्याची शपथ घेतली                  बेलापूर येथील रहीवासी रामेश प्रभाकर जगदाळे यांची मुलगी मयुरी हीचा विवाह निमगाव कोर्हाळे तालुका राहाता येथील पोपट दामोधर साळवे हाल्ली राहाणार चांदेगाव तालुका राहुरी यांचेशी ठराला होता विवाहाच्या पत्रीका देखील छापुन झाल्या होत्या पत्रीका वाटणार तोच कोरोनाचे संकट आले अन विवाह स्थगीत करावा लागला कोरोनामुळे लाँक डाऊन वाढतच चालल्यामुळे अखेर दोन्ही कुटुंबानी विवाह करण्याचे ठरविले विवाह करीता कशी  परवानगी मिळेल याची माहीती घेतली अन सोशल डिस्टनचा नियम पाळून मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे दोन्ही कुटुंबांना सुचविण्यात आले त्या प्रामाणे दोन्ही कुटुंबानी एका घरातच हा विवाह सोहळा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला .मुला मुलीचे आई वडील व इतर असे एकूण दहा जणांच्या उपस्थितीत   विवाह सोहळा संपन्न झाला  वधु वरांना  शुभाशिर्वाद देण्यासाठी मुला मुलीचे आई वडील दोन्ही मामा तसेच बाजार  समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई विजय शेलार किरण शेलार सुहास शेलार आदि  उपस्थित होते.

तालुका पोलिस  स्टेशन गुन्हा दाखल नातेवाईकांचा जमाव
माळवाडगांव -सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून झालेला वाद विकोपाला जाऊन सासर्‍याने मित्रांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा काटा काढला. लोखंडी पाईप व तलवारीने वार करून जावयास ठार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शेतीमहामंडळ हद्दीवरील पारधी वस्तीवर पहाटे घडली. मयुर आकाश काळे (वय 28, रा. मूळ कर्जत, हल्ली मु. मुठेवाडगाव) असे मृत जावयाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडिलांच्या निधनानंतर मुलीने पतीला माहेरी आणून येथे राहणे पसंत केले. त्यामुळे मुळचा कर्जत येथील मयुर काळे हा आपल्या पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर मुलीच्या आईने तेथीलच सचिन काळे याच्यासोबत दुसरा विवाह करून घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने पती सचिन काळे याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले.काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास सचिन काळे (रा. मुठेवाडगाव), संदीप काळे, सुरज काळे (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) व बुंदी भोसले (रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे मयुर याच्या घरी गेले. तेथे त्यांनी मयुर व त्याची पत्नी मोनिका (वय 23) यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. ते सर्व दारूच्या नशेत होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिन याने लोखंडी पाईप, तलवार, दांडा व दगडाने मयुरला मारहाण केली. त्यात मयुरचा मृत्यू झाला. यावेळी त्यांनी मोनिकालाही मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. मयुरचा भाऊ तैमुर काळे वाद सोडविण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यांचे घर पेटवून दिले.सकाळी या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट दिली. तालुका पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे, सुरज काळे व बुंदी भोसले यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला.घटनेनंतर चारही आरोपी पसार झाले होते. परंतु पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पो. कॉ.एन. आर. बर्डे, ई. डी. पवार यांच्या पथकाने तातडीने त्यांचा शोध घेऊन सचिन, सुरज व बुंदी या तिघांना सकाळी अटक केली असून संदीप हा पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मयताची पत्नी मोनिका मयूर काळे (वय 23) हिच्या फिर्यादीवरून गु.र.नं.152/2020 भादंवि कलम 302, 324, 436, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मसुद खान करत आहेत.

