Latest Post

सावळीविहीर राजेंद्र गडकरी राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस पुढील आदेश येईपर्यंत मंगळवार, शुक्रवार या दिवशीच चालू ठेवण्यात यावीत व  तशी ग्रामपंचायतची  संबंधित दुकानदारांनी परवानगी घ्यावी  अन्यथा  अशा दुकानदारांवर  कारवाई करण्यात येईल,  असा इशारा  सावळीविहीर चे ग्रामसेवक खर्डे व कामगार तलाठी गायके   यांनी एका पत्रकान्वये दिला आहे ,
 राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने सध्या आठवड्यातून सर्व दिवस सुरु असतात, त्यामुळे येथे गर्दी व लॉक डाऊन चे नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे सावळीविहीर येथे भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार आपले भाजीपाला व फळे दुकाने चालू ठेवावीत इतर दिवशी ते बंद ठेवावीत, व या आदेशाची आजपासून  अंमलबजावणी करण्यात यावी  ,असे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे, 
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  गावात, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने व राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे तसेच राहता पंचायत समितीचे गटविकासअधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना  करण्यात येत आहेत, सर्वांप्रमाणे दुकानदारांनी नियम पाळणे गरजेचे आहे ,जर कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास अश्या दुकानदारांवर   कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, त्याच प्रमाणे गावातील जीवनावश्यक अशा किराणा दुकाने तसेच शेती पूरक व्यवसाय, हार्डवेअर दुकाने, हेही सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवावीत, इतर वेळी बंद ठेवावी, जर दुपारी एक नंतर अशी दुकाने सुरू असल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल ,त्याच प्रमाणे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते किराणा दुकानदार, शेती पूरक व्यवसाय करणारे, हार्डवेअर दुकानदार ,आदी विक्रेत्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टंन्स पाळावेत, कोठेही थुंकू नये ,जर असे नियम मोडल्यास अशांवर कलम 144 प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तोंडाला मास्क  नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही थुंकणे,  अशांकडून  पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल ,असे या पत्रात  म्हटले आहे, या पत्रकावर सावळीविहीर चे कामगार तलाठी गायके यांच्याबरोबरच ग्रामसेवक खर्डे, सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे यांच्या सह्या आहेत,
 तरी प्रत्येकाने या आदेशाचे उल्लंघन करू नये ,लॉक डाऊन चे नियम सर्व गावातील नागरिकांनी पळावे, कोणीही  नियम तोडू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क लावावे ,असे आवाहन सावळीविहीर च्या सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे व उपसरपंच सौ, वृषाली ओमेश जपे तसेच पोलीस पाटील सौ,सुरेखा सुरेश वाघमारे यांनी केले आहे,

दिनांक २४/०४/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना
गोपनिय माहीती मिळाली कि, अहमदनगर ते सोलापुर रोडने सोलापुरकडुन अशोक लेलॅन्ड टेम्पो क्र.एम एच २० ई
जी ८९१९ यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला इ. तंबाखूजन्य पदार्थ विक्री
करण्याचे उददेशाने कांदयाचे गोण्याखाली लपवून अहमदनगर च्या दिशेने सदर टेम्पो येत असल्याबाबत खात्रीशीर
बातमी मिळाल्याने. सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/संतोष लोढे,रविंद्र
कर्डीले,पोकॉ/रोहीत मिसाळ, पोकॉ/प्रकाश वाघ, राहुल सोळंके यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई
करीता खाजगी वाहनाने रवाना केले. त्यांनतर पथकातील वरील कर्मचारी यांनी दोन पंचासमक्ष अहमदनगर ते
सोलापुर रोडला दरवाडी शिवारात कन्टमिट जकात नाका यर्थ रस्त्याला सापळा रचुन थाबला असताना त्याना
बातमीतील नमुद वर्णनाचा टेम्पो नगरचे दिशेने येताना दिसला सदर टेम्पो चालकास टेम्पो थांबविण्यास लावुन
टेम्पो चालक व त्याचे शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी
त्यांचे नांवे १) सलीम युसुफ शेख वय-२४ रा.भारत नगर,वाळुज ता.गंगापुर जि.औरंगाबाद २) संतोष अशोक
शिंदे वय-३४ रा.श्रध्दानगर ,बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद असे असल्याचे सांगुन सदर टेम्पो मधील गुटखा
व तंबाख ही ३) सचिन म्हस्के रा.वाळूज ता.गंगापुर याचे मालकीची असल्याबाबत कळवीले .सदर टेम्पोची
पंचासमक्ष झडती घेतली असता सदर टेम्पोचे समोरील काचेवर अत्यावश्यक सेवा असे स्टीकर लावलेले दिसले व
त्याचे मागील होद चेक केला असता २० कांदयाचे भरलेल्या गोण्याखाली लपवलेला हिरा कंपनीचा पानमसाला
गुटखा ,हिरा मिक्स तांखुचे पोते असा वाहानासह एकुण ५,४२,२५६ /- रु.किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष
पंचनामा करुन जप्त केला असुन सदर कारवाई बाबत मा.जिल्हा अन्न व औषध प्रशासन ,अहमदनगर यांना संपर्क
केला आहे.सदर ताब्यात घेतलेले इसम नामे १) सलीम युसुफ शेख वय-२४ रा.भारत नगर,वाळुज ता.गंगापुर
जि.औरंगाबाद २) संतोष अशोक शिंदे वय-३४ रा.श्रध्दानगर ,बिडकीन ता.पैठण जि.औरंगाबाद यांना मुददेमालासह
पुढील कारवाई कामी भिंगार कॅम्प पो.स्टे समक्ष हजर केले असुन पुढील कारवाई भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन
करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.अखिलेश कुमार सिंह ,पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री. सागर पाटील,
अप्पर पोलीस अधीक्षक,अहमदनगर , मा.श्री. संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर
विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली
आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी )- दहा वर्षाची  गँरंटी असताना चौथ्याच वर्षी द्राक्ष बागेतील तार तुटल्यामुळे संक्रापूर  ता राहुरी येथील द्राक्ष बागायतदार शेतकर्याचे पंधरा लाख रुपयाचे तयार झालेले द्राक्ष  व द्राक्ष बागेचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे          संक्रापूर ता राहुरी येथील शेतकरी  राधाजी धोंडीबा चव्हाण यांची गट नंबर ५५/१  मध्ये आडीच एकर शेत जमीन असुन या जमिनित चार वर्षापूर्वी  द्राक्ष लागवड केली होती द्राक्ष लागवडीसाठी आँस्टेनिटीक कपंनीची मजबुत तार वापरण्यातआली होती कपंनीची द्राक्ष बागेकरीता वापरल्या जाणार्या तारेची दहा वर्ष गँरटी होती परंतु चौथ्याच वर्षी कमकुवत  झालेली तार
तुटली अन संपुर्ण बागच मालासह जमिनीवर झोपली विशेष म्हणजे या बागेकरीता मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते द्राक्ष पिक काढणीला आले होते व्यापारी ३५ रुपये किलो दराने खरेदी करुन गेले होते दोन दिवसांनी ते नेण्यासाठी येणार होते तत्पुर्वीच कमकुवत असलेल्या  तारा  तुटल्यामुळे पुर्ण बागच मालासह जमिनीवर झोपली असुन द्राक्ष मालाचे तर नूकसान झालेच परंतु द्राक्षची झाडे देखील  मोडली आहेत त्यामुळे झालेल्या नुकसानीस केवळ तार कंपनीच जबाबदार असल्याचे मत शेतकरी चव्हाण यांनी व्यक्त केले आसुन तार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी शेतकरी राधाजी चव्हाण यांनी केली आहे

मुंबई - मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे पोलिसाने प्राण वाचवले. रात्रपाळीला पोलीस कर्तव्याच्या ठिकाणी जात असताना सदर घटना घडली होती. महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल "खाकीतल्या देवदुता"चे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
     कोरोनाचे सावट असल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र पोलीस दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यापैकी एक असलेले पोलीस शिपाई (बक्कल नं. 093566) श्रीकांत शिवाजी देशपांडे हे राहत्या घरातून (एमआरए मार्ग पोलीस लाईन येथून) मालाड पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पोशि देशपांडे हे जे. जे. पुलाजवळ येताच एक महिला पुलावरील लोखंडी (स्पीड दर्शक खांब) खांबाच्या आधारे पुलावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून पोशि देशपांडे यांनी तात्काळ दुचाकी थांबवून पुलावर चढणाऱ्या महिलेला रोखले.
    ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या महिलेने खांबाला घट्ट पकडून ठेवले होते. मानसिक संतुलन बिघडलेली महिला पोशि देशपांडे यांनाच उलटसुलट बोलू लागली. मात्र पोशि देशपांडे यांना महिलेची समजूत काढली व तात्काळ 100 नंबरवर फोन करून सर्व हकीगत सांगितली. नेमकी त्यावेळेस गस्त घालणाऱ्या वाहतूक पोलीस विभागाची गाडी पुलाजवळ आली. दरम्यान, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश जारी होताच एमआरए मार्ग पोलिसांचे पथक तात्कळ घटनास्थळी दाखल झाले. पोशि श्रीकांत देशपांडे यांनी सर्व हकीगत सांगून महिलेला एमआरए मार्ग पोलिसांच्या ताब्यात देऊन कर्तव्य बजावण्यासाठी मालाड पोलीस ठाण्याच्या दिशेने निघून गेले.आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे दोन लग्न झाल्यामुळे व सततच्या कौटुंबिक वादामुळे महिला हताश झाली होती. त्यामुळे मानसिक तणावामुळे महिलेचे संतुलन बिघडले होते, अशी माहिती चौकशीदरम्यान उजेडात येताच पोलिसांनी महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावून तिला त्याच्या ताब्यात दिले.     दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या महिलेला रोखून जीवनदान दिल्याबद्दल उदगिरचे (जि. लातूर) सुपुत्र पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी व मित्रमंडळींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या, सत्कार केला.

सावळीविहीर राजेंद्र गडकरी राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस पुढील आदेश येईपर्यंत मंगळवार, शुक्रवार या दिवशीच चालू ठेवण्यात यावीत व  तशी ग्रामपंचायतची  संबंधित दुकानदारांनी परवानगी घ्यावी  अन्यथा  अशा दुकानदारांवर  कारवाई करण्यात येईल,  असा इशारा  सावळीविहीर चे ग्रामसेवक खर्डे व कामगार तलाठी गायके   यांनी एका पत्रकान्वये दिला आहे ,
 राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने सध्या आठवड्यातून सर्व दिवस सुरु असतात, त्यामुळे येथे गर्दी व लॉक डाऊन चे नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे सावळीविहीर येथे भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार आपले भाजीपाला व फळे दुकाने चालू ठेवावीत इतर दिवशी ते बंद ठेवावीत, व या आदेशाची आजपासून  अंमलबजावणी करण्यात यावी  ,असे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे, 
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  गावात, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने व राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे तसेच राहता पंचायत समितीचे गटविकासअधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना  करण्यात येत आहेत, सर्वांप्रमाणे दुकानदारांनी नियम पाळणे गरजेचे आहे ,जर कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास अश्या दुकानदारांवर   कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, त्याच प्रमाणे गावातील जीवनावश्यक अशा किराणा दुकाने तसेच शेती पूरक व्यवसाय, हार्डवेअर दुकाने, हेही सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवावीत, इतर वेळी बंद ठेवावी, जर दुपारी एक नंतर अशी दुकाने सुरू असल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल ,त्याच प्रमाणे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते किराणा दुकानदार, शेती पूरक व्यवसाय करणारे, हार्डवेअर दुकानदार ,आदी विक्रेत्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टंन्स पाळावेत, कोठेही थुंकू नये ,जर असे नियम मोडल्यास अशांवर कलम 144 प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तोंडाला मास्क  नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही थुंकणे,  अशांकडून  पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल ,असे या पत्रात  म्हटले आहे, या पत्रकावर सावळीविहीर चे कामगार तलाठी गायके यांच्याबरोबरच ग्रामसेवक खर्डे, सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे यांच्या सह्या आहेत,
 तरी प्रत्येकाने या आदेशाचे उल्लंघन करू नये ,लॉक डाऊन चे नियम सर्व गावातील नागरिकांनी पळावे, कोणीही  नियम तोडू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क लावावे ,असे आवाहन सावळीविहीर च्या सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे व उपसरपंच सौ, वृषाली ओमेश जपे तसेच पोलीस पाटील सौ,सुरेखा सुरेश वाघमारे यांनी केले आहे,

श्रीरामपूर/विठ्ठल गोराणे-जगभरामध्ये कोरोना या विष्णुने थैमान घातले आहे. आणि  भारतामध्ये सुद्धा आतापर्यंत हजारो नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे .अनेक नागरिक मृत्युमुखी पडली आहे. पडत आहे या कोरोना चे संकट असतानाच आता सारी नावाचे नवीन संकट आपल्या समोर अचानक उभे राहिले आहे . अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेकांना सारी ची लागण झाली असून रोज नवे रुग्ण सापडत आहे . आपण सर्व नागरिक मिळून या आजारात विरुद्धची युद्ध लढत आहोत यासाठी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून त्याप्रमाणे वागावे यातच आपले सर्वांचे राष्ट्रीय हित  व देशाप्रती आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.सध्या अहमदनगर जिल्ह्यात, शहरात  आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन या आजाराचे सर्वेक्षण करत आहे . हे सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकेचे सफाई कामगार, आशा वर्कर हे  युद्धातील आपले सैनिक आहे. आपण सर्वांनी त्यांना मदत करावी व त्यांचे मनोधैर्य वाढवावे आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी बांधव व भगिनींना यांचे बरोबर सौजन्याने वागावे त्यांना आपली व आपल्या कुटुंबाची व कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य संदर्भातील बारीक-सारीक सर्व गोष्टींची माहिती द्यावी तसेच आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याकडे आधार कार्ड ओळखपत्राची मागणी केल्यास त्यांना झेरॉक्स कॉपी देऊन सहकार्य  करावे.  केंद्र सरकारने MPR ला स्थगिती दिली आहे त्यामुळे कोणीही. गैरसमज  करू नये व अफवा पसरू नये. आरोग्य  कर्मचाऱ्यांना अरेरावी न करता त्यांना सहकार्य करावे असे आवाहन संविधान बचाव समितीच्या वतीने अहमदभाई जहागीरदार,साजिद मिर्झा, मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण,  शाहिद कुरेशी,फिरोज पठाण ,जावेद तांबोळी,  फिरोज दस्तगीर दस्तगीर,एफतेकार शेख,  आदिममुखदूमी, नाजीश शहा,एजाज बारुदवाला,मुस्त किंन बागवान,राजू मलंग, यांनी केले.

