
श्रीरामपूर/विठ्ठल गोराणे-जगभरामध्ये कोरोना या विष्णुने थैमान घातले आहे. आणि भारतामध्ये सुद्धा आतापर्यंत हजारो नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे .अनेक नागरिक मृत्युमुखी पडली आहे. पडत आहे या कोरोना चे संकट असतानाच आता सारी नावाचे नवीन संकट आपल्या समोर अचानक उभे राहिले आहे . अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेकांना सारी ची लागण झाली असून रोज नवे रुग्ण सापडत आहे . आपण सर्व नागरिक मिळून या आजारात विरुद्धची युद्ध लढत आहोत यासाठी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून त्याप्रमाणे वागावे यातच आपले सर्वांचे राष्ट्रीय हित व देशाप्रती आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.सध्या अहमदनगर जिल्ह्यात, शहरात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन या आजाराचे सर्वेक्षण करत आहे . हे सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल अधिकारी, कर्मचारी, नगरपालिकेचे सफाई कामगार, आशा वर्कर हे युद्धातील आपले सैनिक आहे. आपण सर्वांनी त्यांना मदत करावी व त्यांचे मनोधैर्य वाढवावे आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी बांधव व भगिनींना यांचे बरोबर सौजन्याने वागावे त्यांना आपली व आपल्या कुटुंबाची व कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य संदर्भातील बारीक-सारीक सर्व गोष्टींची माहिती द्यावी तसेच आरोग्य अधिकारी कर्मचारी यांनी आपल्याकडे आधार कार्ड ओळखपत्राची मागणी केल्यास त्यांना झेरॉक्स कॉपी देऊन सहकार्य करावे. केंद्र सरकारने MPR ला स्थगिती दिली आहे त्यामुळे कोणीही. गैरसमज करू नये व अफवा पसरू नये. आरोग्य कर्मचाऱ्यांना अरेरावी न करता त्यांना सहकार्य करावे असे आवाहन संविधान बचाव समितीच्या वतीने अहमदभाई जहागीरदार,साजिद मिर्झा, मुजफ्फर शेख, मुन्ना पठाण, शाहिद कुरेशी,फिरोज पठाण ,जावेद तांबोळी, फिरोज दस्तगीर दस्तगीर,एफतेकार शेख, आदिममुखदूमी, नाजीश शहा,एजाज बारुदवाला,मुस्त किंन बागवान,राजू मलंग, यांनी केले.
Post a Comment