शिर्डी (राजेंद्र गडकरी) राज्यपातळीवर  नुकत्याच घेण्यात आलेल्या डॉक्टर सी व्ही रामन  बालवैज्ञानिक परीक्षेत  शारदा विद्या मंदिर राहाता शाळेचा इयत्ता 8 विचा विद्यार्थी चि अखिलेश दत्तात्रय गायकवाड हा महाराष्ट्र राज्यात 5वा व अहमदनगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर पास झाला आहे, त्याला या परीक्षेत 150 पैकी 130 गुण मिळाले आहे ,मागील वर्षी देखील अखिलेश हा ह्या परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आला होता, अहमदनगर येथील जनसेवा प्रतिष्ठान तर्फे डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा राज्यपातळीवर  दरवर्षी घेण्यात येते यावर्षी येथे घेण्यात आली होती अशा या  राज्य पातळीवरील स्पर्धेत  चिरंजीव अखिलेश गायकवाड हा जिल्ह्यात यावर्षीही दुसरा आला आहे,
मागीलवेळी   या परीक्षेचे प्रमुख  अरुण तुपविहिरेसर यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे नामांकित शास्त्रज्ञ बोलवून खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता व चिरंजीव आखिलेशचे कौतुक व अभिनंदन केले होते,
य परीक्षेत सायन्स कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन विविध उपकरणे व प्रयोग बनवून घेतात व भावी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो,
ही परीक्षा कठिण व अधिक खडतर  असते,
अखिलेश गायकवाड हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता गायकवाड व प्राथमिक शिक्षिका वैशाली गायकवाड(बेहेळे) यांचा मुलगा असून त्याचे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण जि प शाळा एकरूखे, ता ,राहाता येथे झाले आहे, ग्रामीण भागातील  विद्यार्थी  आपल्या परिश्रम व अभ्यासातून  असा पुढे जाऊ शकतो, हे अखिलेश ने या परीक्षेद्वारे दाखवून दिले आहे ,या त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व विभाग अधिकारी, पदाधिकारी ,पत्रकार, मित्रमंडळी यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे, व जिल्ह्यातून त्याचे मोठे कौतुक होत आहे.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव  दुकानदार व त्यांचे मदतनीस  यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर  मेडिकल चेकअप करून त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणीआँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री व पुरवठा मंत्री यांच्याकडे केली असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे.या बाबत माहीती देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी सांगितले  फेडरेशन च्या वतीने  वेळोवेळी स्व स्त धान्य दुकानदार व त्यांचे कामगार यांचे मेडिकल चेकअप करून घेणे बाबत तसेच त्यांना विमा संरक्षण देणेबाबत पुरवठा विभागाकडे वेळोवेळी  मागणी केली आहे परंतु त्यावर कुठलीच.कार्यवाही झालेली नाही ,गोरेगाव ,मुंबई येथील शिधावाटप  प्राधिकारपत्रधारक  यांची  कोरोना  तपासणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा विलगीकरण करण्यात आले आहे व त्यांचे शिधावाटप दुकान 18/ 5 /2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आपण जर वरील प्रमाणे विचार केला तर एका शिधावाटप दुकानात कमीतकमी दिवसाला शंभर जणांना टोकन दिले जाते व या दुकानदारांचा धान्य वितरण करीत असताना  नागरिकांशी संपर्क येत असतो तसेच त्यांच्या कामगारांचाही नागरिकांशी संपर्क येत असतो आज आपण जर पाहिले तर मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यंत जास्त प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण असलेली शहरे आहेत, तसेच वरील शहराप्रमाणे तरी अन्य शहरांमध्ये कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, व यास वेळीच आळा बसला पाहिजे धान्य दुकानदारांच्या मागे त्यांचे कुटुंब असते  दुकानदार व त्यांचे कामगार यांची आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य आहे, कोरोना सारख्या संकट काळात  ते  नागरिकांना अविरत सेवा देत आहेत  त्या  सेवा देत असतानाही ही त्यांना अनेक संकटाशी सामनाही करावा लागतो, तसेच त्यांचा धान्य वितरण करीत असताना नागरिकांशी संबंध येत असल्यामुळे कोरोना साथीचा गुणाकारात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही , म्हणून प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी माझी आपणास विनंती आहे की  आपण राज्यातील सर्व धान्य दुकानदारांची तसेच त्यांच्या कामगारांची आरोग्य तपासणी  करून घ्यावीत . 22 एप्रिल 2020 रोजी रेशनिंग दुकानदारांना  त्यांच्या कामगारांना व अन्नपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना विमा संदर्भातील फाईल अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहसचिव यांनी वित्त विभागाकडे पाठविली आहे , आज एवढे आपत्तीकालीन परिस्थिती असतानासुद्धा 15 दिवस झाले तरी विमा संरक्षण फाईल वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली नाही ही खूप खेदजनक बाब आहे अशा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कामे मार्गी लावली गेली पाहिजेत.तरी आम्ही सूचित करतो की राज्यातील सर्व धान्य दुकानदार व त्यांचे कामगार यांची आरोग्य तपासणी करावी  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दुकानदारांच्या आरोग्य तपासणी बाबत महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग ,जिल्हाधिकारी यांना सूचना  देण्यात यावेत जेणे करून कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल तसेच वरील सर्व बाबी बघता त्यांची विमासंरक्षण फाईल लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी  ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स  फेडरेशन च्या वतीने करण्यात आली असल्याची माहीती देसाई  यांनी दिली आहे.

कोपरगाव : तालुक्यातील टाकळी येथे सार्वजनिक रस्त्यावर रस्त्याच्या कारणावरुन पोलिसांसमोरच विनामास्क आपसात भांडण केले. यावेळी मोठ्याने आरडाओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी पोलीस हवालदार सुरजकुमार जीवन अग्रवाल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात १८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश दत्तू बर्डे, सतीष (लल्लू) दत्तू बर्डे, जयश्री गणेश बर्डे, रेणुका शिवाजी वाघ, लहानू रंभू देवकर, दीपक (बोब्या) पिंपळे, ब्राम्हणगाव येथील रिक्षाचालक राकेश (पूर्ण नाव  माहित नाही), जना रोनोबा देवकर, दत्तू रोनोबा देवकर, राजेंद्र निवृत्ती देवकर, परशुराम निवृत्ती देवकर, महेश परशुराम देवकर, अतुल राजेंद्र देवकर, सुमित राजेंद्र देवकर, मच्छिंद्र जना देवकर, संजय देवकर, संदिप जनार्धन देवकर (सर्व रा.टाकळी, ता.कोपरगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget