श्रीरामपूर (प्रतिनिधी)श्रीरामपुरात क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या एका मोठ्या डॉक्टरांना आज नगर येथे क्वॉरंटाईन
करण्यासाठी हलविण्यात आले.याबाबत दुपारी विविध तर्कवितर्क आणि चर्चना ऊत आला होता. याबाबतची अधिक माहिती अशी की, नेवासा येथील एका पेशंटला श्रीरामपुरातील डॉक्टरांनी तपासल्यानंतर सदर पेशंट नंतर कोरोनाग्रस्त असल्याचे रिपोर्टवरुन पुढे आले त्यामुळे श्रीरामपुरातील दोघा डॉक्टरांसह ८ जणांच्या स्रावचे नमुने तपासण्यात आले ते सर्व निगेटीव्ह निघाले. त्यामुळे सर्वांना हायसे वाटले. त्यानंतर या सर्वांना
श्रीरामपुरातच कॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र आज सोमवारी या ठिकाणी क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या एका डॉक्टरांना नगर येथे क्वॉरंटाईन करण्यासाठी नेण्यात आले.ही माहिती कॉरंटाईन असलेल्या इतरांना तसेच रुग्णालयातील लोकांना समजल्याने त्याची चर्चा सर्वत्र पसरली.दरम्यान श्रीरामपूर शहर
आणि तालुक्यात एकही नवीन कोरोनाचा संशयित रुग्ण नसल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. लोकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लॉक डाऊनच्या काळात घरातच थांबून प्रशासनास
Post a Comment