राजनंदिनी परीमीट रुम अँँण्ड बिअर बार चे दरवाजा तोडुन विदेशी दारु चोरणा-या आरोपींना ३६ तासात स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांनी केले जेरबंद

अहमदनगर-दिनांक २०/०४/२०२० रोजी श्री प्रशांत संभाजी निमसे, वय २९, रा. लेखानगर सावेडी, अ.नगर यांनी
फिर्याद दिली कि, दि. १८/०४/२०२० ते दिनांक २०/०४/२०२० चे दरम्याण माझे हॉटेल राजनंदीनी परीमिटरुम
अॅण्ड बार चे दरवाजाचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन १,०८,६७७/- रु किमतीची विदेशी दारु फिर्यादीचे
संमतीशिवाय चोरुन नेली. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्याद वरुन तोफखाना पो.स्टे, गु.र.नं. 1
३१२१/२०२० भादबी कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गन्हयाचा पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी
कर्मचारी यांचे मदतीने समांतर तपास करत असतांना गोपनिय माहिती मिळाली कि,सदर गुन्हा हा राजु रामा दास,रा. परीचय हॉटेलचे मागे, सावेडी, अ.नगर याने त्याचे दोन साथीदारांसह केला असुन तो घरीच असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील पोहेकॉ/दत्ता गव्हाणे,पोना रविंद्र कर्डीले, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/रणजीत जाधव, असे सदर ठिकाणी जावुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) राजु रामा दास उर्फ, दिपक सुरण नेटके, वय २६, रा. परीचय हॉटेलचे
मागे, सावेडी, अ.नगर,मुळ रा. यांडगा, तुरवरीया जि. बारसर, राज्य ओरीसा असे असल्याचे सांगितले त्यास सदर
गुन्हया बाबत चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा मित्र २) प्रसाद भारत पांडव, रा. बेरुळ, ता. खुलताबाद जि.
औरगाबाद व ३) रणजीत नाईक,रा. नालेगाव ता.जि. अ.नगर असे आम्ही केला असल्याचे सांगितले. त्यास
गुन्हयातील मुददेमाला बाबत विचारले असता त्याने घरात असलेले एक टकीलो कं. चा ७५० कं. चा दारुची
काचेची काढुन दिली व सदरची बाटली ही गुन्हयातील चोरी गेले मुददेमालातील असल्याचे सांगुन बाकी मुददेमाल
क्र. ३) रणजीत नाईक याचेकडे असल्याचे सांगितल्याने त्याबाबत जप्ती पंचनामा जागीच करण्यात आला आहे.
तसेच आरोपी क्र. २ व ३ यांचा शोध घेतला असता क्र. २) प्रसाद भारत पांडव, वय २२, रा. वेरुळ, ता.
खुलताबाद जि. औरगाबाद हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व आरोपी क्र.३ हा मिळून आला नाही तरी
आरोपी क्र.१ व २ यांना जप्त मुददेमालासह तोफखाना पो.स्टे. येथे समक्ष हजर केले असुन पुढील तपास तोफखाना पो.स्टे करीत आहे. वरील आरोपी विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.आरोपी नामे राजुरामा दास उर्फ, दिपक सुरज नेटके याचे विरुध्द दाखल गुन्हे
१) कोतवाली पो.स्टे. गु.र.नं.१ ६७/१५ भादवी कलम ३९४
२) कोतवाली पो.स्टे. गु.र.नं. १७६५/१९ भादवी कलम ३९२,३४
आरोपी नामे प्रसाद भारत पांडव, वय २२, रा. वेरुळ, ता. खुलताबाद जि. औरंगाबाद याचे विरुध्द दाखल गुन्हे
१) श्रीरामपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. ७९४/१९ भादवी कलम ४५७,३८०
२) एम.आय.डी.सी. पो.स्टे. गु.र.नं. ४२९/१९ भादवी कलम ३७९ ।
३) वेदांतनगर,औरगाबाद पो.स्टे. गु.र.नं. १३३/१९ भादवी कलम ३७९
सदरची कारवाई मा.श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर,मा.श्री सागर
पाटील साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अ.नगर व मा. श्री. संदिप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस
अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व
कर्मचारी यांनी केलेली आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget