शिर्डी (राजेंद्र गडकरी/जितेश लोकचंदानी)
सध्या देशात व राज्यात कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली असून सध्या सर्वत्र लॉकं डाऊन सुरू आहे ,त्यामुळे सर्वत्र बंद आहे, अशा परिस्थितीत. सर्वसामान्य गोरगरीब व मजूर असंघटित कामगार यांची आर्थिक चणचण सुरू झाली असून अशा गरजू व्यक्तींना व कुटुंबातील सदस्यांना राज्यातील विविध देवस्थाने व ट्रस्ट यांच्या प्रसादालयातून भोजनाची पाकिटे किंवा नाश्ता पाकिटे त्या त्या परिसरात कॅम्पमध्ये ,शिबिरांमध्ये देण्यात यावीत, त्यामुळे प्रशासनाचा भारही हलका होईल ,अशी मागणी सध्या सुज्ञ नागरिकांकडून होत आहे, तसेच राज्यातील विविध सामाजिक संस्था संघटना यांनीही पुढे येऊन त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे ही चर्चा सध्या होऊ लागली आहे,
सध्या कोरोना मुळे देशात, राज्यात हाहाकार उडाला आहे, राज्यात तर कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, देशभरात तीन मेपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे, राज्यातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद आहे ,सर्वत्र कामधंदा ,दुकाने बंद आहे, सर्व काही बंद असल्यामुळे व कर्फ्यू लागू असल्यामुळे सर्व जण घरात आहेत, मात्र अशा परिस्थितीत घरात किती दिवस बसणार। असा सर्वसामान्य पुढे प्रश्न निर्माण झाला आहे ,कामधंदा नाही, आर्थिक चणचण भासत आहे, त्याचप्रमाणे परराज्यातून किंवा राज्यातील इतर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात मोलमजुरीसाठी पोटापाण्यासाठी अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत, मात्र सध्याची परिस्थिती पाहता अनेक मजूर ,असंघटित कामगार हे वाहने बंद असल्यामुळे रात्रीचे आपल्या मुला-बाळांना व सामान घेऊन जाताना दिसत आहे ,किंवा काहीजण आपल्या छोट्याशा झोपडीत कसेबसे जीवन जगत आहे, प्रशासन अशा सर्व लोकांसाठी आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे ,परंतु तरीही ती अपुर्णच पडत आहे ,गावागावात, शहराशहरात असे अनेक कुटुंबे आहेत की त्यांना सध्या रोजीरोटीचा प्रश्न पडला आहे, त्यामुळे राज्यात मोठे श्रीमंत देवस्थाने आहेत, शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ,पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी माता संस्थान, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान, शेगावचे गजानन महाराज संस्थान अक्कलकोट, शनिशिंगणापूर सिद्धिविनायक ,असे अनेक मोठे व श्रीमंत देवस्थाने राज्यात आहेत, व ह्या देवस्थानाकडे प्रसादालय ,कर्मचारी, किराणा मालाचा पुरवठा, स्वच्छता, दवाखाना ,डॉक्टर, सर्व यंत्रणा तत्पर आहे, सध्या ही सर्व देवस्थाने बंद आहेत, कर्मचारीही मोजकेच कामावर आहेत, बाकीचे घरीच आहेत ,अशां देवस्थाना मार्फत गरजू व्यक्तींना भोजनाची पाकिटे ,अन्नाची,नाष्टाची पाकिटे आपल्या प्रसादालयात नित्य प्रमाणे बनवून ती प्रशासनाच्या सहकार्याने आपापल्या परिसरात प्रशासनामार्फत ती गोरगरीब व हातावर पोट भरणारे झोपडपट्टी , वसाहतीमध्ये वाटपकेली तर प्रशासनावरचा ताण हलका होईल तसेच कोणाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स नर्स आरोग्य कर्मचारी सेविका पोलीस सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील व्यक्ती घ्या या संकट समयी काम करत आहे परंतु सर्व काही बंद असल्यामुळे अनेक ठिकाणी चहा नाष्टा भोजन मिळणेही दुरापास्त आहे तेव्हा देवस्थाने सामाजिक संस्था यांनी स्वच्छता चे नियम पाळत अशा गोष्टींची वस्तूंची खाद्यपदार्थांची योग्यरीतीने प्रशासनामार्फत राज्यातील विविध भागात विविध ठिकाणी अडचणीच्या दुर्गम भागात मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे प्रशासनाला व शासकीय अधिकाऱ्यांनाही मोठा हातभार लागेल, कारण सध्या कोरोना मुळे देशात राज्यात सर्वत्र मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे ,अशा परिस्थितीत राज्य सरकार केंद्र सरकार जरी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करीत असले तरी ती अपूर्णच पडत आहे ,त्यामुळे देशहित व माणुसकीचे नाते जपत प्रत्येक देवस्थानने तसेच सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, राज्यातील काही देवस्थानांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहेच, देवस्थानानीं आर्थिक मदत केली आहे ,परंतु आता या संकट समयी सर्वकाही यंत्रणा बंद असल्यामुळे मनुष्यबळ सुद्धा गरजेचे आहे स्वयंपाक बनवणे ,वाटप करणे व तेही लॉक डाऊन चे नियम पाळत हे सर्व करणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी देवस्थानचे कर्मचारी यांचा उपयोग होऊ शकतो, सर्वसामान्य गोर-गरीब व मजूर कामगार ,असंघटित कामगार, अशा हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबासाठी पुढे येऊन प्रशासनाला मदत करत प्रशासनाच्या सहकार्याने अशा गोरगरीब ,गरजूना भोजनाची पाकिटे किंवा अन्नाची पाकिटे पोहोचून दिली तर ती मदत खूप महत्त्वाची ठरणार आहे तर याचा राज्यातील देवस्थानानी विचार करावा व राज्य प्रशासनाने सुद्धा देवस्थानला तशा सूचना कराव्यात अशी मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून होऊ लागली आहे,
