भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोन्धवनी भैरवनाथ नगर येथे मावलया मळा रोडवर स्मशान भुमी समोर भर दुपारी महावितरनच्या विजेच्या तारा खाली लोळ घेतल्यामुळ जनावरांचा ज्वारी चा कडबा घेऊन जात आसलेली मालवाहू पिक अप MH -16 Q 6467 या गाडीचा विजेच्या तारेला स्पर्श होताच मालवाहू पिक अप ने पेट घेतला त्यात गाडी सह ज्वारीचा कडबा जळुन खाक झाला.
दरम्यान गाडी मालक प्रकाश रावसाहेब वायकर यांनी अग्नीशमक बोलवुन आग विझवन्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतू तोपर्यंत पिकअप चे मोठ्या प्रमाणात आगीने नुकसान झाले आहे. आधिच को रो ना च्या संकटात शेतकरी संकटात सापडलेला आसताना महावितरन च्या गलथान पनामुळे अशा घटना घडायला लागल्या आहेत. तरी या भैरवनाथ नगर परीसरातील झोळ खाउन खाली आलेल्या तारा महावितरन ने व्यवस्थित करुन घ्याव्यात व प्रकाश वायकर या होतकरु तरुनास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भैरवनाथ नगर चे तंटामुक्ती चे अध्यक्ष बाळासाहेब दिघे व सामा.कार्यकर्ते दत्तात्रय कांदे यांनी केली आहे.
Post a Comment