स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण देण्यात यावे पुरवठा विभागाकडे मागणी.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव  दुकानदार व त्यांचे मदतनीस  यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर  मेडिकल चेकअप करून त्यांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणीआँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी मुख्यमंत्री व पुरवठा मंत्री यांच्याकडे केली असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे.या बाबत माहीती देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी सांगितले  फेडरेशन च्या वतीने  वेळोवेळी स्व स्त धान्य दुकानदार व त्यांचे कामगार यांचे मेडिकल चेकअप करून घेणे बाबत तसेच त्यांना विमा संरक्षण देणेबाबत पुरवठा विभागाकडे वेळोवेळी  मागणी केली आहे परंतु त्यावर कुठलीच.कार्यवाही झालेली नाही ,गोरेगाव ,मुंबई येथील शिधावाटप  प्राधिकारपत्रधारक  यांची  कोरोना  तपासणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना जोगेश्वरी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा विलगीकरण करण्यात आले आहे व त्यांचे शिधावाटप दुकान 18/ 5 /2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आपण जर वरील प्रमाणे विचार केला तर एका शिधावाटप दुकानात कमीतकमी दिवसाला शंभर जणांना टोकन दिले जाते व या दुकानदारांचा धान्य वितरण करीत असताना  नागरिकांशी संपर्क येत असतो तसेच त्यांच्या कामगारांचाही नागरिकांशी संपर्क येत असतो आज आपण जर पाहिले तर मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे अत्यंत जास्त प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण असलेली शहरे आहेत, तसेच वरील शहराप्रमाणे तरी अन्य शहरांमध्ये कोरोना सारख्या साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, व यास वेळीच आळा बसला पाहिजे धान्य दुकानदारांच्या मागे त्यांचे कुटुंब असते  दुकानदार व त्यांचे कामगार यांची आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य आहे, कोरोना सारख्या संकट काळात  ते  नागरिकांना अविरत सेवा देत आहेत  त्या  सेवा देत असतानाही ही त्यांना अनेक संकटाशी सामनाही करावा लागतो, तसेच त्यांचा धान्य वितरण करीत असताना नागरिकांशी संबंध येत असल्यामुळे कोरोना साथीचा गुणाकारात रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही , म्हणून प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी माझी आपणास विनंती आहे की  आपण राज्यातील सर्व धान्य दुकानदारांची तसेच त्यांच्या कामगारांची आरोग्य तपासणी  करून घ्यावीत . 22 एप्रिल 2020 रोजी रेशनिंग दुकानदारांना  त्यांच्या कामगारांना व अन्नपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना विमा संदर्भातील फाईल अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील सहसचिव यांनी वित्त विभागाकडे पाठविली आहे , आज एवढे आपत्तीकालीन परिस्थिती असतानासुद्धा 15 दिवस झाले तरी विमा संरक्षण फाईल वित्त विभागाकडून मंजुरी मिळाली नाही ही खूप खेदजनक बाब आहे अशा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कामे मार्गी लावली गेली पाहिजेत.तरी आम्ही सूचित करतो की राज्यातील सर्व धान्य दुकानदार व त्यांचे कामगार यांची आरोग्य तपासणी करावी  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दुकानदारांच्या आरोग्य तपासणी बाबत महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग ,जिल्हाधिकारी यांना सूचना  देण्यात यावेत जेणे करून कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल तसेच वरील सर्व बाबी बघता त्यांची विमासंरक्षण फाईल लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी  ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स  फेडरेशन च्या वतीने करण्यात आली असल्याची माहीती देसाई  यांनी दिली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget