सावळीविहीरला फळे भाजीपाल्यांची दोनच दिवस चालू राहणार दुकाने.

सावळीविहीर राजेंद्र गडकरी राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस पुढील आदेश येईपर्यंत मंगळवार, शुक्रवार या दिवशीच चालू ठेवण्यात यावीत व  तशी ग्रामपंचायतची  संबंधित दुकानदारांनी परवानगी घ्यावी  अन्यथा  अशा दुकानदारांवर  कारवाई करण्यात येईल,  असा इशारा  सावळीविहीर चे ग्रामसेवक खर्डे व कामगार तलाठी गायके   यांनी एका पत्रकान्वये दिला आहे ,
 राहता तालुक्यातील सावळीविहीर येथे भाजीपाला, फळे यांची दुकाने सध्या आठवड्यातून सर्व दिवस सुरु असतात, त्यामुळे येथे गर्दी व लॉक डाऊन चे नियम मोडत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे सावळीविहीर येथे भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार आपले भाजीपाला व फळे दुकाने चालू ठेवावीत इतर दिवशी ते बंद ठेवावीत, व या आदेशाची आजपासून  अंमलबजावणी करण्यात यावी  ,असे एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे, 
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  गावात, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने व राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे तसेच राहता पंचायत समितीचे गटविकासअधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना  करण्यात येत आहेत, सर्वांप्रमाणे दुकानदारांनी नियम पाळणे गरजेचे आहे ,जर कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास अश्या दुकानदारांवर   कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, त्याच प्रमाणे गावातील जीवनावश्यक अशा किराणा दुकाने तसेच शेती पूरक व्यवसाय, हार्डवेअर दुकाने, हेही सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवावीत, इतर वेळी बंद ठेवावी, जर दुपारी एक नंतर अशी दुकाने सुरू असल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल ,त्याच प्रमाणे भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते किराणा दुकानदार, शेती पूरक व्यवसाय करणारे, हार्डवेअर दुकानदार ,आदी विक्रेत्यांनी आपल्या तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टंन्स पाळावेत, कोठेही थुंकू नये ,जर असे नियम मोडल्यास अशांवर कलम 144 प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तोंडाला मास्क  नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही थुंकणे,  अशांकडून  पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येईल ,असे या पत्रात  म्हटले आहे, या पत्रकावर सावळीविहीर चे कामगार तलाठी गायके यांच्याबरोबरच ग्रामसेवक खर्डे, सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे यांच्या सह्या आहेत,
 तरी प्रत्येकाने या आदेशाचे उल्लंघन करू नये ,लॉक डाऊन चे नियम सर्व गावातील नागरिकांनी पळावे, कोणीही  नियम तोडू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क लावावे ,असे आवाहन सावळीविहीर च्या सरपंच सौ रुपाली संतोष आगलावे व उपसरपंच सौ, वृषाली ओमेश जपे तसेच पोलीस पाटील सौ,सुरेखा सुरेश वाघमारे यांनी केले आहे,
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget