(शिर्डी राजेंद्र गडकरी /जितेश लोकचंदानी)
सध्या देशात व असून या कारोणामुळे डॉक्टर ,नर्स ,पोलीस यांच्या बरोबरच आता पत्रकारांनाही या कोरोणाचा विळखा बसू लागला आहे , डॉक्टर ,पोलीस ,शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणेच पत्रकारही या कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी, अपडेट वार्तांकन करण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत, अशा परिस्थितीत पत्रकारही आता या कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू लागले आहेत, मुंबईतील ५६ पत्रकारांना करोनाची लागण झाल्याने राज्यात देशात मोठी खळबळ उडाली आहे ,
मुंबईत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही कोरोना साथीने गाठले आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर आता अहवाल प्राप्त झाले असून त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विविध पत्रकार संघटनांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेच्या वतीने माध्यम प्रतिनिधींसाठी करोना चाचणी मोहीम घेण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य पथकाने एकूण १६८ जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. यापैकी बहुतांश नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५३ जणांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता ही संख्या 56 झाली आहे, करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर व पत्रकारांचा समावेश आहे. यात ज्यांच्यात तीव्र लक्षणे आहेत ,त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सौम्य लक्षणे असलेल्या बाकी सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील ५६पत्रकारांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चिंता वाढली आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचवेळी या पत्रकारांच्या कुटुंबीयांची तपासणी केली जाणार आहे तसेच हे पत्रकार ज्या इमारतींत राहतात त्या इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करून इमारती सील करण्याची कारवाई पालिकेच्या पथकांकडून सुरू करण्यात आली आहे. प्रतीक्षानगरमध्ये पत्रकारांचे वास्तव्य असलेली एक इमारत कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर करत आज दुपारनंतर सील करण्यात आली आहे. या इमारतीतील सर्व कुटुंबांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पत्रकारांना कोरोना झाल्याची बातमी चिंता वाढवणारी आहे. पत्रकार अत्यावश्यक सेवेत येतात. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतात. त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना ५० लाखाचा विमा सरकारने द्यावा, अशी मागणी पत्रकार संघटनेकडून करण्यात येत आहे, याबाबत त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही गरज आहे.
सध्या कोरोना मुळे सर्व जग ,देश राज्य हैराण झाले आहे, अशा परिस्थितीत पत्रकार ,डॉक्टर पोलीस शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जीव धोक्यात घालून काम करत आहे ,मात्र पत्रकारिता करताना पत्रकारांनी आता दक्षता घेत वार्तांकन करणे गरजेचे आहे, आपले जीवन व आपले कुटुंब याकडे लक्ष देणे गरजेचे आहे ,त्यामुळे यापुढे तरी राज्यातील प्रत्येक पत्रकारांनी काम करताना दक्षता ठेवून काम करावे, असे आवाहनही सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येऊ लागले आहे.
Post a Comment