Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाची दखल घेत नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांनी शहरात घरोघर जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आहे . यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांचा शोध घेतला जात आहे . विशेषतः पुणे, मुंबई येथून आलेल्या लोकांची नोंद घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारले जात असून त्यांना 14 दिवस घरांमध्येच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे.
नगरपालिकेच्या सिस्टर सुनिता त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिका दवाखान्यातील नर्सेसची टीम शहराच्या विविध भागात जाऊन घराघरातून ही पाहणी करीत आहे .आज त्यांनी वार्ड नंबर दोन मध्ये घरोघरी भेटी देऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली.आलेल्या लोकांची नावे व संपर्क क्रमांकाची नोंद घेण्यात आली .याशिवाय घरांमध्ये कोणाला ताप, कोरडा खोकला, सर्दी झाली आहे काय याचीही विचारणा करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या या पथकासोबत पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला आहे.हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे व त्यांचे सहकारी याकामी सहकार्य करीत आहेत .सदरची पाहणी आणखी काही दिवस चालणार असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्यांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी . कोरोना पासून सर्व शहरवासीयांचे रक्षण करण्यासाठी ही पाहणी केली जात आहे त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, समीना अंजुम शेख, जायदाबी कुरेशी,तरन्नुम रईस जहागीरदार,कलीम कुरेशी, रज्जाक पठाण,निसारभाई कुरेशी, रईस जहागिरदार,अस्लमभाई सय्यद आदींनी केले आहे .

बेलापूर  (प्रतिनिधी  )- कोरोनाच्या  धास्तीमुळे घरातच बसलेल्या गरीब कुटूंबाला आधार देण्याकरीता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असुन त्यांच्या योगदानातुन गरीबांना जिवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले       कोरोनाचा फैलाव होवु नये म्हणून प्रत्येक जण घरात बसुन असुन जे लोक मोलमजुरी करुन आपली गुजराण करत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून गावातील हाजी ईस्माईल शेख हाजी शोएब शेख अमीरसाहेब शेख कुरेशी फकीर आतार यांनी वैयक्तिक खर्चातुन किराणा सामान खरेदी करुन त्याचे गरजवंताना मोफत वाटप केले यात शेंगदाणे तेल तुप मीठ बेसन पीठ साबण निरमा
तांदूळ अशा वीस वस्तुचा समावेश होता  या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक पत्रकार देविदास देसाई अजय डाकले सुभाष राजुळे चंद्रकांत नाईक शकील कुरेशी अमीरसाहेब आतार फकीर शेख अल्ताफ शेख सुभान शेख मुस्ताक शेख ईम्रान शेख बिलाल शेख सुभाष मोहीते संजय शेलार  अमोलीक रफीक शेख ईलीयास शेख अल्लाऊद्दीन शेख रविंद्र करपे शरद देशपांडे  पत्रकार गोविंद साळुंके उपस्थित  होते

-राजेंद्र गड़करी अंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी या पावन भूमीत दररोज श्री साई दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो साईभक्त येत असतात मात्र सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग एकमेकांना होऊ नये किंवा वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे, शिर्डीत त्यामुळे लॉक डाऊन असून श्री साई  समाधि मंदिर सह सर्वच बंद आहे, अशा प्रसंगी अत्यावश्यक सेवा पुरवणारे वाहनधारक तसेच येथे असणारे भिकारी साधू यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे श्री साईबाबा संस्थाने अशा गरजवंतांना नाष्टा पाकिटे देऊन या संकट समयी मदत करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत आहे,
     सध्या जगात, देशात, राज्यात सर्वत्र कोरोना ची चर्चा सुरू आहे, देशात सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्व ठप्प आहे, शिर्डीत अाधी दररोज हजारो साईभक्त येत होते ,परंतु लाक डाऊन मुळे सर्व दुकाने, विमानसेवा, रेल्वे वाहतूक तसेच एसटी महामंडळाच्या बसेस, सर्व काही बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर सुद्धा बंद असल्याने साई भक्त एकही येत नाही श्री साईबाबा संस्थाने मंदिराबरोबरच आपली सर्व भक्त निवासस्थाने व प्रसादालही बंद केले आहे, त्यामुळे शिर्डीत असणारे भिकारी साधू यांचा या काळात उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ,अशासाधू संतांसाठी  तसेच येथे  प्रसादालय वर अवलंबून असणारे  भिकारी यांना श्री साईबाबा संस्थाने मोफत नाश्ता पाकिटे पुरवावीत, त्याच प्रमाणे राज्यात देशात अत्यावश्यक सेवा पुरवणारे मग ते दूध टँकर असो, भाजीपाला किंवा किराणामाल ट्रक असो अश्या ट्रक चालकांना रस्त्यात सर्वकाही बंद असल्यामुळे जेवण तर दूरच पण चहा सुद्धा मिळणे मुश्कील होत आहे, तरी श्री साईबाबा संस्थान नगर मनमाड या महामार्गावर येणाऱ्या-जाणाऱ्या अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक चालकांना नाष्टा पाकिटे दिली तर त्यांचा अशा समयी चांगला उपयोग होईल अशी मागणी शिर्डी मधून होत आहे
    शिवाय श्री साईबाबा संस्थान कडे नाष्टा पाकिटे बनवण्याची यंत्रणा सज्ज असते ,भविष्यात जर बाका प्रसंग याविषाणू मुळे निर्माण झाला तर शिर्डी परिसरात किंवा जिल्ह्यात किंवा आणीबाणी प्रसंगी महत्त्वाच्या ठिकाणी असे अन्न किंवा नाष्टा पाकीट कसे पोहोचवता येतील याची नियोजन किंवा तयारी ही श्री साई संस्थान करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.


-निवासी संपादक जीतेश लोकचंदानी शिर्डी  हे श्री साईबाबा मुळे अंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे सध्या कोरोना व्हायरस चा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठी काळजी घेण्यात येत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे 14 एप्रिल पर्यंत येते लॉक डाऊन आहे,     मात्र अत्यावश्यक सेवा पुरवणारे, किंवा अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडणाऱ्यांना शिर्डीत आता मास्क हे अव्वाच्या सव्वा किमतीला मिळत आहे, काही डुप्लिकेट मास्क बाजारात आल्याचे समजते ,तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन येथील नागरिकांना मास्कचे मोफत वाटप करावे, अशी मागणी शिर्डी करांनी केली आहे
     सध्या देशात, राज्यात सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरू आहे, संसर्गजन्य हा आजार असल्याने शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या अहवालानुसार लॉक डाऊन करण्यात आले आहे, नेहमी गजबजलेली शिर्डी सध्या शांत शांत आहे, शिर्डीत येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस खाजगी बसेस, रेल्वे वाहतूक विमान वाहतूक सर्व बंद आहे साईभक्त ही  येणे बंद असून दुकाने ,लॉजेस बंद आहे ,एवढेच नव्हे तर श्री साई समाधी मंदिर मंदिरही बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे शिर्डी सध्या शांत शांत आहे, मात्र शिर्डीत गोरगरीब व मोलमजुरी करणारेही ही अनेक आहेत ,शिवाय लॉक डाऊन मुळे त्यांना बाहेर पडणे मुश्कील होत आहे ,अशांना संध्याकाळी खाण्यापिण्याची सुद्धा मोठी पंचाईत होत आहे दिवसभर काम करून संध्याकाळी रोजीरोटी मिळवणारे शिर्डीत अनेक आहेत मात्र लोक डाउन  मुळे काम ठप्प झाले आहे, त्यामुळे अशांना बाजारात मास्क घेणेही परवडत नाही, शिर्डीत दूध ,मेडिकल भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच त्या घेण्यासाठी दुकानात येणारे यांना मास्क ची मोठी गरज आहे, स्वच्छ  शिर्डी ,सुंदर शिर्डीचे देशाचे तीसरे बक्षीस शिर्डीला  मिळाले आहे, अशा स्वच्छ सुंदर शिर्डीत आज पर्यंत सर्व  नियम पाळत आहेत, लॉक डाऊन मुळे नागरिक बाहेर पडण्याचे टाळत आहेत, अशा शिर्डीत अत्यावश्यक सेवा पुरवणारे तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणारे यांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा सामाजिक संघटनांनी पुढे येऊन मास्क पुरवण्याची गरज आहे कारण सध्या बाजारात मास्क मिळेनासे होत आहे किंवा त्याच्या किमंती अवाच्या सव्वा लावल्या जात आहे ,त्याचप्रमाणे बाजारात डुबलीकेट मास्क आल्याचेही समजते, त्यामुळे येथील नगरसेवक किंवा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आपापल्या वार्ड मध्ये  योग्य असे मास्क मोफत वाटप केले तर त्याचा फायदा नागरिकांना चांगला होईल, इतर वेळी किंवा निवडणुकीच्यावेळी नागरिकांना विविध गोष्टींचे वाटप केले जाते परंतु अशा प्रसंगी हे मास्क चे वाटप केले तर ते सर्व दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे, असेही मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले असून तशी मागणी शिर्डी करांनी केली आहे.


श्रीरामपूर- कोरोना विषाणू संसर्गामुळे उदभलेल्या आपत्तकालीन परिस्थितीत वाहतुक परवाने देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खान यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या एका शासकीय प्रसिद्धी पत्रकात खान यांनी नमूद केले आहे की, राज्याचे परिवहन आयुक्त यांनी आज (26 मार्च) रोजी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस व परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवा व वस्तु यांची वाहतुक करणाऱ्या मालवाहु वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे, व कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी सदरचे प्रमाणपत्र हे केवळ लॉकडाऊनच्या कालावधीपुरते वैध राहील. 
सध्या लागु असलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक मालवाहु वाहनधारकांना कार्यालयात येणे अडचणीचे होत असल्याने तसेच परिवहन कार्यालयातील गर्दी  टाळण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष  कार्यालयात मध्ये स्थापित केला असुन मालवाहु मालकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत येऊन अर्ज केल्यास त्यांना त्वरित प्रमाणपत्र देण्यात येईल किंवा ज्या वाहन मालकांना कार्यालयात येणे शक्य नाही त्यांना ईमेलद्वारे प्रमाणपत्र जारी करण्याची व्यवस्था जारी करण्यात आली आहे. त्यासाठी mh17@mahatranscom.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
आर्ज  करतांना लागणारे फॉर्म  
वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी.बुक)
वाहना संदर्भातील सर्व प्रकारच्या कर पुस्तिका
वाहनाचे विमा प्रमाणपत्र (इन्शुरन्स)
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टीफिकेट)
वाहनाचा परवाना (परमिट)
वाहन चालकाची अनुज्ञप्ती (लायसन्स)
वाहन चालकाचे व सहाय्यकाचे ओळखपत्र 
या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ज्या ईमेलवरुन अर्ज केला आहे त्या ईमेल पत्त्यावर परवानगी प्रमाणपत्र अग्रेषित केले जाईल. त्याची प्रिंट काढून सादर पास वापरता येईल असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


♦महानगरातून आलेले आहे 200 पेक्षा जास्त लोक
🟢येथे "लॉकडाउन" ठेंग्यावर
बुलडाणा - 26 मार्च
जवळ असलेल्या देऊळघाट येथे आज 26 मार्चला जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने महानगरातून आलेल्या 99 लोकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना पुढील 14 दिवससाठी होम कोरोनटाइन करण्यात आले आहे.हे लोक आजारी नसून फक्त खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली असली तरीही येथील जनता कलम 144 चा सर्रास उल्लंघन करीत आहे.
      बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या गावा पैकी देऊळघाट एक आहे जे बुलडाणा पासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे.येथील अनेक लोक रोजगारसाठी मुंबई,भिवंडी,पुणे,सूरत अश्या महानगरात गेलेले आहे.मागील काही दिवसापासुन कोरोना वायरसने देश भरात थैमान घातले असून संपूर्ण देशा लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली.अनेक महानगरात गेलेले लोक आपल्या मुळ गावी परतले.देऊळघाट येथे आरोग्य सेविका,आशा वर्कर यांच्या माध्यमाने बाहेर गावातून आलेल्या लोकांचा सर्वे करण्यात आला.मुंबई,पुणे या शहरात कोविड-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून आले म्हणू ग्राम पंचायत व जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेत देऊळघाट या गावात बाहेरुन आलेल्या लोकांना घरीच थांबवन्याचे सांगितले तरीही बरेच लोक बाहेर फिरत होते म्हणून आज आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी सरपंच गज़नफर खान,तंटामुक्त समिति अध्यक्ष जुनैद खान,बिट जमादार चोपडे यांना सोबत घेऊन आपली आरोग्य टीम घेऊन बाहेरुन आलेल्या लोकांच्या घरी पोचले व 99 लोकांच्या हाती होम कोरोनटाइनचा शिक्का लावून त्यांना पुढील 14 दिवस घरी राहण्याचे निर्देश दिले.हे सर्व 99 लोकांची तब्यत बरी असून फक्त खबरदारी म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी दिली आहे.लोकांनी आपल्या घरीच रहावे,कोणीही बेकाम घरा बाहेर येऊ नये अशी विनंती सरपंच गज़नफर खान यांनी केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस जीव तोडून राबत असताना शासनाच्या आदेशांना हरताळ फासण्याचे काम वार्ड नंबर दोन मध्ये केले जात आहे .विशेष म्हणजे पोलिसांनी या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष करीत मौलाना आझाद चौकात पाण्याच्या टाकीजवळ खुच्र्या टाकून बसणे पसंत केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .देशासह राज्यात सर्वत्र लॉक डाऊन करून कोरोनाच्या भयानक रोगावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे . त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी अडथळे निर्माण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत .सय्यद बाबा चौक, मौलाना आझाद चौक, गोंधवणी रोड, काजीबाबा रोडही बंद करण्यात आला आहे . मात्र सुभेदार वस्तीतील आतील भागात सर्वत्र नागरिक रस्त्यावर दिसत आहेत . सुलतान नगर , कुरेशी जमात खाना, चौधरी बिल्डिंग कॉर्नर, बीफ मार्केट चौक, घरकुल परिसर, गुलशन चौक, सोमेश्वर पथ, बजरंग चौक, मिल्लत नगर पूल, संजयनगर रोड, फातेमा कॉलनी, गोंधवणी पूल, दशमेश नगर चौक या परिसरात सर्वत्र लोकांचे टोळके ठिकठिकाणी इमारतींच्या ओटयांवर बसून गप्पा मारतांना दिसत आहेत . कुठलेही अंतर न राखता शेजारी बसून चर्चा झडत आहेत .
भाजीपाला व फळविक्रेते बिनदिक्कतपणे गल्लीबोळातील रस्त्यांवर फिरत आहेत . घरकुलातील इमारतींच्या जिन्यावर बसून महिलांच्या गप्पा चालू आहेत .
रस्ते बंद असल्याने पोलिसांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने या भागात दोन् दिवसापासून फिरकलेली नाहीत . कायदयाचा कोणताही धाक नसल्याने नागरिक बिनदिक्कत फिरत आहेत . पुढारी छाप कार्यकर्तच लोकांना घेऊन बसलेले दिसून येत आहेत . हीच परिस्थिती कायम राहिल्यास श्रीरामपुरात कोरोनाची साखळी खंडित होण्याऐवजी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे . या सर्व परिस्थिची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने दखल घेऊन या भागात बाहेर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे .
पोलीसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख मशिदींच्या ध्वनिक्षेपकांवरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते . मात्र उनाड व टारगट प्रवृत्तींच्या लोकांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे वर्तमान परिस्थितीवरून दिसून येत आहे .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget