(शिर्डी जितेश लोकचंदानी )
राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील हॉटेल बाबाज परमिट रूम चे शटर फोडून या हॉटेल मधील दारू चोरनारे सहा आरोपी व त्यात आणखी एक महिला असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती, व त्यानंतर या आरोपींना उशिरा जामीनही मंजूर झाला आहे,
शिर्डी जवळील सावळीविहीर येथील नगर मनमाड महामार्ग लगत असणारे हॉटेल बाबाज परमिट रूम हे लॉक डाऊन मुळे बंद होते ,याचाच फायदा घेत काही चोरट्यांनी ह्या हॉटेलचे शटर तोडून या हॉटेल मधील सुमारे एक लाख सात हजार 840 रुपयाची देशी-विदेशी दारू, बियर चोरून नेली होती, अशा काही आरोपींना पोलिसांनी तातडीने हालचाली करून पकडले, त्यामध्ये महेश नारायण कापसे, विशाल अशोक आगलावे आशिष बबन शेलार, भोलेनाथ विजय चंदनकर, तसेच चोरीची दारू घेणारे व दाम दुप्पट किमतीला विकणारे मनोज विश्वनाथ वाघ व विजय भानुदास चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली होती, या सहा जणांना आज पर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती, आज दि,२१ला त्यांना न्यायालयात नेले असता याआरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, शिवाय या दारू चोरीप्रकरणी या 6 आरोपीबरोबरच। सोनी विनोद जाधव या महिला आरोपी सावळीविहीर चीच आहे या चोरी प्रकरणाचा तपास ए
.पी.आय रूपवते करीत आहे ,यात आतापर्यंत सात आरोपी झाले अजूनही काही ही चोरीची दारू घेणारे बाहेर फिरत असल्याची चर्चा शिर्डी व परिसरात होत आहे, या बड्या व राजकीय संबंध असणाऱ्या लोकांना मोकळीक दिली जात आहे की काय अशी चर्चा आहे , त्यांची कसून चौकशी व्हावी व यात चोरी प्रकरणात आणखी कोण कोण आहे । तसेच हॉटेल बाबाच परमिट रूम दारू चोरी प्रकरणात एक लाख सात हजार आठशे चाळीस रुपयाची दारू चोरीस गेली होती मात्र पोलिसांनी या आरोपींकडून दहा ते पंधरा हजार रुपयाची दारू विविध ठिकाणाहून जप्त केली ,मात्र बाकीची दारू कुठे गेली ,असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहे ,तेव्हा उर्वरित चोरी गेलेला दारूचाही तपास करावा व त्यांच्यावरील कारवाई व्हावी ,अशी मागणी परिसरातून होत आहे.
Post a Comment