Latest Post

शिर्डी । जितेश लोक चंदानी निवासी संपादक
 सध्या कोरोना मुळे सर्वत्र  लॉक डाऊन आहे, त्यामुळे संचार करणे आम व्यक्तीला बंद आहे, मात्र दवाखाना व अत्यावश्यक सेवा व दवाखान्यात जाणारे येणारे  व मेडिकल, दूध भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा  घेण्यासाठी जाणारे ,येणाऱ्यांना  सध्यातरी या लोकांमधून सवलत देण्यात आली आहे , मात्र असे असतानाही पोलीस मात्र योग्य कारण दाखवून ही जाणीवपूर्वक अशा व्यक्तींची अडचण करत आहे किंवा दंड करत आहे, त्यामुळे पोलिसांच्या अशा विनाकारण दंडेलशाही करणाऱ्या या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित पायबंद करणे गरजेचे असल्याची मागणी शिर्डी तील आम जनतेने केली आहे,
       सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्व बंद आहे, शिर्डीत  सर्व बंद आहे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या  काळात सर्व जण घरात आहेत , कुणीही घराबाहेर उगाच पडत नाही ,प्रत्येक जण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता, काळजी घेत आहे, प्रत्येक जण आपापल्या घरात गेल्या अकरा दिवसांपासून बसलेला आहे ,मात्र अत्यावश्यक कामासाठी दवाखाना, भाजीपाला, मेडिकल,दूध आणण्यासाठी एखादा व्यक्ती अशा दुकानांमध्ये किंवा दवाखान्यात येत असतो, मात्र योग्य कारण सांगूनही त्यांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे, कारण असच एक व्यक्ति आपल्या कुटुंबातील व्यक्ती  येथील दवाखान्यात  ऍडमिट  असल्याने व डॉक्टरांनी घरून अतिमहत्त्वाची फाईल घेऊन येण्यास सांगितल्यामुळे त्यांची ही फाईल तो व्यक्ति  दवाखान्यात घेऊन चालले असताना त्यांना साईश कॉर्नर येथे पोलिसांनी अडवले ,त्यांनी पोलिसांना दवाखान्याची फाईल दाखवून अति महत्वाचे काम असल्यामुळे दवाखान्यात चाललो असल्याचे कारणही सांगितले, मात्र तेथील उपस्थित असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी  यांचे अजिबात ऐकून घेतले नाही, उलट नेहमीप्रमाणे अरेरावीची भाषा करत त्या  यांची अडवणूक केली, त्याने यांनी अनेकदा विनवणी व हात जोडूनही त्यांना पोलिसांनी लवकर सोडले नाही त्यानंतर ही माहिती शिर्डी चे पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे  यांना यांना आमच्या प्रतिनिधि ने भ्रमणध्वनीद्वारे कळल्यानंतर त्यांनी या पोलिस अधिकाऱ्यांना फोनवर सांगून नंतर त्यास  सोडण्यात आले, तोपर्यंत बराच वेळ त्यांचा  या पोलीस अधिकारी व पोलिसांनी येथे घेतला, त्यांना दवाखान्यात वेळेत जाणे गरजेचे असताना त्यांची पोलिसांनी अडवणूक केली, योग्य कारण दाखवून व फाइल दाखवूनही त्यांना सोडण्यात आले नाही, त्यामुळे ते उशिरा दवाखान्यात पोहोचले, त्यामुळे त्यांच्या घरातील पण दवाखान्यात ऍडमिट असलेले रूग्ण त्यांना वेळेत फाईल नसल्यामुळे उपचार करता आला नाही त्यामुळे ते आणखी  सिरीयस झाले, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या व्यक्तीस  मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, त्याला येथील साईश  कॉर्नरवर उपस्थित असणारे त्यावेळेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत,
