Latest Post

राहुरी : शहरात मंगळवारी (दि.५ मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे अर्ध्या तासामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ दुकान मालकांवर आली. दारूची दुकाने सुरू होणार म्हणून तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. मात्र मंगळवारी सकाळी दारूची दुकाने उघडली नाही. फिरत्या जिपवरून दारूची दुकाने उघडू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र अचानक दुपारी दारूची दुकाने उघडली. तीनही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फिजीकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला. याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून तहसीलदार शेख यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यानंतर किशोर वाईन्स व सुनील वाइन्स या दोन ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे तळीरामांची एकच धांदल उडाली. क्षणात गर्दी गायब झाली. तहसीलदारांच्या आदेशानुसार किशोर वाईन्स, मोटलानी वाईन सुनील वाईन यांना सील ठोकण्यात आले. बेकायदेशीर दुकान उघडल्याबद्दल तीनही वाईन्स चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांनी दिली. राहुरी येथील तीन दुकानांना सील करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले म्हणून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सांगितले.

शिर्डी( प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊन काळात सर्वत्र मद्य विक्री बंद होती, मात्र लॉकडाऊन२ संपल्यानंतर चार मे पासून तिसरा टप्पा सुरू झाला असून या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये ,ग्रामीण भागात मद्यविक्रीची दुकाने काही अटी व शर्ती ठेवून सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी 43 दिवसानंतर मद्य विक्री आज मंगळवारी सकाळी सुरू झाल्यानंतर या मद्यविक्री केंद्रांवर दुकाने ,वाईन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, राहत्याला मद्य घेणारे ग्राहक मोठ्या संख्येने जमा झाल्याने राहातेतील वाईन शॉप वाल्यांनी मद्य ग्राहकांना साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये बसवून मग मद्य विक्री करण्यास सुरुवात करणार होते, मद्य घेणारे लोक सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये जणू लग्नाला आले की काय। असे यावेळी वाटत होते, एवढी मोठी गर्दी येथे होती,  याची खबर प्रांताधिकारी, तहसीलदार पोलीस उपाधीक्षक ,यांना समजताच या लॉनच्या ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन तेथील गर्दी पांगवली तसेच वाईन शॉप वर जाऊन  हे वाईन शॉप त्वरित बंद करण्याचे आदेश महसूल   व पोलिस प्रशासनाने देण्यात  आले.
 राहता तालुका प्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातही हीच परिस्थिती होती, राहताचे वाईन शॉप उघडणे आधीच बंद झाले, मात्र श्रीरामपूरचे पाच वाईन शॉप मात्र गर्दीमुळे तेही बंद करण्यात आले, महसूलचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी यापुढे मद्य विक्री केंद्रांना ठरवून दिलेल्या अटी  व शर्तीचा  भंग झाला तर वाईन्स उघडण्यास परवानगी द्यायची की नाही हे आज रात्री पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मसलत करून ठरवण्यात येणार असल्याचे  बिनदास न्यूज सी बोलताना सांगितले,
    जिल्ह्यात लॉक डाऊन चा तिसरा टप्पा सुरू असला तरी मध्ये विक्री दुकाने वाईन्स शर्तीवर ग्रामीण भागात करण्यास परवानगी शासनाने दिले आहे, मात्र या अटी व शर्तींचा अनेक ठिकाणी भंग होत आहे ,राहत्यालाही असा प्रकार दिसून आला आहे ,लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असताना व अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात काही गावात, शहरात मद्य विक्री दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली असल्यामुळे आजपासून 43 दिवसाने तालुक्यातील काही मद्यविक्री दुकाने अटी व शर्ती राखून उघडण्याचे परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे राहता येथील वाईन शॉप आज  43 दिवसांनी उघडण्यात आले, 43 दिवस घरात बसून असलेले मद्य ग्राहक यांनी मद्य घेण्यासाठी राहता वाईन शॉप येथे मोठी गर्दी केली, त्यामुळे वाईन्स मालकाने आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये सर्व ग्राहकांना पाठवून तेथे सर्वांना या  साई सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय मध्ये खुर्च्या टाकून तेथे बसण्याची व्यवस्था केली, चारशे ते पाचशे मद्य ग्राहक याठिकाणी लॉन्स मध्ये होते, यामध्ये ग्राहकांना रिक्षाने दीड किलोमीटर राहता शहरात पाठवले जाणार होते, ग्राहकांकडून दहा रुपये रिक्षा भाडे व पाच रुपये परवाना फी घेतली जाणार होती व परत लॉन्स वर आणून सोडले जाणार  होते, वाईन्स वर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना यालॉन्स मध्ये खुर्च्या टाकून बसवण्यात आले होते,यामध्ये हे ग्राहक एखाद्या लग्नाला आले की काय। असे जणू या लॉन्स मध्ये वाटत होते, सिद्ध संकल्प लॉन्स मंगल कार्यालय मध्ये एकाच वेळी चारशे ते पाचशे लोकांची गर्दी, झाल्याची , खबर प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे शिर्डीचे  पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व राहाता, शिर्डी चे पोलीस निरीक्षक ,यांना कळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकासह सिद्ध संकल्प लॉन्स वर धाव घेतली व तेथे जाऊन सर्व गर्दी पांगवली,
लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यात संचारबंदी व 144 कलम लागू आहे, एकाच ठिकाणी मोठी गर्दी करता येत नाही, शिवाय लॉन्स ,मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश आहेत, असे असताना या लॉन्स मध्ये एवढी मोठी गर्दी होणे हेअटी व नियमाचे भंग नाही का।। असा सवाल नागरिक करीत आहेत, लॉन्समधील मद्य ग्राहकांना पोलिसांनी पांगवले, मात्र लॉन्स वर कारवाई काय केली गेली हे आजुन गुलदस्त्यात आहे । तसेच  वाईन शॉप वर जाऊन हे वाईन शॉप उघडण्या पूर्वीच ताबडतोब बंद करण्यात आले, मात्र या वाईन्स वर कारवाई काय। असा सवाल काही समाजसेवक करीत आहेत, शासकीय अधिकाऱ्यांनी या लॉकडाउनच्या काळात अटी व शर्ती न पाळल्यामुळे हे वाईन्स शॉप  त्वरित बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे , मात्र लॉन्स व वाइन्स वर कारवाई व्हावी ,अशी मागणी होत आहे, 43 दिवसांनंतर मद्य विक्री दुकाने उघडल्यामुळे सर्वच ठिकाणी मद्य ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती,
अनेक ठिकाणी अटी व शर्ती यांचा भंग झाल्याचे दिसून येत होते, यावर  शासन काय निर्णय घेणार। असा सवाल नागरिकांमधून होत आहे, राहत्या प्रमाणे श्रीरामपूर येथे अशीच परिस्थिती होती श्रीरामपुर मधील पाच वाईन शॉप वर मोठी गर्दी झाली होती ,वाईन शॉप समोर मद्य ग्राहकांना उभे राहण्यासाठी अंतराअंतरावर निशाणी करण्यात आली होती ,मात्र तरीही येथेही लॉकडाउनच्या नियमाचा फज्जा उडाला होता, त्यामुळे हे वाईन्स शॉप महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी तेथील परिस्थिती पाहता त्वरित बंद केले ,हे राहता व श्रीरामपूर तालुक्यातील सर्व वाईन्स व मद्य विक्री केंद्र यापुढे अशीच गर्दी होत असेल तर चालू ठेवायची की नाही।। यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी बिनदास न्यूज शी बोलताना सांगितले.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- सहकार महर्षी लोकनेते पद्श्री कै बाळासाहेब विखे पाटील यांच्या जंयती निमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचे उदघाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले लोकनेते पद्श्री मा बाळासाहेब विखे पा .यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जनसेवा मंडळ श्रीरामपूर डाँ विखे पाटील हाँस्पिटल विळदघाट पंचायत समिती श्रीरामपूर  यांच्या सहकार्याने डाँक्टर  आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी जि प सदस्य शरद नवले  उपसभापती बंडू तोरणे हाजी ईस्माईल शेख शकील शेख शफीक आतार रविंद्र गायकवाड  दस्तगीर शेख केंद्र प्रमुख उत्तम शेलार मुख्याध्यापक  नंदकुमार परदेशी बाळासाहेब शेलार प्रभाकर ताके सतीश शेलार राजेंद्र कुताळ शांतवण अमोलिक शोएब शेख शुभम नवले विष्णुपंत डावरे अरुण अमोलिक उपस्थित होते तपासणी पथकात डाँक्टर सचिन चौधरी डाँक्टर सोहम मदनकर सिस्टर उषा थोरात बापु बलमे सुदाम भागवत प्रदिप लोखंडे आदिंचा सहभाग होता सोशल डिस्टनचा नियम पाळुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

अहमदनगर- जिल्ह्यातील दारूची दुकाने उद्यापासून सुरू होणार. मॉल्स, बाजारपेठेत असलेल्या दारूच्या दुकाना ना मनाई आहे. एकल स्वरूपाची, कॉलनीतील दुकाने सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरू राहतील.दुकानदारांनी दुकानासमोरील परिसर नियमित निर्जंतुककरण, करणे, सोशल डिस्टन्स, आजारी कामगार कामावर न ठेवणे हे नियम पाळावयाचे आहेत. दुकानदारांना गरज वाटल्यास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

साकुरी /किशोर पाटणी राहता तालुक्यात शेती व्यवसायाला जोड धन्दा म्हणून  दुरदृष्टी कोणातुन माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने दहा वर्षांपासून फुलशेती चा आधार घेतला मतदारसंघात असलेल्या साईबाबा मंदिर आणि रोज येणाऱ्या हजारो साईभक्त भाविकांचा आधार या फुलशेती ला ठरला राहता तालुक्यातील  अर्थकरणाला आधार ठरणारी फुलशेती  कोरोणा महामारी व बंद असलेली परराज्यातील वाहतूक  व बंद असणारे साईबाबा मंदिर व धार्मिक मंदीरे यामुळे लागवड केलेल्या गुलछडी व  गंलाडाफुले  शेतकरी लोकांना जनावरांना खाऊ घालताना लाखो रुपयांचे झालेले नुकसान यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहे
 अधिक माहिती अशी की  शिर्डी लगतच्या कालेवाडी येथे   असलेले शेतकरी गोरक्षनाथ निवृत्ती दिघे यांनी एक एकर शेतात गुलछडी लागवड केली होती तर बिगाभर शेतात गंलाडा फुले लावले होते एक गुलछडी साठी पन्नास हजार रुपये खर्च येतो तीन महिन्यांत  पिक हातात येते त्यानंतर १५००रुपये रोजाने सहा महिन्यांत तीन ते चार लाख रुपये या शेतीतून मिळतात  मात्र कोरोणा महामारी  आजार मात्र राहता तालुक्यातील फुलशेती उजाडकरणारी ठरली यामुळे राहता तालुक्यातील फुलशेती घेणारे शेतकरी बांधवांना यातुन कोट्यवधी रुपयेचा मोठा आर्थिक फटका बसल्याने  अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत डोळ्यांदेखत लाखो रुपयांचे नुकसान बघण्याचे दुर्भाग्य शेतकरी बांधवांच्या नशिबी आल्याचे सांगाताना गोरक्षनाथ निवृत्ती दिघे यानि अक्षु अनावर झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आर्थिक आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी  दिघे यांनी केली आहे

 चौकट

चारा ऐवजी फुले खाऊ घालण्याची जनावरा वर वेळ
डोळ्यांदेखत लाखोंचे नुकसान फुले जनावरांना खाऊ घालण्याची आली वेळ त्यामुळे महागडी किमतीचे कित्येक किलो फुले जनावरांना चारा म्हणून फुले खाउ घालण्याची वेळ बहुधा  पन्नास वर्षांत पहिल्यांदाच आली आहे आता शासनाने शेतकरी बांधवांना आधार दिला पाहिजे
   सौ पुष्पा गोरक्ष दिघे शेतकरी
कालेवाडी  शिर्डी.

( शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) - कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले असताना ही दिनांक १७ मार्च ते दिनांक ०३ मे २०२० अशा ४८ दिवसाच्‍या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

श्री.डोंगरे म्‍हणाले, देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवु नये म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. श्री साईबाबांचा महिमा व त्‍यांची शिकवणूक संपुर्ण जगात पोहचलेली असून त्‍यांचा भक्‍त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. दिनांक १७ मार्च पासून मंदिर बंद ठेवण्‍यात आले असून याकाळात टाटा स्‍कॉय, संस्‍थान संकेतस्‍थळ व मोबाईल अॅप्‍सव्‍दारे थेट ऑनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्‍त घर बसल्‍या घेत आहेत. यामध्‍ये टाटा स्‍कॉयवर सुमारे ३५ लाख साईभक्‍त अॅक्‍टीवेट असून ०१ लाख १२ साईभक्‍तांनी संस्‍थानचे मोबाईल अॅप्‍स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्‍थळावर दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्‍त भेट देत आहे.

श्री साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्‍तांनी बाबांना दक्षिणा देण्‍याची परंपरा सुरु ठेवली असून जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातुन साईभक्‍त संकेतस्‍थळाव्‍दारे व मोबाईल अॅप्‍सव्‍दारे ऑनलाईन देणगी संस्‍थानला पाठवत आहे. दिनांक १७ मार्च ते ०३ मे २०२० अशा ४८ दिवसाच्‍या याकालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याचे श्री.डोंगरे यांनी सांगितले.

(शिर्डी प्रतिनिधी )-श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र अशा शिर्डी शहरांमध्ये  पाकीटमारीने मोठा कहर केला होता ,अशा पाकीटमारी टोळीचा स्वतःला   मोरक्या समजणारा ,साईभक्तांच्या पैशाच्या जीवावर, पाकीट मारी वर स्वतःला मोठा गुंड समजणारा चिंधीचोर पाप्या शेख पुणे येरोडा कारागृहात गेल्या तीन वर्षापासून कारावास भोगत आहे, गोरगरीब व साईभक्त यांना विविध प्रकारांनी लुबाडून स्वतःला मोठा गुंड समजणारा चिंधीचोर पाप्या शेख सध्या
 तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्याला शिक्षा लागून तीन वर्षे पूर्ण झाले आहे, श्री साईंच्या नगरीत अती करणाऱ्यावर श्री साईबाबांचा दंड फिरल्या शिवाय राहत नाही व तो फिरला व त्या चीच सजा तो भोगत आहे,  असे शिर्डीकरांमधून सध्या बोलले जात आहे,
शिर्डी हे श्री साईबाबा मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे, येथे देश-विदेशातून दररोज हजारो साईभक्त श्री साई दर्शनासाठी येत असतात, त्याचाच फायदा चिंधीचोर पाप्या शेख याने घेऊन येथे पाकीटमारी सुरू केली, हळूहळू पाकीटमारां च्या टोळ्या बनवल्या, यां टोळ्याचा  हळूहळू विस्तार होत गेला देश-विदेशातून  आलेल्या  साईभक्तांची  पाकिटे मारून, फुकटची कमाई करून दारू गांजा पिऊन मौजमजा करणे ,दादागिरी, मारामाऱ्या गुंडगिरी करणे शिर्डीत सुरू झाले, शिर्डी धार्मिक क्षेत्र असतानाही येथे  मोठ्या प्रमाणात साईभक्तांची पाकीटमारी सुरू झाली,, महिलांचे दागिने ओरबाडणे, मोटरसायकलींची  चोरी या हरामाची कमाई मोठ्या प्रमाणात मिळू लागली, त्यातूनच शिर्डीत हाणामाऱ्या, दादागिरी ,गुंडगिरी ,खून असे प्रकार वाढले, अवैध व्यवसायाला मोठा ऊत आला होता , शिर्डीचे नाव त्यामुळे हळूहळू बदनाम होऊ लागले, चिंधीचोर पाप्या शेख व त्याच्या टोळीने शिर्डीत अनेक गुन्हे केले ,परंतु चिरीमिरी च्या जोरावर ते दाबले गेले, त्यामुळे चिंधीचोर पाप्याचा माज आणखी वाढत गेला ,त्याने शिर्डीतील रचित सुदेश पाटणी व प्रवीण विलास गोंदकर या दोन शिर्डीतील तरुणांचा निर्घुण खून केला व फरार झाला, त्यावेळी  शिर्डीचे दैनिक  साईदर्शन ने त्या विरोधात मोठा आवाज उठवला, त्यामुळे दैनिक साईदर्शनचे संपादक जितेश लोकचंदानी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाही चिंधीचोर पाप्या शेख ने योजना आखून जितेश लोकचंदानी यांचाही खून करण्याची तयारी केली होती, मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानी व त्यांच्या पोलीस पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकून चिंधीचोर पाप्याचा तपास लावला व त्याला अटक केली त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने व त्यात शिर्डीतील ह्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा केल्याने चिंधीचोर पाप्या शेख यास जन्मठेप शिक्षा सुनावली गेली व चिंधीचोर पाप्या शेख आज पुणे येथील येरोडा मध्यवर्ती कारागृहात नरक यातना भोगत आहे, चिंधीचोर पाप्या शेख आपल्या दोन नंबर कमाईवर, चिरीमिरी च्या जोरावर गुंडगिरी, दादागिरी च्या जोरावर कोणालाही काही समजत नव्हता, मात्र श्री साईबाबाचा दंड्या एक दिवस फिरत असतो व श्री साईबाबांचा दंड्या चिंधीचोर पाप्या शेख वर फिरला गेला व आज तो गेल्या तीन वर्षापासून  जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, श्री साईबाबांनी आपल्या साईभक्तांची पाकिटे मारणाऱ्यायाला  धडा शिकवला आहे, असे शिर्डीकर बोलताहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget