(जय शर्मा ) शहरालगतच्या निघोज येथील गावात कोरोणा आजाराच्या पाश्र्वभूमीवर सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून गावातील गरिबांना मदत करण्यासाठी निघोज ग्रामपंचायतीच्या माजी. संरपच मनिषा प्रसाद मते सामाजिक कार्यकर्ते प्रसाद मते यांच्या पुढाकाराने जवळपास प्रतिकुटब ७किलो गव्हाची किट करून जवळपास ११पोते धान्याचे वितरण माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील व खा डॉ सुजय विखे यांच्या प्रेरणेतून उपक्रम राबविण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद मते यांनी सांगितले लाॅक डाउन व संचारबंदी यामुळे शिर्डी पचंक्रोशीत अनेक गावाचे अर्थकारण अडचणी मध्ये आले लहान हातावर असलेल्या कुटुंबांना यांचा मोठा त्रास झाला आहे अशा वेळी लोकांना पाठबळ देण्यासाठी देशहितासाठी आपली जबाबदारी हि या मागे भुमिका असल्याचे सांगितले व घरोघरी. जाऊन थेट वितरण करण्यात आले लोकांनी मास्क वापरुण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे बाबासाहेब मते ज्ञानदेव मते संयाजी गाडेकर उद्योजक संजय गव्हाणे संजय मते मते संतोष मते भाऊसाहेब मते रविद्र गाडेकर विष्णु गाडेकर विजय गाडेकर आदींसह विविध युवकांनी पुढाकार घेतला होता.
Post a Comment