(शिर्डी राजेंद्र गडकरी ) राहता तालुक्यात कोरोना बरोबरच सारी व इली या दोन आजारापासून राहता तालुका मुक्त राहावा ,त्यांचा शिरकाव राहता तालुक्यात होऊ नये ,म्हणून प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून तालुक्यात त्यासाठी विशेष वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत, राहता तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली, राहता तालुक्यात सध्या कोरोना आजाराबरोबरच सारी व ईली आजाराचा एकही रुग्ण नाही, राहता तालुका जसा कोरेना मुक्त झाला ,तसाच सारी व ईली पासून तो मुक्त राहवा ,यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन विशेष काळजी घेत आहे,
राहता तालुक्यात संशयित कोरोना व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले असे एकूण एकूण 60 व्यक्ती साई संस्थान च्या साईआश्रम येथील विलगीकरण कक्षात होत्या, त्यापैकी 55 व्यक्तींना ठीक झाल्यानंतर 14 दिवसांनी घरी सोडून देण्यात आले आहे,सध्या साई संस्थानच्या साई आश्रम फेज टू मध्ये सहा संशयित कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे, 14 दिवसांनंतर त्यांची तपासणी करून त्यांना ठीक वाटल्यास त्यांनाही घरी सोडून देण्यात येणार आहे, राहता तालुक्यात एकमेव कोरोना रुग्ण होता ,तो पूर्ण बरा झाला असल्याने राहता तालुका कोरोना मुक्त झाला आहे , पण तरीही सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असून लॉकडाऊनचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहता तालुक्यात असणारे मजूर, परप्रांतीय कामगार, गोरगरीब अशांसाठी साई पालखी निवारा येथे शासनातर्फे निवास ,भोजन ,चहा नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी 142 गरज मंतशा व्यक्तींची शासनाने व्यवस्था केली आहे तसेच तेथेही त्यांना शासकीय वैद्यकीय अधिकारी हे आरोग्याविषयी तपासणी करून औषधोपचार करत आहे,राहता तालुका कोरोना मुक्त झाला असून त्यानंतर राहता तालुक्यात श्वसनाचा तीव्र त्रास असणारा सारी व स्वाइन फ्लू सारखा ईली या आजांराचा राहता तालुक्यात अद्यापही शिरकाव नाही ,येथे सारी व ईली आजाराचे एकही रुग्ण नाही, तरीही या दोन्ही आजाराचा शिरकाव येथे होऊ नये, त्यासाठी कोरोना प्रमाणेच सारी व ईली आजारा संदर्भात प्रशासन मोठी दखल घेत असून कोरोना बरोबरच सारी व ईली आजारापासून राहता तालुका मुक्त राहवा, यासाठी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व सर्व आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यामार्फत घराघरात जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करण्यात येत आहे, त्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत, राहता तालुक्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक, सेविका तसेच सर्व शासकीय कर्मचारी यासाठी प्रयत्नशील आहेत, कोरोना आजारा पासून राहाता तालुका मुक्त झाला असला तरी तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भात आवश्यक ती दक्षता घ्यावी ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टंन्स व तोंडाला मास्क लावावे , सर्दी ,खोकला, शिंका किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय दवाखाना किंवा डॉक्टरांशी संपर्क करावा, व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे ,असे आवाहन राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

Post a Comment