   देशात सर्वत्र कोरोना चा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, नर्स ,आरोग्य कर्मचारी, पोलीस, सैनिक, सर्वजण आपापल्या परीने आपले कर्तव्य बजावत आहे, सर्वजण या मोठ्या संकटात माणुसकीचा मोठा हात दाखवत आहे ,अनेकजण मुख्यमंत्री, पंतप्रधान मदतनिधीसाठी हातभार लावत आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने माणुसकी दाखवत आहे ,अशा परिस्थितीत पोलिसही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, मात्र काही पोलीस दररोजच्या प्रमाणे या संकटसमयी सुद्धा हे  काम मुजोर पणाने करत असल्याचे दिसून येत आहे,अश्या काही मुजोर पोलीसांमुळे चांगले काम करणाऱ्या 95% पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कडे पाहण्याचा आम जनतेचा दृष्टिकोन वेगळा होऊ शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या आव्हानाला साथ देत करोडो भारतीयांनी गेल्या आठवड्यात ताली आणि थाली वाजवली, या संकटात कर्तव्य वाजवत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस व सर्व कर्मचारी अशा व्यक्तींचा स्फूर्ती मिळावी व त्यांचे अभिनंदन व्हावे म्हणून ताली आणि थाली वाजवली, कालही  करोडो भारतीयांनी एकजूट दाखवत आपल्या दारात, गच्चीवर येऊन दिवे, मेणबत्त्या पेटवून आम्ही सर्व भारतीय एक आहोत, डॉक्टर ,पोलिस जवान सर्व जण आमच्यासाठी साठी प्रयत्न करत आहेत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत, हे सर्व भारतीय जाणून आहेत, त्यामुळेच  कर्तव्य बजावणाऱ्या सर्व लोकांना  आपल्या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे  त्याद्वारे समजून आले,  यातून भारतीयांची माणुसकी  संपूर्ण जगाला दिसून आली, या संकट समयी कर्तव्य बजावणाऱ्या प्रत्येकाला आपल्या पाठीमागे भारतीयांची माणुसकी व त्यांचे आशीर्वाद , दुवा व मोठी अद्भुत शक्ती आपल्या पाठीमागे आहे हे दिसून आले, काल दिवे लावून माणुसकीही जपली, पोलिसही माणूस आहे, त्यांनाही कुटुंब आहे, सर्वजण सारखे नाही ,मात्र काही  5% मुजोर पोलिसांमुळे 95 टक्के कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याकडे  पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा होतो आहे,तेव्हा यापुढे तरी दवाखान्यात किंवा मेडिकल आणण्यासाठी जाणारा येणाऱ्यांना, दूध ,भाजीपाला, किराणा घेणाऱ्यांना, अत्यावश्यक सेवा करणारे यांना पोलिसांनी त्यांचे योग्य कारण विचारून व ते सत्य असल्यास त्यांना त्वरित सोडून देणे गरजेचे आहे, विनाकारण त्यांनी योग्य कारण सांगूनही दंड किंवा तासन्तास अडवणूक करणे योग्य नाही, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा पोलिसांवर  कारवाई करावी, किंवा अशा प्रकारांना पायबंद घालावा, अशी मागणी शिर्डीकर व आम जनतेमधून आता होऊ लागली आहे,

संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये 55 व्यक्ती,
कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना
सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
 शिर्डी प्रतिनिधि - राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाठारे, हणमंतपूर व हसनापूर या गावातील 41 व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील 32 व्यक्तींना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले असून उर्वरित 9 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षामध्ये एकूण 55 व्यक्ती दाखल करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
            या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील कोल्हार, भगवतीपूर, लेाणी बुद्रुक, लोणी खुर्द, दाढ बुद्रुक, पाठारे, हणमंतपूर व हसनापूर संबधित गावाच्या परिसरात गृहभेटीद्वारे शंभर टक्के तपासणी करुन नागरिकांकडून आवश्यक असलेल्या माहितीचे संकलन करण्यात येत आहे. गावांमध्ये जंतूनाशक द्रवाची फवारणी करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दूकानातून मासीक नियतन नियमित देण्यात येत असून अंत्योदय तसेच प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतीव्यकती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. वैद्यकीय औषधे, जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याची वाहतूक सुरळीतपणे होत असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

            साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार प्रशासनाने कटेंनमेंट ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये 13 पथकांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके तपासणीचे कार्य करत आहेत. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने पथकाला तपासणीसाठी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण गदी करु नये तसेच सोशल मिडीयातून अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- रस्त्यावर विनाकारण फिरणार्या व्यक्तीवर तसेच वाहन घेवुन फिरणार्यावर कडक कारवाई  करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक  श्री हरी बहीरट यांनी दिला आहे  या बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीरामपूर  शहर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक बहीरट यांनी सांगितले कि  वारंवार सुचना देवुनही अनेक जण विनाकारण रस्त्यावर चकरा मारत आहेत अशा व्यक्तीवर सि सि टिव्ही तसेच ड्रोन कँमेर्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे  कोरोना हे देशावर आलेले फार मोठे संकट असुन या
संकटाचा सामना करण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागणार आहे कुणीही  रस्त्यावर विनाकारण  वाहन घेवुन फिरु नये असे सांगुन देखील  अनेक जण गंम्मत म्हणून बाहेर पडतात अनेक वेळा समजावुन सांगितले तरी देखील  काही लोक मुद्दामहुन घराबाहेर पडतात अशा लोकावर आता कँमेर्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे कुणी विनाकारण वाहन घेवुन फिरत असेल तर त्याचेवर देखील  कारवाई करण्यात येणार असुन कुणीही गरज नसताना घराबाहेर पडू नका  असे अवाहनही  पोलीस निरीक्षक बहीरट यांनी केले आहे

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या अवाहना नुसार बेलापूर व परिसरात रात्री ९ वाजता ९ मिनिटे सर्वत्र दिवे लावण्यात आले जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या पत्नी सौ स्नेहल नवले यांनी व त्यांच्या घरातील महीलांनी  भारत मातेचा नकाशा  काढुन फुलांची सजावट केली  दिव्याच्या प्रकाशात असलेला हा  नकाशा  लक्षवेधी ठरला                                  देशावर आलेले कोरोनाचे संकट दुर व्हावे या करीता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अवाहना नुसार बेलापूर गावात तसेच परिसरात दिवे लावुन सर्वांनी राष्ट्रीय  एकात्मतेचे दर्शन घडविले   जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन समितीचे माजी सभापती शरद नवले यांच्या  पत्नी सौ स्नेहल शरद नवले यांच्या संकल्पनेतुन रश्मी नवले आकांक्षा नवले सिद्धी नवले तेजल नवले साक्क्षी नवले यांनी  घरासमोर देशाचा नकाशा काढला तो नकाशा फुलांनी सजविला नकाशाच्या बाजुने सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या अंधारात पणत्यांच्या प्रकाशात दिसणार्या सुंदर नकाशा कौतुकाचा विषय ठरला  तसेच बेलापूरात घराघरात महीलांनी त्याच बरोबर पुरुषांनी देखील  घरातील लाईट बंद करुन दिवे लावले या दिव्याच्या प्रकाशात रस्ते उजळून निघाले होते एक प्रकारे दिवाळीच साजरी करण्यात आली होती.

देशात कोरोना  ने  माजवला असून  कोरोनाचा पादुर्भाव  रोखण्यासाठी  सर्वत्र लॉक डाऊन आहे, सर्वत्र संचारबंदी असताना मात्र राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे पुरुष, महिला, लहान मुले यांना एकत्रित  येथील श्री हनुमान मंदिर सभामंडपात जमवून किराणा वाटप करण्यात येऊन लॉक डाऊन चे नियम तोडत कायद्याचे उल्लंघन केले गेले,  यामध्ये शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिसही सामील झाले होते ,त्यांनी  हा किराणा वाटताना आयोजकांना मदत केली
,मात्र गर्दी पांगवण्याऐवजी उलट पोलिसांनी आयोजकांना सहकार्य केले, याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे,
     सध्या जगात, देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे, सर्वत्र कोरोनामुळे मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर 14 एप्रिल 20 20 पर्यंत लॉक डाऊन आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद आहे, तसेच एकत्रित येण्यास मनाई आहे, संचारबंदी जारी आहे, असे असताना राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे आज रविवार दि,२६ला
सकाळी येथील राहता तालुका पंचायत समितीचे उपसभापती ओमेश साहेबराव जपे,व काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह पोटी गावातील महिला ,पुरुष ,लहान मुले ,यांना श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात बोलावून एकत्रितरीत्या त्यांना  सभामंडपात बसून किराणा वाटप करण्यात आले, हे वाटप करताना सोशल डिस्टंन्स व अनेकांकडे मास्ककही नव्हते, सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने देशात पसरत असताना व सर्व शहरे ,गावे कडकडीत बंद असताना, येथे गर्दी करून व कोणतेही   लॉक डाऊन चे नियम, व धोरणाचा  संसर्ग होऊ नये  म्हणून  कोणतीही दक्षता न घेता हा किराणा वाटपाचा घाट घातला गेला, हा प्रकार सुरू असताना शिर्डी पोलीस स्टेशनचे काही पोलीस येथे आले, मात्र त्यांनी या गर्दीला पांगवणे ऐवजी उलट आयोजकांना मदत करत महिलांना, मुलांना, किराणा देण्यास मदत केली व हा एकत्रित जमाव पांगवणे ऐवजी नंतर पोलिसही निघून गेले, त्यानंतर तासभर हा कार्यक्रम चालला, देशात ,राज्यात सर्वत्र अत्यावश्यक सेवा  सोडून कडकडीत बंद असताना,  सावळीविहीर येथे हा किराणा लोकांना वाटप करण्याच्या हेतूने कायद्याचे उल्लंघन करण्यात आले, लॉक डाऊन नियमाची एैशी की तशी झाली, हे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनाने मोठे धोकादायक आहे, परंतु यावेळी अचानक आलेले पोलिसही आयोजकांच्या विनंतीला मान देत त्यांनी मंदिराच्या सभामंडपात जाऊन लोकांना किराणा वाटपास मदत केली, त्यामुळे जमा झालेले लोक बिनधास्त होते,
    शासनामार्फत गोरगरीब, भिकारी व गरजूंना जवळच निमगाव निघोज येथील श्री साई पालखी निवारा येथे   भोजन निवास व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच ज्यांना कोणाला किराणा, धान्य स्वरूपी मदत करावयाची आहे त्यांनी साई पालखी निवारा येथे जाऊन द्यावयाची आहे, अशा शासनाने अगोदरच सूचना दिलेल्या आहेत, कोणीही  भोजन, किराणा अन्नधान्य वाटपासाठी आपापल्यापरीने कार्यक्रम घेऊ नये, त्यास मनाई आहे ,असे असताना सावळीविहीर ला या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले, राजकीय प्रभुत्व दाखवण्यासाठी असे कार्यक्रम आता घडत आहेत, यावर अहमदनगर जिल्हाधिकारी व नवीनच जिल्ह्यात आलेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिकारी अखीलेश कुमार सिंह ह्यांनी अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन याला पाय बंद घालावा, शिवाय असे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याना मग तो कोणीही सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील व्यक्ती ,नेता,असो त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ,अशी जिल्हावासयांची आपणाकडून अपेक्षा आहे, व तशी मागणी करण्यात येत आहे,

शिर्डी   शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव संस्थांच्या अधिकाऱ्यांनी लॉक डाऊन चे नियम तोडत साजरा केला व त्याचे फोटो समाज  मध्यमावर दिले, त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशनने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून श्री साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ यांच्याकडे नोटीस देऊन या संबंधी खुलासा मागवला आहे,
