शिर्डी राजेंद्र गडकरी -राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे तीन दिवस संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे, कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय गाव पातळीवर व ग्रामपंचायती मार्फत घेण्यात आला आहे, नागरिकांनी तीन दिवस भाजीपाला, किराणादुकाने सर्व बंद राहणार असल्यामुळे घराबाहेर पडू नये ,असे आवाहन करण्यात आले आहे,
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक हे गाव नगर-मनमाड महामार्गालगत असल्याने व येथे शिर्डी जवळ असल्याने व सावळीविहीर हे आसपासच्या सर्व गावांचे बाजारपेठेचे केंद्र असल्याने येथे लॉकडाउन काळात सुद्धा कोण येते कोण जाते हे लवकर कळत नाही, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तेथेही शिर्डी व परिसरातून लोक आरोग्य तपासणी प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी करत होते, त्याप्रमाणे येथे दररोज भाजीपाला विक्री दुकाने सुरू होती, अनेकांनी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रीचे दुकाने थाटली आहेत, मात्र लॉकडाउनचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते, त्यामुळे या भाजीपाला विक्री केंद्रांवर मोठी गर्दी होत होती, त्याचप्रमाणे किराणा दुकानात ही कोणतेही लॉक डाऊन चे नियम पाळले जात नव्हते ,सोशल डिस्टंन्स ,मास्क याचा वापर होत नव्हता, सावळी विहीरबुद्रुक मध्ये येणारे जाणारे कळत नव्हते, यामुळे कोरोणाची भीती जास्त| असल्यामुळे सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ यांनी आज सकाळी एकमुखी निर्णय घेत सावळीविहीर बुद्रुक गाव तीन दिवसासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे, हा निर्णय घेताच गावातील सर्व दुकानदारांना तसा संदेश देऊन दुकाने बंद करण्यात आली, मेडिकल व दवाखाना सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत, कोणीही घराबाहेर पडू नये ,लॉक डाउनचे नियम पाळावेत, सोशल डिस्टंन्स व मास्क वापरावेत, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, तरी सर्वांनी घरात रहा सुरक्षित रहा ,असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे, उपसरपंच वृषाली ओमेश जपे ,ग्रामसेवक रावसाहेब खर्डे, कामगार तलाठी गायके व ग्रामस्थांनी केले आहे.
Post a Comment