(शिर्डी राजेंद्र गडकरी )   राहता तालुक्यात कोरोना बरोबरच सारी व इली या दोन  आजारापासून राहता तालुका मुक्त राहावा ,त्यांचा शिरकाव राहता तालुक्यात होऊ नये ,म्हणून प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून तालुक्यात त्यासाठी विशेष वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत, राहता तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली, राहता तालुक्यात सध्या कोरोना आजाराबरोबरच सारी व ईली आजाराचा एकही रुग्ण नाही, राहता तालुका जसा कोरेना मुक्त झाला ,तसाच सारी व ईली पासून तो मुक्त राहवा ,यासाठी  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन विशेष काळजी घेत आहे,
  राहता तालुक्यात संशयित कोरोना व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले असे एकूण एकूण 60 व्यक्ती साई संस्थान च्या साईआश्रम येथील विलगीकरण कक्षात होत्या, त्यापैकी 55 व्यक्तींना ठीक झाल्यानंतर 14 दिवसांनी  घरी सोडून देण्यात आले आहे,सध्या साई संस्थानच्या साई आश्रम फेज टू मध्ये  सहा संशयित कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे, 14 दिवसांनंतर त्यांची तपासणी करून त्यांना ठीक वाटल्यास त्यांनाही घरी सोडून देण्यात येणार आहे,  राहता तालुक्यात एकमेव कोरोना रुग्ण होता ,तो पूर्ण बरा झाला असल्याने राहता तालुका कोरोना मुक्त झाला आहे , पण तरीही सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून लॉकडाऊनचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहता तालुक्यात असणारे मजूर, परप्रांतीय कामगार, गोरगरीब अशांसाठी साई पालखी निवारा येथे  शासनातर्फे  निवास ,भोजन ,चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी 142 गरज मंतशा व्यक्तींची शासनाने व्यवस्था केली आहे तसेच तेथेही त्यांना  शासकीय वैद्यकीय अधिकारी  हे आरोग्याविषयी तपासणी करून औषधोपचार करत आहे,राहता तालुका कोरोना मुक्त झाला असून त्यानंतर राहता तालुक्यात श्वसनाचा तीव्र त्रास असणारा सारी व स्वाइन फ्लू सारखा ईली  या आजांराचा राहता तालुक्यात अद्यापही शिरकाव नाही ,येथे सारी व ईली आजाराचे एकही रुग्ण नाही, तरीही या दोन्ही आजाराचा शिरकाव येथे होऊ नये, त्यासाठी कोरोना प्रमाणेच सारी व ईली आजारा संदर्भात प्रशासन मोठी दखल घेत असून कोरोना बरोबरच सारी व ईली आजारापासून राहता तालुका मुक्त राहवा, यासाठी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व सर्व आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यामार्फत घराघरात जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करण्यात येत आहे, त्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत, राहता तालुक्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक, सेविका तसेच सर्व शासकीय कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहेत, कोरोना आजारा पासून राहाता तालुका मुक्त झाला असला तरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भात आवश्यक ती दक्षता घ्यावी ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंन्स व तोंडाला मास्क लावावे , सर्दी ,खोकला, शिंका किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय दवाखाना किंवा डॉक्टरांशी संपर्क करावा, व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे ,असे आवाहन राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget