Latest Post

अहमदनगर - दिनांक २२/०४/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि, शेख जमीर रशीद रा.बोधेगाव ता.शेवगाव व रविंद्र पंढरीनाथ शिंदे रा.घोरतळे गल्ली बोधेगाव ता.शेवगाव हे त्यांचे राहते घरात महाराष्ट्र राज्यात सुगंधी तंबाखू विक्रीस बंदी असतानाही चोरुन मशीनरीचे सहाय्याने सुगंधी तंबाखु मिक्स करुन मावा तयार करुन विक्री करत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोहेकॉ/मनोज गोसावी, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना रविन्द्र कर्डीले, संतोष लोढे , राहुल सोळंके, रविंद्र घुगासे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहीदास नवगिरे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार दोन पंचासमक्ष बातमीतील पहील्या नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथील १)जमीर रशिद शेख रा.बोधेगाव ता.शेवगाव याचे राहते घरामध्ये व २) रविंद्र पंढरीनाथ शिंदे रा.घोरतळे गल्ली बोधेगाव ता.शेवगाव यांचे राहते घरामध्ये सुंगधी तंबाखूचे पुढे, तयार मावा, तसेच दोन मावा तयार करण्याच्या इलेक्ट्रीक मिक्सअप मशीन
असा एकुण १,६४,६००/- रु किंमतीचा मुददेमाल मिळुनआल्याने तो जप्त करुन पंचनामा करुन पुढिल कारवाई कामी शेवगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. सागर पाटील साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा.श्री. मंदार जावळे साहेब, उप.विभा.पोलीस अधिकारी साो, शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

अहमदनगर : अहमदनगरमधील कोरोनाबाधितांचा आकडा जेवढ्या वेगाने वर गेला, आता तेवढ्याच वेगाने तो खालीही येत आहे. बुधवारी बूथ हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत नगरमध्ये बरे झालेल्या रूग्णांची संख्या २० झाली आहे. आता केवळ ९ जणांवर उपचार सुरू आहेत.अहमदनगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ३१वर पोहोचला आहे. त्यातील कोपरगाव व जामखेड येथील दोघांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत २० जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आता बूथ हॉस्पिटलमध्ये केवळ ९ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यातील एक जिल्ह्याबाहेरील म्हणजे आष्टी तालुक्यातील आहे. तर श्रीरामपूर येथील रूग्णाचा मृत्यू पुणे येथे झाला आहे.आतापर्यंत जामखेड ५, संगमनेर ४, नगर शहर ८ व नेवासा १ अशा १८ जणांना डिस्चार्ज मिळाला होता. बुधवारी नगर शहरातील मुकुंदनगर व राहाता तालुक्यातील लोणी अशा दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या २० झाली आहे. त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

राहाता (प्रतिनिधी)- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील खुनाच्या गुन्ह्यातील राहाता येथील आरोपीला तपासासाठी घेऊन आलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर आरोपीने कुर्‍हाडीने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पैठणचे पोलीस उपनिरीक्षक संतोष माने जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपीवर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैठण येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील अटकेत असलेला आरोपी गोरख विठ्ठल लोखंडे (वय 36) रा. राहाता यास सोबत घेऊन खुनात वापरलेली हत्याराची जप्ती करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, सरकारी दोन पंच व सहाय्यक फौजदार मधुकर मोरे हे खाजगी वाहनाने 20 एप्रिल सायंकाळी सव्वासात वाजता राहाता येथील 15 चारी येथे आरोपीच्या घरी आले होते.यातील आरोपी लोखंडे याने यावेळी त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेली लाकडी दांड्या सहीत कुर्‍हाड देत असताना त्याच कुर्‍हाडीने तपासी अधिकारी संतोष माने व साक्षीदार यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्यावेळी सदरची कुर्‍हाड संतोष माने यांच्या हाताला लागल्याने ते जखमी झाले. याचवेळी त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍यांनी आरोपीस पकडून त्याच्याकडून कुर्‍हाड हिसकावून घेतली.या घटनेप्रकरणी उपनिरीक्षक संतोष माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी गोरख लोखंडे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 353, 332, 333 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती कळताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, राहात्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, यांनी भेट दिली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कंडारे करत आहेत.

अहमदनगर, दि. २१-  लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता  जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. ज्या अतिरिक्त बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्यात, कृषी, आस्थापना, सामाजिक क्षेत्र, वन उत्पादन, मत्स्य उत्पादन आणि पशू संवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयीसुविधा आदीसह विविध बाबींचा समावेश आहे. 
अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबविणेकामी यापूर्वीच खालीलप्रमाणे प्रतिबंधात्‍मक आदेश पारीत केलेले आहेत.  त्याची कार्यवाही सुरू राहणार असून जिल्‍हयातील कन्टेन्मेन्ट झोन वगळता विविध उपक्रमांचवअतिरीक्‍त बाबींचा समावेश करण्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत
1.जिल्‍हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅटोन्‍मेंट बोर्ड हद्दीमध्‍ये सर्व खाजगी वाहने व सर्व खाजगी प्रवासी वाहतुक करणा-या वाहनाच्‍या वाहतुकीत प्रतिबंध (आदेश क्र
आव्‍यमपु/कार्या 19अ/219/2020 दिनांक 22/03/2020 ) हा ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.       
.फौजदारी प्रकिया संहिता1973चे कलम 144 चे आदेशान्‍वये मनाई असलेल्‍या बाबी व सुट दिलेल्‍या बाबी (आदेश क्र.डी.सी./कार्या9ब1/855/2020, दि.14/04/2020) हा
दि.30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत पर्यंत दि.03 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
.फौजदारी प्रकिया संहिता1973 चे कलम 144 चे पेट्रोल व डिझेल विक्रीची वेळ निश्चित करणेबाबतचे आदेश (क्र.डी.सी./कार्या9ब1/856/2020, दि.15/04/2020) हे
दि.03 मे पर्यंत लागू राहणार आहेत.
.फौजदारी प्रकिया संहिता1973 चे कलम 144 चे औषधे व औषधेतर वस्‍तुंच्‍या विक्रीबाबत आदेश (क्र.डी.सी./कार्या9ब1/859/2020, दि.17/04/2020) दि.30 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आला होता. मात्र, त्याची मुदत पर्यंत दि.03 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
. अहमदनगर जिल्‍हयातील उदयोग / औदयोगीक आस्‍थापना (सरकारी व खाजगी दोन्‍ही) कार्यान्‍वीत करणेबाबत.(आदेश क्र
आव्‍यमपु/कार्या 19अ/328/2020 दिनांक 20/04/2020)  हा ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.       
 जिल्‍हयातील Containment Zone वगळता खालील उपक्रमांना (Activities) ( आदेश क्रं.डी.सी./ कार्या 9ब1/ 855 /2020,दि.14/04/2020)अन्‍वये वगळण्‍यात आलेल्‍या बाबींमध्‍ये खालील नमूद अतिरीक्‍त बाबींचा समावेश करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
क) कृषी विषयक बाबी:-  1) कृषी विषयक सर्व कामे .
 2) तुर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार सुरु राहतील
 3) ज्या ठिकाणी फळे, भाज्या, धान्ये यांचा लिलाव होतो, अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ घाऊक व्यापारी,अधिकृत /नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश करण्याची मुभा राहील. सदर लिलावांच्या ठिकाणी हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हॅण्ड वॉश, सॅनिटाईजर्स उपलब्ध  करुन देण्याची जबाबदारी सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती यांची असेल. तसेच लिलावाच्या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.आयुक्त,अहमदनगर  शहर महानगरपालिका व मुख्याधिकारी सर्व (नगरपालिका/नगरपंचायत)यांनी     
 त्यांचे कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ना आवश्यक ते सहकार्य करावे.
4) कृषी यंत्राशी संबंधित Custom Hiring  Centres (CHC) सुरु राहतील.
5) कृषी संबंधित उपकरणे/यंत्रे यांची  निर्मिती, वितरण व त्यांची किरकोळ विक्री करणारे सर्व दुकाने, दुरुस्ती करणारी सर्व दुकाने,खते, किटकनाशके व बी-बीयाणे यांची
दुकाने सुरु राहतील. 6) पिक कापणी, मळणी, काढणी यांच्या वापरात येणारी यंत्रे, उपकरणे उदा. हारवेस्टर व तत्‍सम यांना राज्यांतर्गत व आंतरराज्यीय वाहतूकीची परवानगी असेल.
7) शेतमाल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्‍पादन, साठवणुक, वाहतुक व विक्री.
ख) आस्‍थापना:-
1) इलेक्ट्रॉनिक माध्यमे(ब्रॉडकास्टींग, डीटीएच, केबल सेवा), माहिती  तंत्रज्ञान व त्यावर आधारीत सेवा (50% कर्मचारीसहीत), ग्रामपंचायत स्तरावरील सीएससी सेंटर्स सुरु राहतील. मात्र त्यांनी सदर सेवा पुरवितांना Social Distancing चे पालन काटेकोरपणे  करावे.
2) प्रिंट मिडीयाला दिनांक 20 एप्रिल2020 पासून सुट देण्यात आलेली आहे. वर्तमानपत्रे व मासिक यांचे द्वारवितरण ग्राहकाच्‍या पूर्वसंमतीने अनुज्ञेय राहिल. तथापि द्वारवितरण करणा-या व्‍यक्‍तीस सॅनिटायझर व मास्‍क वापरणे बंधनकारक राहिल. तसेच त्यांनी Social Distancing  चे पालन काटेकोरपणे करावे.
3) कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी  सुरक्षा सेवा, इमारतींचे देखभालीकरीता सहाय्यभुत ठरणा-या व्यवस्थापन सुविधा सुरु राहतील.
4) विज निर्मिती, वितरण आणि पारेषण यांचेकरीता आवश्यक असणा-या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर्सची दुरुस्ती करणारे दुकाने वर्कशॉप सुरु राहतील.
घ) सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम:-
1) बालके/दिव्यांग/मनोरुग्ण/जेष्ठ नागरीक/बेघर/निराधार महिला विधवा यांची निवारागृहे, निवासगृहे सुरु राहतील.
2) अल्पवयीन मुलांची निवारागृहे व निरीक्षणगृहेसुरु राहतील.
3) जेष्ठ नागरीक/विधवा/स्वातंत्र्य सैनिक/संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना यांच्या निधीचे वाटप, तसेच निवृत्तीवेतन व भविष्य निर्वाह निधी विषयक सेवा सुरु राहतील.
4) सर्व अंगणवाडी सेविका या दर पंधरा दिवसाला बालके, महिला, स्तनदा माता यांचा पोषण आहार घरपोच देतील. कोणत्याही लाभार्थ्याला अंगणवाडीत बोलावले जाणार नाही.
च) मत्‍सोत्‍पादन व पशुसंवर्धन:-
1) मत्स्यव्यवसाय व त्या संबंधित प्रक्रिया करणारे सर्व उद्योग  सुरु राहतील.
2) मत्स्य बीज उत्पादन व खाद्य पुरवठा करणारे उद्योग सुरु राहतील.
3) दुध व दुग्धजन्य पदार्थ यांची खरेदी, विक्री,
प्रक्रीया, वितरण करणारे, वाहतूक व पुरवठा
करणा-या यंत्रणा सुरु राहतील.(सकाळी 5 ते 8 व सायं. 5.00 ते 7.00 वाजेपर्यंत)
4) पशुसंवर्धनाशी संबंधित गोशाळा, पोल्ट्री फार्मव पशूखाद्याशी संबंधित असलेले, कच्च्या मालाचा पुरवठा करणारे उदा. मका व सोया सर्व घटक सुरू राहतील.
छ) वनोत्‍पादन संबंधित:-
1) पेसा, बिगर पेसा व वनविभागाचे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये तेंदूची पाने गोळा करणे, वनोषधी गोळाकरणे, प्रक्रीया करणे, वाहतूक व विक्री व तत्सम उद्योग सुरु राहतील.
2) वनातील इमारती लाकूड गोळा करुन लाकूड डेपोमध्ये साठा/ वाहतूक/विक्री करता येईल.
ज) वित्‍तीय क्षेत्र:-
1) SEBI अंतर्गतचे बाजारसेवा, IRDA अंतर्गत असलेल्या विमा कंपन्या, को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी.
झ) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील सर्व कामे :- 1) Social Distancing चे पालन करुन सुरु राहतील व योजनेत काम करणारे सर्व कर्मचारी/मजूर यांनी काम करतांना मास्कचा वापर करावा
तसेच मनरेगाची कामे हाती घेतांना जलसिंचन वजलसंधारण विभागातील कामांना प्राधान्य
देण्यात यावे.
ट) सार्वजनिक सोयीसुविधा:-
1) पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी पीएनजी  इ. इंधन आणि गॅस क्षेत्रातील कामे
उदा. Refining, वाहतूक, वितरण, साठवणूक वविक्री सुरु राहील (पेट्रोल विक्रीची वेळ सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत व डिझेल, सीएनजी विक्रीची वेळ सकाळी 05.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंतच राहील).
2) विज निर्मिती, पारेषण व वितरण सुरु राहील.
3) पोस्टल सेवा (पोस्ट ऑफिस सहीत) ,कुरिअर सेवा देणा-या आस्थापना, टेलीकम्युनिकेशन व  इंटरनेट  सेवा सुरु राहतील.
4) महापालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थामधील पाणी पुरवठा, स्वच्छता आणि कचरा
 व्यवस्थापनाची कामे सुरु राहतील.
5) दुष्काळ, टंचाई यांच्या निवारणासाठीची सर्व कामे सुरु राहतील.उदा. टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, वाहनाद्वारे पशुखाद्य पुरवठा करणे.
ठ) वाहतूक क्षेत्र:-
1) सर्व वस्तू व मालाची वाहतूक, ने-आण करता येईल. रेल्वेद्वारे वस्तू, माल, पार्सल यांची ने-आण करता येईल.
2) सर्व प्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारे
 ट्रक व तत्सम वाहने हे वाहतूक करतांना केवळ दोन चालक व एक हेल्पर यांच्यासोबतच वाहतूककरतील. तसेच माल, वस्तू पोहोच केल्यानंतर
रिकाम्या झालेल्या वाहनांना देखील वाहतूकी साठी परवानगी असेल, तथापि वाहन
चालवणाऱ्या कडे वैध परवाना असणे अनिवार्य राहील.
3) ट्रक व तत्सम माल वाहतूक करणा-या वाहनांची दुरुस्ती करणारी दुकाने सुरु राहतील. तथापि संबंधितांना  केंद्र व राज्य शासनाच्या सुचना,
आदेश, निर्देशांचे गांर्भियाने पालन करावे लागेल व SocialDistancing चे नियम पाळावे
लागतील.
4)  रेल्वे वाहतुकीच्‍या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी/ कर्मचारी, कंत्राटी कामगार यांना संबंधितआस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल.
5) अत्यावश्यक सेवांकरीता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहनचालक व पाठीमागील सिटवर केवळ एक व्यक्ती आणि दुचाकी वाहनां करीता केवळ वाहन चालक यांनाच परवानगीगराहील.मात्र जिवनावश्‍यक
वस्‍तूंचे खरेदीकरीता लोकांनी जवळचे दुकानावर पायीच जाणे अभ्रिप्रेत आहे.(कोणत्याही प्रकारच्या टॅक्सीऑटो रिक्षा,सायकल रिक्षा,खाजगी दुचाकी व खाजगी कार यांना कोणत्याही प्रकारे वाहतूकीची परवानगी असणार नाही.)
6) औदयगिक आस्‍थापनांकरीता यापूर्वी दिलेले   आदेश ( क्रं.आव्‍यमपु/कार्या19अ/328/2020 दिनांक 20/04/2020) लागू राहतील.
ड) बांधकाम क्षेत्र:-
1) रस्ते बांधणी, सिंचन प्रकल्प,सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पांची बांधकामे (ग्रामीण भागातील सुक्ष्म, लघू व मध्यम प्रकल्पासहीत), पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा करणा-या तारा ओढणे, ऑप्टीकल केबल/ फायबर यांचेशी संबंधित बांधकामे सुरु राहतील. तथापि संबंधित कामांची पडताळणी त्या त्या विभागातील संबंधित अधिकारी यांनी करावी. तसेच या प्रकारच्या कामावर असणा-या मजूरांची जेवण व राहण्याची सोय संबंधित ठेकेदार यांनीच करावी व Social Distancing चे पालन केले जाईल, याची दक्षता  घ्यावी. कामाच्या ठिकाणी  हात धुण्यासाठी पुरेशी सुविधा, मास्क,सॅनिटाईजर्स उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार यांची राहील.
2) अत्यावश्यक मान्सुन पूर्व कामे, रिन्युएबल
उर्जा प्रकल्पांची कामे सुरु राहतील.
4) ज्या ठिकाणी कामावर कामगार उपलब्ध आहेत व बाहेरील ठिकाणाहून कामगार आणण्याचीपरवानगी आवश्यकता नाही, अशा प्रगतीपथावरअसणा-या बांधकाम प्रकल्पांची  महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील कामे सुरू राहतील. तथापि कोणत्याही नव्या कामास परवानगी असणार नाही.
या आदेशाप्रमाणे वरील बाबींना सुट दिलेली असली तरी लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक आहे. उपरोक्‍त आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45)चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर-दिनांक २०/०४/२०२० रोजी श्री प्रशांत संभाजी निमसे, वय २९, रा. लेखानगर सावेडी, अ.नगर यांनी
फिर्याद दिली कि, दि. १८/०४/२०२० ते दिनांक २०/०४/२०२० चे दरम्याण माझे हॉटेल राजनंदीनी परीमिटरुम
अॅण्ड बार चे दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन १,०८,६७७/- रु किमतीची विदेशी दारु फिर्यादीचे
संमतीशिवाय चोरुन नेली. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्याद वरुन तोफखाना पो.स्टे, गु.र.नं. 1
३१२१/२०२० भादबी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गन्हयाचा पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी
कर्मचारी यांचे मदतीने समांतर तपास करत असतांना गोपनिय माहिती मिळाली कि,सदर गुन्हा हा राजु रामा दास,रा. परीचय हॉटेलचे मागे, सावेडी, अ.नगर याने त्याचे दोन साथीदारांसह केला असुन तो घरीच असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील पोहेकॉ/दत्ता गव्हाणे,पोना रविंद्र कर्डीले, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/रणजीत जाधव, असे सदर ठिकाणी जावुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) राजु रामा दास उर्फ, दिपक सुरण नेटके, वय २६, रा. परीचय हॉटेलचे
मागे, सावेडी, अ.नगर,मुळ रा. यांडगा, तुरवरीया जि. बारसर, राज्य ओरीसा असे असल्याचे सांगितले त्यास सदर
गुन्हया बाबत चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा मित्र २) प्रसाद भारत पांडव, रा. बेरुळ, ता. खुलताबाद जि.
औरगाबाद व ३) रणजीत नाईक,रा. नालेगाव ता.जि. अ.नगर असे आम्ही केला असल्याचे सांगितले. त्यास
गुन्हयातील मुददेमाला बाबत विचारले असता त्याने घरात असलेले एक टकीलो कं. चा ७५० कं. चा दारुची
काचेची काढुन दिली व सदरची बाटली ही गुन्हयातील चोरी गेले मुददेमालातील असल्याचे सांगुन बाकी मुददेमाल
क्र. ३) रणजीत नाईक याचेकडे असल्याचे सांगितल्याने त्याबाबत जप्ती पंचनामा जागीच करण्यात आला आहे.
तसेच आरोपी क्र. २ व ३ यांचा शोध घेतला असता क्र. २) प्रसाद भारत पांडव, वय २२, रा. वेरुळ, ता.
खुलताबाद जि. औरगाबाद हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व आरोपी क्र.३ हा मिळून आला नाही तरी
आरोपी क्र.१ व २ यांना जप्त मुददेमालासह तोफखाना पो.स्टे. येथे समक्ष हजर केले असुन पुढील तपास तोफखाना पो.स्टे करीत आहे. वरील आरोपी विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.आरोपी नामे राजुरामा दास उर्फ, दिपक सुरज नेटके याचे विरुध्द दाखल गुन्हे
१) कोतवाली पो.स्टे. गु.र.नं.१ ६७/१५ भादवी कलम ३९४
२) कोतवाली पो.स्टे. गु.र.नं. १७६५/१९ भादवी कलम ३९२,३४
आरोपी नामे प्रसाद भारत पांडव, वय २२, रा. वेरुळ, ता. खुलताबाद जि. औरंगाबाद याचे विरुध्द दाखल गुन्हे
१) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. ७९४/१९ भादवी कलम ४५७,३८०
२) एम.आय.डी.सी. पो.स्टे. गु.र.नं. ४२९/१९ भादवी कलम ३७९ ।
३) वेदांतनगर,औरगाबाद पो.स्टे. गु.र.नं. १३३/१९ भादवी कलम ३७९
सदरची कारवाई मा.श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर,मा.श्री सागर
पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अ.नगर व मा. श्री. संदिप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस
अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व
कर्मचारी यांनी केलेली आहे.


भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोन्धवनी भैरवनाथ नगर येथे  मावलया मळा रोडवर स्मशान भुमी समोर भर दुपारी महावितरनच्या विजेच्या तारा खाली लोळ घेतल्यामुळ जनावरांचा ज्वारी चा कडबा  घेऊन जात आसलेली मालवाहू पिक अप MH -16 Q 6467 या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श होताच मालवाहू पिक अप ने पेट घेतला त्यात गाडी सह ज्वारीचा कडबा जळुन खाक झाला.       
  दरम्यान गाडी मालक प्रकाश रावसाहेब वायकर यांनी अग्नीशमक बोलवुन आग विझवन्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतू तोपर्यंत पिकअप चे मोठ्या प्रमाणात आगीने नुकसान झाले आहे. आधिच को रो ना च्या संकटात शेतकरी संकटात सापडलेला आसताना महावितरन च्या गलथान पनामुळे अशा घटना घडायला लागल्या आहेत.                        तरी या भैरवनाथ नगर परीसरातील झोळ खाउन खाली आलेल्या तारा महावितरन ने व्यवस्थित करुन घ्याव्यात व प्रकाश  वायकर  या होतकरु तरुनास नुकसान भरपाई मिळावी  अशी मागणी भैरवनाथ नगर चे तंटामुक्ती चे अध्यक्ष बाळासाहेब दिघे व सामा.कार्यकर्ते  दत्तात्रय कांदे यांनी केली आहे.

सोनई -बांजोळी ता. नेवासा येथील खडी चोरणा.या तीन चोरांना अटक करुन त्यांचेकडुन चोरीस गेलेली खडी. जे सी
बी मशीन व दोन उपर असा एकुण १९ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त- सोनई पोलीसांची
कारवाई दि. 4/०४/२०२० रोजी भाउसाहेब.सोपान सोनवणे, वय ५३ वर्ष, धंदा सिव्हील कॉन्ट्रैक्टर, रा सोनई, ता नेवासा ।
यांचे मालकिवी वांजोळी ता.नेवासा येथील ३ लाख रुपये किंमतीची १५० बारा खड़ी दि.२१/३/२०२० व दि. २२/03/२०२० ।
रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयाने घोरुन नेली आहे." अशी फिर्याद दिल्याने सोनई पो.स्टे.ला ग.र.न.१२६/२०२० भादवि ।
कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे
यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका/१५९६ दत्तात्रय मोहन गावडे, पोहेकॉ/२९२ संजय बाबुराव चहाण, पोना/२०२२ शिवाजी
नामदेव माने व पोका/३१६ विठठल पोपट थोरामा य पोकॉ गणेश कुंडलीक आडागळे यांनी सदर गुन्हयाचा कौशल्याने व
कसोशीने तपास करान गुणा बातमीदारां मार्फत बातमी काढुन गुन्हयातील आरोपी नामे १) विजय एकनाथ पवार यय २९ वर्ष
रा.शिगवेतुकाई ता.नेवासा २) सतिष शिवाजी खंडागळे यय २८ वर्षे रा वांजोळी ता नेयासा ३) शानेश्वर बाळासाहेब पटारे ।
वय २८ वर्षे रा पटारे वस्ती लोहोगाव ता नेवासा यांना अटक करुन त्यांचेकडुन खडी भरण्यासाठी वापरलेला जे.सी.मा.
मशिन नबर एम.एच.१६, AM६८९९, व दोन ढपर नंबर.एम.एच.१७.ए.जी.०२११ य एम.एच. ०४.सी.य.७१४३ य थोरीस
गेलेली खडी जप्त करण्यात आली आहे.असम एकुण १९ लाख ६० हजार किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.'
सदर कारवाई हा मा.पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह सो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती
दिपाली काळे महम श्रीरामपुर, मा पोलीस उपअधिक्षक मंदार जावळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग
शेवगाव याच मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोहेकॉ दत्तात्रय मोहन
गावंडे , पोहका संजय बाबुराव चव्हाण, पोना शिवाजी नामदेय माने, पो कॉ विठठल पोपट थोरात, पोको बाबा अशोक
वाघमोडे, पोकॉ गणेश कुंडलीक आडागळे यांनी केली आहे..

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget