Latest Post


सावळीविहीर। राजेंद्र गडकरी 
 सध्या देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे, या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशपातळीवर शासन मोठे प्रयत्न करत असून देशात सर्वत्र 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे ,अशातच आज रामनवमी आल्याने शिर्डी परिसरातील गावातही रामनवमी जन्मोत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम ठेवून साजरा करण्या ऐवजी प्रत्येकाने घरातच श्रीरामनवमी जन्मोत्सव दुपारी ठीक बारा वाजता आपल्या कुटुंबासमवेत आनंद साजरा केला, काही ठिकाणी मंदिरातील पुजाऱ्यांनी श्रीरामाची पूजा करून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, सावळीविहीर येथे कोरोना संदर्भात सर्व दक्षता घेत व लॉक डाऊन चे नियम पाळत श्रीराम मंदिरात येथील पुजारी सौ बेबीताई सोनवणे व कैलास राव जपे,भजनी मंडळातील  कामठे ताई , जपे ताई ,फाजगेताई, यांनी मंदिरात येऊन  पाळणा बांधून पाळण्याला हार पुष्पहार घालून सजावट करून पाळण्यात श्रीरामाची प्रतिमा ठेवून दुपारी ठीक बारा वाजता पाळणागीत श्रीरामाचे गीते व आरती करून हा श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, दरवर्षी मंदिरात मोठी गर्दी असते ,मात्र यावेळी श्रीराम मंदिरात कोणी आले नव्हते, या दोन तीन महिलांनी लॉक डाऊन चे नियम पाळतात मास्क लावून व संनेटायझर चा वापर करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला, तसेच घराघरातही श्रीराम व श्री साईबाबांच्या प्रतिमेचे आज श्रीराम नवमी निमित्त पूजन करण्यात आले, आज  श्रीराम नवमी व गुरुवार  असल्याने  दुग्धशर्करा योग  जुळून आला होता, अनेक ठिकाणी रामजन्मोत्सवा नंतर खडीसाखर,गुळ साखर तर काही ठिकाणी पुरणपोळ्यांचा नैवेद्य घरातील श्री साई प्रतिमेला व श्री रामाच्या प्रतिमेला देण्यात आला, अनेक घरात आज रामनवमी निमित्त श्री साई स्तवन मंजिरी वाचन करण्यात आले, व श्री राम व श्री साईबाबांना या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी शक्ती दे। जगाला ,देशाला या कोरोनाच्या संकटापासून वाचवण्याचे साकडे घातले, जरी लॉक डाऊन मुळे मंदिरात कोणी जाताना दिसत नव्हते,पण अनेकांनी आपापल्या घरात राहून मनोभावे श्रीरामनवमी उत्सव मोठ्या आनंदात व आपल्या कुटुंबासमवेत उत्साहात साजरा केला, आज सावळीविहीर चा आठवडे बाजार व श्रीरामनवमी असतानाही लॉक डाऊन मुळे गावात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.

शिर्डी ।जितेश लोकचंदानी निवासी संपादक-राहाता येथील रहदारीच्या ठिकाणी सदाफळ मार्केटच्या मागे सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून मद्य रात्री ते चोरट्यानि शटर उचकाउन फोडले, या दुकानांमध्ये असलेली 137 बॉक्स देशी दारू लम्पास केली. ह्या दुकाना पासुन पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर असतांना चोरांनी डल्ला मारून एक प्रकारे पोलीसाना आव्हान दिले असल्याचे नागरिकात चर्चा सुरू आहे.भोताडे यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान लॉक डाउन मुळे
बंद असतांना मद्य रात्रि कोणीही नसताना चोरी झाल्याने राहाता येथील व्यवसायिकांनी  धास्ती घेतली आहे, भर रस्त्यावर असे प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात घबराटी चे वातावरण पसरले आहे आमच्या प्रतिनीधीने राहाता पोलिस स्टेशनला संपर्क केले असता पोलीसांनि सान्गितले की अजुन पंचनामा सुरू आहे, सध्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र देश पातळीवर मोठे प्रयत्न होत आहे ,राज्यातही कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे, सर्वत्र लॉक डाऊन आहे, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे, मात्र या बंदमुळे चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, संचारबंदी असतानाही ही अनेक टारगट व चोरी करणारे रात्री इकडून तिकडे फिरत असतात अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, सर्वसामान्य माणसे लॉकडाऊनच्या काळात  घरात आहेत, त्यामुळे दुकानात ना मालक ,ना दुकानांवर नजर ठेवण्यासाठी रात्रीचे असणारे वॉचमेन आहे, संचार बंदीमुळे कोणी रात्रीचे फिरकत नाही, त्याचाच परिणाम अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आले आहेत, त्यांनी चार्ज घेताच त्यांचे स्वागत अशा पद्धतीने राहत्यात देशी दारूचे दुकान फोडून झाले आहे, त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आता याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे शिर्डी व परिसरात लॉकडाऊन मुळे सर्व काही ठप्प आहे, साईभक्त येत नाहीत ,चोर्‍या, पाकीटमारी  करण्यास मिळत नाही ,त्यामुळे पाकीटमारी, चोऱ्या करणारे आता यांना पैसे, दारू मिळेनाशी झाली आहे, कारण लॉक डाऊन मुळे सर्वत्र परमिट रूम , वाईन्स, देशी दारूची दुकाने बंद आहेत ,परंतु अनधिकृत व अवैध दारूधंदे अनेक ठिकाणी आजही चालू आहेत ,अशा अवैध दारू धंद्यांना दारू पुरवणे यासाठी या चोरांनी दुकान फोडले असावे, अशी नागरिकांत चर्चा आहे, त्यामुळे अधिकृत दुकाने परमीटरूम देशी दारूचे, वाईन्स बंद असताना राहता तालुक्यात, शिर्डी परिसरात आजही अनधिकृत असे  दारू अड्डे  सुरूच आहेत, त्यांचा पहिला बंदोबस्त करणेही गरजेचे आहे, या लॉकडाऊन काळात राहता शिर्डी परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची गरज असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.


शिर्डी प्रतिनिधि -  संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे त्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात सुरक्षाच्या कारनाने लॉक डाउन करण्याचे आदेश असतांना शिर्डीत गेट नंबर चार जवड असलेले डॉक्टर जानी यांच्या मालकीचे  होटेल दीपक मध्ये रूम भरलेले असल्याची मिळताच वाहतूक शाखे पोलिस निरीक्षक गोकावे  यांनि छापा टाकुण कलम 188 नुसार  कारवाई केली आहे तसेच कणकुरी रोड लगत असलेल्या होटेल राजकमल येथेहि छापा टाकला असता तेथेहि रूम भरल्याचे समजतास होटेल मालक रोहित थावाणी याच्यावर 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे व ह्या पुढे  लॉक डाउन असे पर्यंत व जो पर्यंत पुढिल आदेश येई पर्यंत जो कोनी नियमाचे पालन करनार नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येइल असे पोलिस निरीक्षक गोकावे यांनि आमच्या प्रतिनिधि बोलतांना साण्गीतले.

शिर्डी ।।जितेश लोक चंदानी।। देशाच, राज्यात सर्वत्र कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे ,त्यामुळे देशात सर्वत्र लॉक डाऊन आहे ,सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत, अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना दररोज देण्यात येणारा शालेय पोषण आहार हा प्रत्येक शाळेत तसाच पडून आहे, त्यामुळे हा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पालकां मार्फत वाटण्याचे जिल्हा परिषदेने ठरवून तसा निर्णय घेतला असून प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना पालकां मार्फत शालेय पोषण आहार वाटप करण्यात येत आहे,
        राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेत    विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून  त्यांना  हे शालेय पोषण  आहाराचे साहित्य  देण्यात आले ,लॉकडाऊन चे सर्व काटेकोर  नियम पाळत हे वाटप करण्यात आले,  यावेळी  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 164 विद्यार्थ्यांना पालकामार्फत शालेय पोषण आहार शिल्लक धान्यसाठा वाटप करण्यात आला,
त्यात प्रामुख्याने तांदूळ ,हरभरा, मठ,तूरडाळ, मुगडाळ, वाटले 
यावेळी पंचायत  समिती राहाताचे उपसभापती श्री ओमेश पा जपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब पा जपे,सरपंच रुपाली संतोष पा आगलावे, शाळा व्यवस्थापन समिती अद्यक्ष दिनेश आरणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कापसे,नितीन आगलावे, रवी कापसे,आनंद जपे,गणेश आगलावे ,प्रमोद वाणी पत्रकार राजेंद्र गडकरी,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला चौधरी उपस्थित होत्या,
राज्यात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले आहे ,त्यामुळे येथे यावेळी संचारबंदी चे तंतोतंत पालन करण्यात आले, शालेय पोषण आहारा चे धान्य घेण्यासाठी आलेले सर्व पालकांनी मास्क बांधून व दूर दूर अंतरावर उभे राहून नियमांचे काटेकोर पालन केले, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळा ठरवून देऊन शाळेत गर्दी न करण्याचीही अगोदर सूचना देण्यात आल्या होत्या,
या वाटप कार्यक्रमात कोरनोच्या मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरातच  राहावे,  अत्यावश्यक कामासाठी बाहेर निघाल्यास  मास्क वापरावे , साबणाने हात स्वच्छ धुवावेत  आपल्या  पाल्यांना  जपावे ,दक्षता घ्यावी , अशा  विविध  सूचना व पालकांना कोरोना विषयी काळजी घेण्याची गरज व उपाययोजना श्री दत्ता गायकवाड यांनी सांगितली, तर इतर मार्गदर्शक सूचना श्री पंकज दर्शने यांनी दिल्या,
हे शालेय पोषण आहार धान्य  वाटप करण्यासाठी श्रीमती, चवाले मॅडम ,मंद्रे मॅडम, गोर्डे मॅडम, संगीता याईस,सविता बर्डे यांनी परिश्रम घेतले,

राहता -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहता येथील मदरसा माहादे नोमानी कडून अडीशे तीनशे  गोरगरिबांना किराणा सामान तसेच मासही वाटण्यात आले आहे. लोकांना जनजागृती करण्यात आले आहे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती असल्याणे  लोकांनी घराबाहेर निघू नये असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे तसेच मदरसा महादे नोमानी चे अध्यक्ष म्हणले आहे की राहता शहरामध्ये उपाशी राहू नये या उद्देशाने शहरांमध्ये गोरगरीब लोकांना किराणा सामानचे वाटप करण्यात आले .

असेच गोरगरिबांना सरवांनि  मदत करावि असे आवाहन करण्यात  आले.
मौलाना यूसुफ मिल्ली. मौलाना याहया कासमी.
मौलाना रऊफ आझाद. मौलाना लतीफ़ कासमी.
मौलाना रफीक कासमी.हाफिज अकिल फैजी.
मौलाना कमरूद्दीन नदवी.हाफिज मूकिम फैजी.
मौलाना ईबराहीम शाह.मूफ्ती रहिम रहमानी.शाहा मुश्ताक,शाह इलियास भाई
 यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच मदरसा माहादे नोमानी त्यांचे लोकांनी आभार मानले.

सगळीकडे लाॅक डाउन  असताना निमगाव कोर्राळे गावातील हेलीपॅड रोडवर राहत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलैली स्विप्ट डिझायर एम एच १७ a ,z  ६५०१  हे चार चाकी गाडी उभी असताना सोमवार दिनांक १एप्रील २०२०रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात  गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे
  अधिक माहिती अशी की निमगाव कोर्राळे गावात बाळासाहेब ठाकरे यांचे हाॅटेल आहे  ज्या परीसरात हि घटना घडली आहे त्या परीसरात काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड घडले होते तसेच  समोरच असलेल्या मोकळ्या मैदानात खुनाच्या घटना घडल्या होत्या  त्या बरोबरच खुन खुनाचा प्रयत्न मारहाण लुटमार आणि आता थेट चार चाकी पेटवून संपुर्ण घरचं उडवून देण्याचा प्रयत्न एका जागरूक तरुणांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला असून  वाहन पेटवून   पळुन जात असताना दुचाकी वर दोन तरुण सी सी टिव्ही फुटेज मध्ये दिसत असुन  घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व पोलिस  पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासासाठी  चौकशी सुरू केली आहे  श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखी तक्रार शिर्डी पोलीसांनी घेतली असून  या घटनेबाबत पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले की संशयित आरोपीचे नावे मिळाली असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे  तपास सुरू करण्यात आला असून लवकरच  संशयितांना ताब्यात घेऊन  कठोर पणे चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आमच्या प्रतिनिधिना  सांगितले या घटनेनंतर शिर्डी सह ग्रामीण भागात घबराट पसरली आहे.

कोरोना विषाणु (कोव्हीड १९) हा संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता मा.पंतप्रधान भारत सरकार,
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.जिल्हाधिकारी अहमदनगर, मा.पोलीस अधीक्षक, अहमदनगर तसेच भारत सरकार प्रशासन " कोरोना विषाणु " या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होणार नाही व कोरेना बाधीत रुग्णांची संख्येत बाढ होवु नये याकरीता उच्चस्तराच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडुन अन्य व्यक्तीस / इसमास त्याचे संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असते.
महराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड - १९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथराग
प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २,३,४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमीत केलेली आहे. याच अनुशंगाने मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेश क्रमाक आव्यमपु/कार्या १९/२०८/२०२० आदेश अहमदनगर दि. १६/०३/२०२० अन्वये कोरोना विषाणुचा प्रादुभाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीस/संस्था/संघटना
कोव्हीड - १९ बाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मिडीयाच्या
माध्यमातुन पसरविणेस साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व
नियमावलीमधील तरतुदीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (१) अन्वये प्रतिबंध केलेबाबत आदेश जारी केलेले आहेत. आरोपी इसम नामे ताहिर शेख रा.मुकुंदनगर ता.जि.अहमदनगर याने त्याचे मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ वरुन कोरोना आजारा संदर्भात सुफीयाना शेख युवा मंच या व इतर ग्रुपवर ' दि. २९/०३/२०२० रोजी आज रात १० बजे से मुकुंदनगर फकिरवाडा भाग मिलीट्रीच्या हातात देणार असुन मुकुंदनगर फकिरवाडा भागातील सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच दि. ३०/०३/२०२० रोजी विविध ग्रुपवर " आज मिलीटी मस्जीद के सामने कुछ सरकारी अधिकारी के साथ घुम रही है और घरके लोगोंके बारेमे पुछे तो नाम और मोबाईल नंबर नही देना " असे खोटा मेसेज पाठवुन जनतेत खोटी माहिती व अफवा पसरवुन मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन आरोपी ताहिर शेख रा.मुकुंदनगर मोबाईल नंबर ९२७०८४७५७५ याचेवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गु.र.नं. 1 ३६९/२०२० भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात तरी अहमदनगर पोलीस दलातर्फे सर्वाना आवाहन करण्यात येते की, कोरोना संसर्गजन्य आजारा संदर्भात व्हॉटसअप किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये निराधार, अफवा असलेली माहिती प्रसारीत करु नये. तसेच भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत विश्वसनीय प्रशासकीय वृताव्दारे प्रसारीत केलेल्या माहिती व्यतीरिक्त इतर खोटया आशयाचे वृत्तांवर विश्वास ठेवु नये. मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर प्रचलीत कायदयान्वये सक्त व कठोर कारवाई करण्यात येईल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget