सगळीकडे लाॅक डाउन असताना निमगाव कोर्राळे गावातील हेलीपॅड रोडवर राहत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब काळु ठाकरे यांच्या घरासमोर उभी केलैली स्विप्ट डिझायर एम एच १७ a ,z ६५०१ हे चार चाकी गाडी उभी असताना सोमवार दिनांक १एप्रील २०२०रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पेटवून कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला यात गाडीचे मोठे नुकसान झाल्यामुळे निमगाव कोर्राळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे
अधिक माहिती अशी की निमगाव कोर्राळे गावात बाळासाहेब ठाकरे यांचे हाॅटेल आहे ज्या परीसरात हि घटना घडली आहे त्या परीसरात काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड घडले होते तसेच समोरच असलेल्या मोकळ्या मैदानात खुनाच्या घटना घडल्या होत्या त्या बरोबरच खुन खुनाचा प्रयत्न मारहाण लुटमार आणि आता थेट चार चाकी पेटवून संपुर्ण घरचं उडवून देण्याचा प्रयत्न एका जागरूक तरुणांच्या दक्षतेमुळे उघडकीस आला असून वाहन पेटवून पळुन जात असताना दुचाकी वर दोन तरुण सी सी टिव्ही फुटेज मध्ये दिसत असुन घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक गंधाले व पोलिस पथक घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासासाठी चौकशी सुरू केली आहे श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखी तक्रार शिर्डी पोलीसांनी घेतली असून या घटनेबाबत पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले की संशयित आरोपीचे नावे मिळाली असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून लवकरच संशयितांना ताब्यात घेऊन कठोर पणे चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आमच्या प्रतिनिधिना सांगितले या घटनेनंतर शिर्डी सह ग्रामीण भागात घबराट पसरली आहे.
Post a Comment