    सध्या कोरोना मुळे संसर्ग होऊ नये किंवा वाढू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, शिर्डी येथे पूर्ण बंदआहे, असे असताना व समूह जमा करण्यास बंदी आणि श्री साई संस्थान ला फक्त नित्यनेमाची पूजा आरती व्यतिरिक्त समूहपुजा करण्यास मनाई असताना श्री रामनवमीउउत्सवांच्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थानने 
हा उत्सव साजरा केला व त्याचे फोटो कुटुंब सह फोटो समाज व प्रसिद्धीमाध्यमांना दिले, त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन कडे याची चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशनने श्री साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडे मनाई असताना श्री साई समाधी मंदिरात व इतर श्री साई द्वारकामाई व श्री गुरुस्थान या ठिकाणी श्री रामनवमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर समुहिक पणे काही अधिकारी, पुजारी व कर्मचारी बरोबर घेऊन
कुटुंबासहित एकत्र येऊन श्रीराम नवमी उत्सव साजरा केला व हे फोटो समाजमाध्यमा वर टाकले, त्यामुळे यासंदर्भात श्री साई संस्थानच्या विश्वस्ताकडे खुलासा मागवला असल्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंधाले साहेब यांनी सांगितले,
    देशभर सर्वत्र लॉक डाऊनआहे,या काळात सर्व बंद असताना व संचारबंदी ही जारी असताना एकत्रित येणे  गुन्हा आहे, त्यामुळे श्री साई संस्थानचे विश्वस्त मंडळ, अधिकारी यांच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )-मोबाईलवरील व्हाँटसअप वर चुकीचा संदेश पसरवुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणार्या  मनोज चिंतामणी याच्या विरुध्द श्रीरामपूर  तालुक्यात  पहीला गुन्हा दाखल झाला  आहे         या बाबतची फिर्याद श्रीरामपूर  येथील अँड . समिन अजिज बागवान वय- 35,धंदा-वकिली रा.संजय हौसिंग सोसायटी संजय नगर,वॉर्ड नं-2,श्रीरामपूर जि-अहमदनगर यांनी दिली असुन त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की
मी वरील ठिकाणी आई,वडील,पत्नी व मुलासह राहत असून वकिली व्यवसाय करून उपजीविका भागवितो.मी माझा मोबाईल नंबर  आज सकाळी 10:15 वा चे सुमारास नेट चालू केले असता श्रीरामपूर विचार मंच या ग्रुप वरील मेसेजेस बघत असता मनोज चिंतामणी यांनी त्यांचे मोबाईल . वरुन एक पोस्ट फॉरवर्ड केल्याचे माझ्या वाचनात आले सदर ग्रुप मधे 220  विविध धर्माचे सदस्य आहेत  सदर ग्रुप वर केवळ एका  धर्मा बद्दल चुकीचा व  लोकांची बदनामी  होईल तसेच  दोन समाजात  तेढ़ निर्माण  होईल असा मजकुर पाठविण्यात आला होता 
 त्यामध्ये सर्वाना विनंती करण्यात आलेली होती की 'आपल्या गल्लीत टरबूज,खरबूज,अंगुर,कांदे, बटाटे, लसूण,अद्रक,भाजीपाला साठी टेम्पो किंवा गाडी घेऊन काही लोक येत आहेत. कृपया त्यांच्या कडून काही खरेदी करू नका.असा चुकिचा सदेश प्रसारित केला होता
या आणि अशा आशयाचा अन्य मजकुर असणार्या  या  मेसेजमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते असे मला वाटते, तसेच ' ठराविक लोकांकडून भाजीपाला,तसेच कसलाही माल विकत घेऊ नका. तसे केल्यास..तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेत आहात हे  लक्षात ठेवा' अशा आशयाचा मेसेज मनोज चिंतामणी या व्यक्तीने काल  ग्रुप वर फॉरवर्ड केलेला होता,
तरी माझी सदरील व्यक्ती नामे मनोज चिंतामणी या विरुद्ध कायदेशीर
भा द वी कलम 295आ नुसार फिर्याद आहे अँड समिन बागवान यांच्या फिर्यादी वरुन पोलीसांनी मनोज चिंतामणी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चुकीचे गैरसमज पसारविणारे संदेश पसरवु नये असे अवाहन केले जात असताना देखील अनेक फेक मेसेज संध्या व्हायरल होताना दिसत आहे  या फेक मेसेजमुळे  समाजात तेढ निर्माण होण्याची दाढ शक्यता असते  या बाबत श्रीरामपूर तालुक्यात पहीलाच गुन्हा दाखल झाल्यामुळे झटपट चुकीचे मेसेज पाठविणार्यांना एक प्रकारे चपराकच बसली आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget