शिर्डी (राजेंद्र गडकरी) राज्यपातळीवर नुकत्याच घेण्यात आलेल्या डॉक्टर सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षेत शारदा विद्या मंदिर राहाता शाळेचा इयत्ता 8 विचा विद्यार्थी चि अखिलेश दत्तात्रय गायकवाड हा महाराष्ट्र राज्यात 5वा व अहमदनगर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकावर पास झाला आहे, त्याला या परीक्षेत 150 पैकी 130 गुण मिळाले आहे ,मागील वर्षी देखील अखिलेश हा ह्या परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आला होता, अहमदनगर येथील जनसेवा प्रतिष्ठान तर्फे डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा राज्यपातळीवर दरवर्षी घेण्यात येते यावर्षी येथे घेण्यात आली होती अशा या राज्य पातळीवरील स्पर्धेत चिरंजीव अखिलेश गायकवाड हा जिल्ह्यात यावर्षीही दुसरा आला आहे,
मागीलवेळी या परीक्षेचे प्रमुख अरुण तुपविहिरेसर यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे नामांकित शास्त्रज्ञ बोलवून खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता व चिरंजीव आखिलेशचे कौतुक व अभिनंदन केले होते,
य परीक्षेत सायन्स कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन विविध उपकरणे व प्रयोग बनवून घेतात व भावी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक घडवण्याचा प्रयत्न केला जातो,
ही परीक्षा कठिण व अधिक खडतर असते,
अखिलेश गायकवाड हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता गायकवाड व प्राथमिक शिक्षिका वैशाली गायकवाड(बेहेळे) यांचा मुलगा असून त्याचे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण जि प शाळा एकरूखे, ता ,राहाता येथे झाले आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या परिश्रम व अभ्यासातून असा पुढे जाऊ शकतो, हे अखिलेश ने या परीक्षेद्वारे दाखवून दिले आहे ,या त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातील सर्व विभाग अधिकारी, पदाधिकारी ,पत्रकार, मित्रमंडळी यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे, व जिल्ह्यातून त्याचे मोठे कौतुक होत आहे.
Post a Comment