शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव संस्थांच्या अधिकाऱ्यांनी लॉक डाऊन चे नियम तोडत केला साजरा पोलीस स्टेशनने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून श्री साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ यांच्याकडे नोटीस .

शिर्डी   शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सव संस्थांच्या अधिकाऱ्यांनी लॉक डाऊन चे नियम तोडत साजरा केला व त्याचे फोटो समाज  मध्यमावर दिले, त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशनने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून श्री साई संस्थानच्या विश्वस्त मंडळ यांच्याकडे नोटीस देऊन या संबंधी खुलासा मागवला आहे,
    सध्या कोरोना मुळे संसर्ग होऊ नये किंवा वाढू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, शिर्डी येथे पूर्ण बंदआहे, असे असताना व समूह जमा करण्यास बंदी आणि श्री साई संस्थान ला फक्त नित्यनेमाची पूजा आरती व्यतिरिक्त समूहपुजा करण्यास मनाई असताना श्री रामनवमीउउत्सवांच्या पार्श्वभूमीवर श्री साई संस्थानने 
हा उत्सव साजरा केला व त्याचे फोटो कुटुंब सह फोटो समाज व प्रसिद्धीमाध्यमांना दिले, त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन कडे याची चौकशी करण्याचे आदेश दिले, त्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशनने श्री साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडे मनाई असताना श्री साई समाधी मंदिरात व इतर श्री साई द्वारकामाई व श्री गुरुस्थान या ठिकाणी श्री रामनवमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर समुहिक पणे काही अधिकारी, पुजारी व कर्मचारी बरोबर घेऊन
कुटुंबासहित एकत्र येऊन श्रीराम नवमी उत्सव साजरा केला व हे फोटो समाजमाध्यमा वर टाकले, त्यामुळे यासंदर्भात श्री साई संस्थानच्या विश्वस्ताकडे खुलासा मागवला असल्याचे शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंधाले साहेब यांनी सांगितले,
    देशभर सर्वत्र लॉक डाऊनआहे,या काळात सर्व बंद असताना व संचारबंदी ही जारी असताना एकत्रित येणे  गुन्हा आहे, त्यामुळे श्री साई संस्थानचे विश्वस्त मंडळ, अधिकारी यांच्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget