लॉकडाऊनचा फायदा घेत , ग्रामीण भागात हार्वेस्टर वाल्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट.
सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतीचे कामे सुरू झाली आहेत, सध्या गहू सोगंणीची कामे जोरात सुरू आहेत ,परंतु या लॉकडाऊन काळात शेतमजूर मिळेनासे झाले आहे ,त्याचप्रमाणे परराज्यातून दरवर्षाप्रमाणे येणारे हार्वेस्टर मशीन यावर्षी आले नसल्याने, स्थानिक हार्वेस्टर वाल्यांनी अचानक याचा फायदा घेत गहू काढण्यासाठी प्रत्येक एकराचे भाव वाढवले आहेत, त्यामुळे मुळातच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना हार्वेस्टर मालकांनी भाव अचानक वाढवल्यामुळे आणखीन मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे,
सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, यापूर्वी शेतीचे कामे बंद होते, परंतु केंद्रीय कृषिमंत्र्यांनी नुकतीच शेतीच्या कामाला लॉकडाऊन चे नियम पाळत सवलत दिली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात शेतातील उभे पीके सोंगणीच्या कामांनी सध्या जोर पकडला आहे ,सध्या गहू करण्याचे काम जोरात सुरू आहे ,मात्र सध्या शेतमजूरही मिळेनासे झाले आहे ,त्यामुळे शेतकरी ग्रामीण भागात गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसत आहेत, मात्र हार्वेस्टर मशीन मालकाकडून, चालकाकडून भावही वाढवण्यात आला आहे, सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे , शेतातील उत्पादित धान्य, कांदा , फुले ,फळे, बहुतांशी भाजीपाला व इतर शेतीत उत्पादन होणाऱ्या वस्तू, मार्केट बंद असल्यामुळे बाजारात नेता येत नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कमाई सध्या बंद आहे, सर्वजण कामधंदे सोडून आत्तापर्यंत घरात होते ,परंतु आता शासनाने शेतीच्या कामांना लॉकडाऊन मधून वगळण्यात आल्यामुळे, आता शेतकरी शेतीच्या कामावर जोर देत आहे,गहू सोंगणीला आल्यामुळे व तो लवकर काढणे गरजेचे असल्यामुळे मात्र नेहमीप्रमाणे या लॉक डाऊन काळात शेतमजूर मिळत नसल्याने नाविलाजाने हार्वेस्टर मशीन द्वारे गहू काढले जात आहेत, मात्र त्यामुळे या हार्वेस्टरवाल्यांना मोठा भाव आला आहे, त्यांनी या पंधरा-वीस दिवसातच प्रति एकर पाचशे,सहाशे रुपये भाव अधिक वाढवला आहे, पूर्वी गहू काढण्यासाठी प्रती एकर पंधराशे ते सोळाशे असा भाव होता, परंतु आता हाच प्रति एकर भाव 2000 व त्यापुढे गेला आहे, शिवाय हार्वेस्टरवाल्यांना अनेकदा सांगूनही लवकर ते येत नाहीत , आता या हार्वेस्टर वाल्यांकडे नंबर लावण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे, शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वैतागले आहेत
, सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत असताना व शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना, सवलती देत असताना ,दुसरीकडे मात्र हे खाजगी हार्वेस्टर मशीन वाले शेतकऱ्यांना लुटत आहेत, या परिस्थितीचा फायदा हार्वेस्टर
वाल्यांकडून घेण्यात येत आहेत, मुळातच पंजाब मधून येणारे हार्वेस्टर काही वर्षापासून येथील हार्वेस्टर वाल्यांनी त्यांना या भागात येऊ दिले नाही, स्थानिक हार्वेस्टर वाले परराज्यातील हार्वेस्टर वाल्यांना आपल्या गावात थांबून देत नाही, ते आल्यानंतर स्पर्धा निर्माण होते व त्यातून प्रति एकर गहू काढण्याचे भावही कमी होतात, तरी काही पंजाब हरियाणा मधून गेल्या दहा-बारा वर्षांपासून ठराविक अशी हार्वेस्टरवाले या भागात येत होतेच, मात्र यावर्षी पंजाब, हरियाणा मधून हार्वेस्टर मशीन या लॉकडाऊन मुळे भागात आले नाहीत , ,शिवाय सध्या कोरोणाच्या परिस्थितीमुळे एकही हार्वेस्टर मशीन परराज्यातून आपल्या राज्यात , राहता तालुक्यात यावर्षी आल्याचे दिसत नाही ,याचाच फायदा घेत तालुक्यातील हार्वेस्टर मालकांनी आता गहू काढण्यासाठी प्रत्येक एकरा चे भाव अचानक पाचशे ते सहाशे रुपये वाढवले आहे ,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना परत एकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे ,यावर जिल्हाधिकारी तहसीलदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून या हार्वेस्टर वाल्यांनी वाढवलेल्या भावाबद्दल योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे ,असे मत राहता तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे,