देऊळघाट येथे महानगरातून आलेल्या 99 लोकांना केले "होम कोरोनटाइन"
♦महानगरातून आलेले आहे 200 पेक्षा जास्त लोक
🟢येथे "लॉकडाउन" ठेंग्यावर
बुलडाणा - 26 मार्च
जवळ असलेल्या देऊळघाट येथे आज 26 मार्चला जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने महानगरातून आलेल्या 99 लोकांच्या हातावर शिक्का मारून त्यांना पुढील 14 दिवससाठी होम कोरोनटाइन करण्यात आले आहे.हे लोक आजारी नसून फक्त खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली असली तरीही येथील जनता कलम 144 चा सर्रास उल्लंघन करीत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या गावा पैकी देऊळघाट एक आहे जे बुलडाणा पासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे.येथील अनेक लोक रोजगारसाठी मुंबई,भिवंडी,पुणे,सूरत अश्या महानगरात गेलेले आहे.मागील काही दिवसापासुन कोरोना वायरसने देश भरात थैमान घातले असून संपूर्ण देशा लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली.अनेक महानगरात गेलेले लोक आपल्या मुळ गावी परतले.देऊळघाट येथे आरोग्य सेविका,आशा वर्कर यांच्या माध्यमाने बाहेर गावातून आलेल्या लोकांचा सर्वे करण्यात आला.मुंबई,पुणे या शहरात कोविड-19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून आले म्हणू ग्राम पंचायत व जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने खबरदारी घेत देऊळघाट या गावात बाहेरुन आलेल्या लोकांना घरीच थांबवन्याचे सांगितले तरीही बरेच लोक बाहेर फिरत होते म्हणून आज आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी सरपंच गज़नफर खान,तंटामुक्त समिति अध्यक्ष जुनैद खान,बिट जमादार चोपडे यांना सोबत घेऊन आपली आरोग्य टीम घेऊन बाहेरुन आलेल्या लोकांच्या घरी पोचले व 99 लोकांच्या हाती होम कोरोनटाइनचा शिक्का लावून त्यांना पुढील 14 दिवस घरी राहण्याचे निर्देश दिले.हे सर्व 99 लोकांची तब्यत बरी असून फक्त खबरदारी म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ यांनी दिली आहे.लोकांनी आपल्या घरीच रहावे,कोणीही बेकाम घरा बाहेर येऊ नये अशी विनंती सरपंच गज़नफर खान यांनी केली आहे.