बुलडाणा - 10 एप्रिल लॉकडाऊनच्या काळात शहरात सर्वत्र शुकशुकाट असतांना आज एका बंद घरातून तब्बल 27 क्विंटल गांजाचे घबाड एलसीबीच्या हाती लागले आहे. अंदाजीत 94 लाख रुपयांचा हा गांजा असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा पोलिसांच्या हाती लागल्याने एकच खळबळ उडाली आहे आहे.
बुलडाणा शहरातील चिखली मार्गावरील बालाजी नगरालगत येळगाव शिवारात एका कुलुपबंद घरात ह्या गांज्याचा साठा मिळून आला.या प्रकरणी मनोज जुलालसिंह झाडे व गजानन सुल्तानसिंह मांझा रा.कुऱ्हा गोतमारा ता. मातोळा या 2 अरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.नशेबाजांमध्ये गांजाची क्रेझ अधिक असून बुलडाणा जिल्ह्यात व शहरात मोठ्या प्रमाणात गांजा विकला जात असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ गांजाच्या मोठ्या तस्करांवर लक्ष केंद्रित करुन होते. मात्र छुप्या मार्गाने विक्रेते गांजा विक्री व साठेबाजी करीत असल्याने या गांजाच्या तस्करावर बारीक लक्ष ठेवून असताना आज 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एमएच 28 एझेड 0236 क्रमांकाची कार थांबविली असता त्यामध्ये गांजाच्या 3 गोण्या आढळून आल्या. आरोपीला पोलिसी खाक्या दाखविला असता आरोपी मनोज झाडे याच्या मालकीच्या कुलुपबंद घरातून तब्बल 94 लाख रुपयांचे 27 क्विंटल 3 किलो गांजा घबाड सापडला आहे. ही कारवाई दुपारी 12 वाजतापासून तर रात्री उशीरा पर्यंत एलसीबी प्रमूख महेंद्र देशमूख यांच्या मार्गदर्शनात सुरु होती.या कार्रवाइत पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख,सपोनि इंगळे पीएसआई इमरान इनामदार , सुधाकर काळे,अताउल्ला खान,सुनील खरात, संजय नागवे, विजय सोनुने, अमोल अंभोरे, नदीम शेख सह इतर कर्मचारी सहभागी होते.
Post a Comment