बेलापूर (प्रतिनिधी )- दहा वर्षाची गँरंटी असताना चौथ्याच वर्षी द्राक्ष बागेतील तार तुटल्यामुळे संक्रापूर ता राहुरी येथील द्राक्ष बागायतदार शेतकर्याचे पंधरा लाख रुपयाचे तयार झालेले द्राक्ष व द्राक्ष बागेचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे संक्रापूर ता राहुरी येथील शेतकरी राधाजी धोंडीबा चव्हाण यांची गट नंबर ५५/१ मध्ये आडीच एकर शेत जमीन असुन या जमिनित चार वर्षापूर्वी द्राक्ष लागवड केली होती द्राक्ष लागवडीसाठी आँस्टेनिटीक कपंनीची मजबुत तार वापरण्यातआली होती कपंनीची द्राक्ष बागेकरीता वापरल्या जाणार्या तारेची दहा वर्ष गँरटी होती परंतु चौथ्याच वर्षी कमकुवत झालेली तार
तुटली अन संपुर्ण बागच मालासह जमिनीवर झोपली विशेष म्हणजे या बागेकरीता मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते द्राक्ष पिक काढणीला आले होते व्यापारी ३५ रुपये किलो दराने खरेदी करुन गेले होते दोन दिवसांनी ते नेण्यासाठी येणार होते तत्पुर्वीच कमकुवत असलेल्या तारा तुटल्यामुळे पुर्ण बागच मालासह जमिनीवर झोपली असुन द्राक्ष मालाचे तर नूकसान झालेच परंतु द्राक्षची झाडे देखील मोडली आहेत त्यामुळे झालेल्या नुकसानीस केवळ तार कंपनीच जबाबदार असल्याचे मत शेतकरी चव्हाण यांनी व्यक्त केले आसुन तार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी शेतकरी राधाजी चव्हाण यांनी केली आहे

Post a Comment