Latest Post

अहमदनगर दि.२८- नगर-मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या शिवारात ट्रक चालकाला मारहाण करून लुटणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. संतोष राजेंद्र विधाते (वय २४), सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० सर्व रा.वरशिंदे, ता.राहुरी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ एप्रिलला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास साताराला जात असताना ट्रक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाच्या शिवारात साई गंगा हाँटेलजवळ ट्रक थांबवली. या दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी दमदाटी करून जवळील रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात ट्रकचालक विशाल श्रीराम वाडेकर ( रा.मोहाडी पिंपळादेवी, जि.धुळे) यांनी दिली होती. या गुन्हाता तपास सुरू असताना, हा गुन्हा संतोष विधाते याने व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार राहुरी येथे जाऊन शोध घेऊन आरोपी संतोष विधाते याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पकडले. संतोष याला विचारणा केली असता,त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखविताच, सदरचा गुन्हा हा साथीदार सागर विधाते व आप्पासाहेब वाडकर सर्वांनी सागर यांच्या स्पलेंडर मोटारसायकलवर जाऊन केलीची कबुली दिली. यानंतर उर्वरित सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० दोघे रा.वरशिंदे, ता.राहुरी) याचा शोध घेऊन पकडण्यात आले.यावेळी चोरलेली रक्कम खर्च केल्याचे आरोपींनी सांगितले, ५ हजार रुपयाचा एम आयचा मोबाईल, स्पलेंडर गाडी (एमएच १७, एआर ३३३४) असा एकूण ३५ हजार रु. मुद्देमाल हस्तगत केला. पकडण्यात आलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रवि सोनटक्के, चालक पोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

शिर्डी राजेंद्र गडकरी - सध्या कोरोणामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे, या लॉक डाऊनमुळे सर्वजण घरात आहेत, गावात, शहरात सर्वत्र कर्फ्यू लागू आहे, सर्व बंद आहे ,त्यामुळे पशुपक्षी, प्राणी, वन्य प्राणी आता गावात, शहरात मन मोकळे बिनधास्त फिरताना ,संचार करताना दिसून येत आहे, माणसांना संचारबंदी आहे ,परंतु प्राणि मात्र मुक्त संचार करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे.सध्या देशात कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,रस्ते ओस पडले आहे, गावे ,शहरे शांत आहेत, सर्वजण आपापल्या घरात आहेत त्यामुळे गावात, शहरात, गल्लोगल्ली, चौकात, मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी, आता नेहमी प्रेमाणे गजबजलेले ,गर्दीने फुलले वातावरण  दिसून येत नाही ,अशा गर्दी नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी वानर, हरिण,मोर, अशा प्रकारचे वन्य प्राणी तसेच विविध प्रकारचे पशु पक्षी गावात शहरात मनमोकळेपणे फिरताना दिसून येत आहे, उन्हाची तीव्रता वाढू लागली असल्याने व रस्ते, सार्वजनिक ठिकाणे ओस पडल्याने प्राणी बिनधास्त  अशा ठिकाणी अधून मधून  दिसून येत आहेत मग , बस स्टॅन्ड असो की, रेल्वे स्थानक असो  मंदिरे असो की बाजारतळअसो, अशा ठिकाणी आता ह्या प्राण्यांनी मनुष्याची जागा घेतल्याचे दिसून येत आहे, शिर्डीच्या गजबजलेल्या साईनगर रेल्वे स्टेशन मध्ये सर्व सामसूम आहे अशा निर्मनुष्य साईनगर रेल्वे स्टेशनमध्ये मात्र उन्हाळ्यात उष्णतेपासून  बचाव करण्यासाठी कुत्रेही रेल्वे स्टेशनमध्ये मनसोक्त आनंद घेत आहेत तर ग्रामीण भागात सुद्धा लॉकडाऊन मुळे मंदिरे बंद आहेत, अशा मंदिरांच्या सभामंडपात गावातील भटके कुत्रे ,शेळ्या ,गाया दुपारच्या वेळी मस्त आराम करताना दिसून येत आहेत, मानवाची जागा या  काळात हे प्राणी आता भरून काढता की काय असे वाटत आहे। अनेक वांनरे ,माकडे, जंगलातून गावात शहरात येत आहे,व दिसू लागले आहेत, उन्हाळ्यातील पाण्याच्या आशेने म्हणा किंवा शांत शांत वातावरण मनात पण असे प्राणी गावात आता दिसत आहेत, त्यात सध्या उन्हाळा सुरू झाला आहे, या उकाड्यामुळे बिळातले सर्प आता हळूहळू बाहेर येऊ लागले असून त्यांचाही संचार सार्वजनिक ठिकाणी वाढल्याचे दिसून येत आहे, आजच  आश्वी येथे मुंगसाच्या तावडीतून एका सापाला  सर्पमित्राने वाचवले,  तर कोळपेवाडी कारखान्यावर  कोब्रा नागासारखी दिसणारी लांबलचक धामीण  दुसऱ्या एका सर्पमित्राने  पकडली , यावरून हे साप आता बीळा  बाहेर    व सार्वजनिक परिसरात  वावरू लागले आहेत , हे दिसून येते ,सध्या  कडक उन्हाळ्यामुळे   पशु, पक्षी वन्यप्राणी  पिण्याच्या पाण्यासाठी मोठे कासावीस करू लागली  आहे , त्यामुळे असे हे प्राणी  पाण्याच्या ओढीने  गावाकडे येऊ लागले आहेत , कोल्हे, मोर तर परिसरातील काही ठिकाणी  वाड्या-वस्त्यांवर लांडगे हे आता दिसू लागले आहेत ,त्यात  लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने  गजबजलेले  गावे शहरे दिसत नाही,  त्यामुळे  असे वन्यप्राणी बिनधास्त संचार करताना दिसू लागले आहेत,  गावातील, शहरातील मोकाट असणारे पाळीव प्राणी, कुत्रे ,डुकरे , बैल,  गाढवे यांनाही सध्या उदर निर्वाहासाठी मोठी धावपळ करावी लागत दिसत आहे, राहाता तालुक्यातील शिंगवे रुई  भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप आहे, हा कडक उन्हाळा जाणवायला लागल्यापासून ही हरणे आता संचारबंदीचा फायदा घेत गावाच्या जवळ संचार करताना दिसू लागले आहेत, या बंद काळात पाळीव जनावरे यांच्या चाराचाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

शिर्डी राजेंद्र गडकरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू  असून सर्व बंद आहे ,तरीही काही व्यक्ती विनाकारण व परवानगी न घेता या गावातून दुसऱ्या गावात जात असतात ,अशाच संगमनेर येथुन  ५ व्यक्तींना विनापरवाना,विनाकारण व मास्क न लावता। सावळीविहीरवाडीला आल्यानंतर व त्यांची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तींचा शोध लावून त्यांच्यावर  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सावळीविहीर वाडी येथे ५व्यक्ती संगमनेर येथुनआल्यामुळे व त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे शिर्डी व सावळीविहिर परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे,
  । कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे , राज्यात साथ निवारण कायदा लागू करण्यात आलेला आहे, शासकीय कर्मचारी, डॉक्टर पोलीस सर्वजण अहोरात्र प्रयत्न करीत आहेत ,मात्र या काळात घरात राहणे उचित असताना काही व्यक्ती विनाकारण व विनापरवाना या गावातून दुसऱ्या गावात फिरत असतात, त्यामुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते, हा धोका असूनही दिनांक 27 रोजी संगमनेर येथील मदिनानगर येथून ५ व्यक्ती  विनाकारण व विनापरवाना, गुपचुपपणे राहता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे आल्या होत्या , शिर्डी पोलीसांनि  त्वरित सावळीविहीरवाडी गाठली व येथे येऊन अधिक तपास केल्यानंतर येथे मदिनानगर संगमनेर येथुन आलेल्या जब्बार अब्दुल पठाण वय 37 , सादीका जब्बार पठाण वय 31, निसार नूरमंहम्मद अन्सारी वय55, शबाना निसार अन्सारी वय 50, सुफिया निसार अन्सारी 24 अशा एकूण पाच व्यक्तीच्या तोंडाला मास्क न लावता, विनाकारण, विनापरवाना सावळीविहीरवाडी येथे आल्याचे स्पष्ट झाले ,त्यामुळे या  व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली असता ते कोणाला न सांगता संगमनेरहून सावळीविहीरवाडी येथे आले होते, त्यांच्या तोंडाला मास्क नसल्यामुळे,व लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे,, संचारबंदी जारी असतानाही विनाकारण फिरणे, या सर्व आरोपांमुळे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या ५ व्यक्तींवरभा,द,वि,कलम१८८(२),२६९,२७१व सात रोग निवारण कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये तीन महिला आहेत, यामुळे मात्र शिर्डी सावळीवीहिर परिसरात नागरिकांमध्ये विविध चर्चा होत होत्या,
राहाता तालुक्यात असा प्रथमच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती समजते, सध्या कोरोणामुळे लॉकडाऊन सुरू असताना, सर्व घरा-घरात असताना काही लोक जाणीवपूर्वक आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जात असतात, असे कोणी नवीन लोक आपल्या गावात आल्याचे समजताच किंवा अनोळखी नवीन लोक येऊन राहत असेल तर त्यांची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला द्यावी ,असे आवाहनही  शिर्डी पोलिसांनी केले आहे.

शिर्डी -सध्या शिर्डी मध्ये लॉक डाऊन सुरू आहे, पोलीस व प्रशासन या काळात सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करतात, मात्र काही नागरिक तरीही रस्त्यावर विनाकारण फिरत असतात, अशा नागरिकांना आजही पोलिसांनी कान पकडून उठाबशा काढायला लावून शिक्षा दिली, तसेच दंडात्मक कारवाई केली ,शिर्डीत या कालावधीत सर्व घरात असताना व वारंवार सूचना करूनही अनेक जण सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने किंवा भाजीपाला ,किराणा, मेडिकल घेण्याच्या नावाखाली खोटे सांगून फिरत असतात, अशांची चर्चा करून व योग्य कागदपत्र तपासून खरे असल्यास सोडून दिले जाते, मात्र खोटे सांगून फिरणाऱ्यांना उठाबशा काढणे,दंडात्मक कारवाई करणे, मोटरसायकली जप्त करून घेणे ,अशा शिक्षा सध्या शिर्डी पोलीस विनाकारण फिरणारांना देत आहेत ,आजही सकाळी शिर्डीत पोलिसांचे पथक तैनात करून अशा विनाकारण फिरणार यांवर कडक कारवाई करण्यात आली, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे शिर्डी पोलिसांनी सांगितले, त्यामुळे प्रत्येकाने विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, सामाजिक दुरी व मास्क लावावे  व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

श्रीरामपूर - कोरोनो व्हायरसची सध्याची परिस्थिती बघता पोदार जंम्बो किडस् या शाळेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . ज्यामध्ये पोदार जंम्बो किडसूच्या मुलांच्या सुरक्षततेकडे बघुन मुलांना घरी राहण्यास सांगण्यात आले . मुले घरी दैनिक खेळ खेळत तर खेळतातच या शिवाय त्यांना शिकविण्यासाठी आपल्या शिक्षकांना आणि मित्रांसोबत जोडून राहावे . यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे . या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी एक अदभुत योजना तयार केली . कि ज्यामध्ये  पाच कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे जसे शारिरीक . भाषा, सामाजिक , भावात्मक आणि संज्ञात्मक या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे . या होम बेस्ड ऑनलाईन पद्धतीचा पालक आणि विद्यार्थी खुप चांगला प्रतिसाद देत आहे . या कालावधी मध्ये मुलांचे नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन पोदार _ जंम्बो किडस या शाळेचे संचालक श्री. सचिन महाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . छाया कितरा मॅडम यांनी मुलांना ऑनलाईन पद्धतीद्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही . विदयार्थना व्हिडिओद्वारे ऑनलाईन लेक्चर देण्यात येत आहे . यामध्ये शाळेतील शिक्षिका सौ. सुहाणी बागवाणी, सौ. सुनिता वाघ. कु. वनिता वधवाणी, सौ. सानवी रोहेरा , सौ.मीना गोराणे,या शिक्षकांचे तसेच शाळेतील दीदी सौ.मीरा पटारे यांचे अनमोल मार्गदर्शन  मिळत आहे .

(जय शर्मा ) शहरालगतच्या निघोज येथील गावात कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून गावातील गरिबांना मदत करण्यासाठी निघोज ग्रामपंचायतीच्या माजी. संरपच मनिषा प्रसाद मते सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मते यांच्या पुढाकाराने जवळपास प्रतिकुटब ७किलो गव्हाची किट करून जवळपास ११पोते धान्याचे वितरण माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व खा डॉ सुजय विखे   यांच्या प्रेरणेतून उपक्रम राबविण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद मते यांनी सांगितले  लाॅक डाउन व संचारबंदी यामुळे शिर्डी पचंक्रोशीत  अनेक गावाचे अर्थकारण अडचणी मध्ये आले लहान हातावर असलेल्या कुटुंबांना यांचा मोठा त्रास झाला आहे अशा वेळी  लोकांना पाठबळ देण्यासाठी देशहितासाठी आपली जबाबदारी हि या मागे भुमिका असल्याचे सांगितले व घरोघरी. जाऊन थेट वितरण करण्यात आले लोकांनी मास्क वापरुण  आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे  बाबासाहेब मते ज्ञानदेव मते   संयाजी गाडेकर उद्योजक संजय गव्हाणे संजय मते मते संतोष मते भाऊसाहेब मते  रविद्र गाडेकर  विष्णु गाडेकर विजय गाडेकर  आदींसह विविध युवकांनी पुढाकार घेतला होता.

शिर्डी, प्रतिनिधि जय शर्मा )27: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अत्यंत प्रभावीपणे का म करत आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांचे नियोजन, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींच्या पूर्वतयारीचा आढावा महसूलमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत हेाते.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री महसूल मंत्री थोरात यांनी घेतलेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, महसूल मत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुभाष काटकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण अरगडे सहभागी झाले होते.
            येणाऱ्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बी-बियाणे, रासायनिक खतांचे व औषधांचे नियोजन करावे, तालुक्यात कुठेही याचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून खरीप पिकाची मागणी लक्षात घेवून ज्या वाणांस चांगला प्रतिसाद मिळतो त्या वाणांच्या बियाण्याची उपलब्धता मुबलक होईल याचे नियोजन करावे, असे निर्देश महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणाकरिता तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाची स्थापना तात्काळ करावी, भरारी पथकाचे काम सुरु करावे, पिक विमा भरपाईमध्ये पिक कापणी प्रयोगाचे महत्व काय आहे याबाबत गावपातळी पर्यंत जागृती करणे याबाबत नियोजन करण्यासाठी मंत्रीमहोदयांनी मार्गदर्शन केले.
            तालुक्यातील शेतकरी उत्पादक गटांच्यामार्फत लॉकडाऊनच्या काळात मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरी भागातील ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या मुल्य साखळीचे सबलीकरण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याकरीता शेतकऱ्यांच्या गटास अनुदानीत पॅक हाऊस उभारणी करुन देणे, शितवाहन उपलब्ध करुन देण्याची त्यांनी सूचना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येवू नये व गावातच त्यांना काम उपलब्ध होईल अशा सूचना देतांना मनरेगाअंतर्गत शेततळे व कंपार्टमेंट बंडीगच्या कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे असे सांगितले. तालुक्यातील काही गावांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निदर्शनास आणून दिले. याकरिता महसूल व ग्रामविकास विभागांनी योग्य समन्वयाने टँकर मंजूरीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन आवश्यकतेप्रमाणे पाणी पुरवठा करण्याबाबतच्या सूचनाही प्रशासनला दिल्या.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget