शिर्डी राजकुमार गडकरी - सध्या देशात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आला असल्याने सर्वकाही ठप्प आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, मात्र सध्या शेतीचे पिके सोंगण्याची कामे महत्त्वाची असल्याने शेतीच्या कामा करता या लॉक डाउन काळात नियम पाळत व दक्षता घेत सवलत देण्यात आली आहे ,मात्र या सवलतीचा दुरुपयोग होताना दिसत असून लॉक डाऊन चे नियम व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पाळण्यात येणारी दक्षता, शेतकरी, शेतमजूर बहुतांशी महिला शेतमजूर अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात घेत नसताना दिसून येत आहे, आत्तापर्यंत ग्रामीण भागात व गावा गावात, खेड्यापाड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, परंतु जरअसे नियम
पाळले गेले नाहीत तर ग्रामीण भागातही कोरोनाचे मोठे संकट निर्माण होऊ शकते ,अशी भीती काही जाणकार व्यक्त करताना दिसत आहे,
सध्या जगात त्याचप्रमाणे भारतातही कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे ,14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन आहे ,या काळात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, मात्र सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे ,पिके सोगंणीला आल्यामुळे महत्त्वाची आहेत, त्यामुळे हा विचार करून केंद्र सरकारने ,,केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून शेतीच्या कामांना लॉकडाऊन मधून वगळण्यात येऊन काही सवलत दिली, मात्र कोरोचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क व सेल्फ डिस्टन्स ठेवण्याची जरूरत आहे, सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे ,असे असतानाही ग्रामीण भागात अनेक शेतमजुर, महिलामजूर, मात्र शेतीकामासाठी जाताना किंवा गहू ,मका कापणीसाठी,
कांदा काढण्यासाठी गावातून मळ्यात, किंवा ह्या वाडी वरून त्या वाडी वर ट्रॅक्टर, मालवाहतूक रिक्षा मध्ये एकत्र जाताना, येताना एकत्रितपणे दिसत आहे, तसेच शेतात पिकांची सोगंणी करताना, एकत्रित गप्पा मारताना, शेजारी शेजारी बसून जेवण करताना, दिसून येत आहे ,त्याच प्रमाणे हार्वेस्टर व इतर शेती उपयोगी मशनरी यांचा शेतीसाठी वापर करताना शेतमजूर कोरोनाचा संसर्ग होईल म्हणून घेण्यात येणारी कोणतीही दक्षता घेताना दिसत नाही, सोशल डिस्टन्स पाळला जात नाही अनेकदा तोंडाला रुमाल किंवा मास्कही नसतो, ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी हा प्रकार सध्या सर्रास पाहायला मिळत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात वाड्या, वस्त्यावर लॉकडाऊन काळात नियमाची ऐशीतैशी तशी झाल्याची दिसून येत आहे, आत्तापर्यंत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही, परंतु अशा पद्धतीने ग्रामीण भागात जर दक्षता न घेता, शेतीची कामे सामूहिक पद्धतीने करण्यात आली, तर मात्र कोरोनाचा धोका ग्रामीण भागात वाढवू शकतो, त्यामुळे जरी केंद्रसरकारने शेतीच्या कामांसाठी लॉक डाऊन मधून सवलत दिली असली तरी स्वतःची सुरक्षा, व कोरोना चा संसर्ग होऊ नये, म्हणून घ्यावयाची दक्षता पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी ही आपल्या गावात शेतकरी शेतमजूर, महिला कामगार, यांची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे, ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर अशिक्षित, गोरगरीब लोकांची संख्या अधिकआहे, त्यामुळे त्यांना रोजीरोटीसाठी काम करणे गरजेचे आहे , ह्याचाच मुळे मजूर व विशेषतः महिला शेतमजूर सध्या शेतीच्या कामाला जातायेत , परंतु म्हणावी तशी दक्षता त्यांच्याकडून घेण्यात येत नाही ,या अशिक्षित व आडाणी लोकांना कोरेना संबंधी अधिक माहिती नाही ,
त्यामुळे प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर शेतीत काम करताना किंवा ट्रॅक्टर, इतर वाहना मधून एकत्रित शेती कामाला जाणारे मजूर, विशेषता महिला शेतमजूर,कांदा काढण्यासाठी एकत्रित शेत ,रानात दिसणारे शेतमजूर,महिला, यांनाही माहिती व जनजागृती करून लॉकडाऊन काळात व इतर वेळीही मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत शेतात काम करावे, शेतमजूर, महिला शेतमजूर व शेती मालकाच्या कुटुंबाने सुद्धा दक्षता घेण्याची सूचना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी करावी, असे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक बोलतआहे.
Post a Comment