Latest Post

सध्या भारतात तसेच महाराष्ट्रात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आहे तरी सदर बाब लक्षात घेता अहमदनगर जिल्हयात मा जिल्हाधिकारी सो यांनी अहमदनगर जिल्हयात संचार बंदी लागू केली आहे सदरच्या आदेशामधुन अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे तरी अत्यावश्यक सेवा बजावणारे अधिकारी / कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेशी निगडीत असणारे सर्व नागरीक यांना आपली सेवा बजावत असतांना काही अडचण / तक्रार असल्यास त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर फोन करावा अगर व्हॉटसअप क्रमांकावर मेसेज करावा जेणेकरुन आम्हास आपल्या अडचण / तक्रारीचे निवारण करणे सोईस्कर होईल .
नियंत्रण कक्ष अहमदनगर (१) . ०२४१२४१६१०० (२) . ०२४१२४१६१३२ (३) . ०२४१२४१६१३८
(४) . १०० नियंत्रण कक्ष अहमदनगर व्हॉटसअप क्रमांक (१) . ९१५६४३८०८८


बुलढाणा - 24 मार्च
सरकारी अनाज की तस्करी की गुप्त जानकारी मिलने के बाद  चिखली तहसीलदार ने अपनी टीम के साथ एक गोडाउन पर छापा मारकर करीब 525 कट्टे चावल व गेहूं के पकडे हैं. इस मामले में के बाद अंढेरा पुलिस स्टेशन में अनाज तस्कर के खिलाफ जीवनावश्यक वस्तु अधिनियम के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.
      चिखली के तहसिलदार अजितकुमार येले को 23 मार्च की शाम में गुप्त जानकारी मिली कि ग्राम मेरा खुर्द के पास गुट क्र 36 में संतोष डोंगरदिवे के खेत स्थित जिनिंग की इमारत में सरकारी अनाज की कालाबाज़ारी कर ज़खीरा किया गया है पश्चात तहसीलदार येले ने अपनी टीम गठित कर रात 8:30 बजे के करीब चिखली तहसिल के ग्राम मेरा खुर्द के पास उक्त स्थान पर पहोंचे जहां उन्हें एक मालवाहू वाहन क्र MH 20 BT 3995 नज़र आई जो गेहूं के कट्टों से आधी भरी हुई थी पश्चात जिनिंग का जायज़ा लेने पर वहां गेहूं और चावल के पोतों का जखीरा नज़र आया. रात का अंधेरा हो जाने के कारण टीम वहीं रुकी रही और आज सुबह 8 बजे वहां मौजूद अनाज की गिनती की गई जिसमें 435 कट्टे चावल 180 क्विंटल और 89 कट्टे गेहूं 44 क्विंटल मिले जिसे सील कर दिया गया.इस कार्रवाई में चावल,गेहूं,पोते सीने की मशीन,मालवाहू वाहन इस प्रकार कुल 5 लाख 11 हज़ार का साहित्य जप्त किया गया है.तहसीलदार अजितकुमार येले की शिकायत पर अंढेरा पुलिस थाने में आरोपी मनोज पांडुरंग खेडेकर के खिलाफ जीवनावश्यक वस्तु अधिनियम कज धारा 3,7 के तहत अपराध दर्ज कर लिया गया है.बता दे कि आरोपी मनोज खेडेकर चिखली कृषि उतपन्न बाज़ार समिति में संचालक है और जिसके पिता बुलढाणा जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष रहे चुके हैं.

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण मंगळवारी (दि. २४ मार्च) आढळून आला. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठविण्यात आला होता. त्याचा मंगळवारी अहवाल आला. त्यात तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला नाही किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातही आलेला नव्हता.          सदरचा रुग्णाला सर्दी, खोकला येत असल्याने तो स्वत:हून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो कोणाच्याही संपर्कात आलेला नव्हता. त्याला लगेच नगर येथील एका रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. सदरचा रुग्ण हा एका शहरातला असून तो विदेशातून किंवा अन्य कोणत्या गावातून आलेला नव्हता. हा वेगळा स्वतंत्र रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता लोकांनी मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील २०८ जण संशयित असल्याचे आढळून आले होते. त्यापैकी जवळपास १९७ जणांना घरी पाठविण्यात आलेले आहे. याशिवाय दोन जणांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोना महामारीने सर्वांना हतबल केले आहे. जगभरात प्रयत्न केले जात आहेत असे नाहीय, किंवा त्यांच्याकडे यंत्रणा नाहीय असे नाहीय. परंतू कोरोनाचा वेग एवढा आहे की, ते ही काही करू शकत नाहीत. यामुळे आज रात्रीपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची सायकल तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मोदी यांनी दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची वेळ मी मागत आहे. यामुळे आज मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन करत आहे. पुढील २१ दिवस लोकांनी घरातच थांबावे, ही कर्फ्यूसारखी स्थिती आहे. याला सहकार्य़ करावे असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले आहे. जर आपण २१ दिवस काळजी घेतली नाही तर आपण २१ वर्षे मागे जाऊ. कोरोना इन्फेक्टेड झालेल्या रुग्णाला सुरुवातीचे काही दिवस कोणतीय लक्षणे दिसत नाहीत. यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची शक्यता आहे, असेही मोदी म्हणाले.या लॉकडाऊनची आर्थिक किंमत नक्कीच देशाला सोसावी लागेल. परंतु यावेळी प्रत्येक भारतीयांचे जीवन वाचवणे ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. भारत सरकार, देशातील प्रत्येक राज्य सरकार, प्रत्येक स्थानिक संस्था यांची ही जबाबदारी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

अहमदनगर-दिनांक २४ / ०३ / २०२० रोजी श्री . दिलीप पवार , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि , जिल्हा परीषद उर्दू शाळा रामगड ता . श्रीरामपुर येथे दोन इसम हे एक गावठी कटटा व जिवंत कडतुस हे विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोहेकॉ / मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , पोना / रविन्द्र आबासाहेब कर्डीले , संतोष लोढे , सचिन अडबल , पोकॉ / राहुल सोळंके , प्रकाश वाघ , मच्छींद्र बर्डे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार जिल्हा परीषद उर्दू शाळा रामगड ता . श्रीरामपुर येथे जावुन सापळा लावुन बातमीतील नमुद दोन इसमास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव , पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव , पत्ता १ ) राजेंद्र ऊर्फ पप्पु भिमा चव्हाण वय २३ रा बेलापुर बु , खटकळी ता . श्रीरामपुर जि . अ . नगर २ ) सुलतान ऊर्फ इटकर मुक्तार शेख वय २४ रा . रामगड ता . श्रीरामपुर जि . अ . नगर असे सांगीतले . त्यांची पंचासमक्ष पोहेकॉ / मनोज गोसावी यांनी अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये ३० , ००० / - रु . किंमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व ५०० रु . कि . चे जिवंत काडतुस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेला असुन सदर बाबत श्रीरामपुर शहर पो . स्टे . येथे गुरनं . ॥ / २०२० , भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ . ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई श्रीरामपुर शहर पो . स्टे . हे करीत आहेत . * आरोपी नामे पण ऊर्फ राजेंद्र भिमा चव्हाण याचेविरुध्द दाखल असलेले गुन्हे खालीलप्रमाणे * १ . कालीकानगर पो स्टे , नाशीक गुरजी नं . ५८ / २००२ भा . द . वि कलम ३९९ , ४०२ २ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . २९९ / २०१८ आर्म अॅक्ट ४ / २५ ३ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . ४२५ / २०१९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ ४ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . ४०८ / २०१९ भा . द . वि कलम ३९९ , ४०२
सदरची कारवाई मा . श्री . सागर पाटील साहेब , प्रभारी पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . दिपाली काळे / कांबळे मॅडम , अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपुर व मा . श्री . राहुल मदने साहेब , उप . विभा . पोलीस अधिकारी साो , श्रीरामपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे .

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-  बेलापूर पोलीसांना आणखी  एक मृतदेह आढळून आला असुन तो वयोवृध्द ईसमाचा आहे बेलापूर श्रीरामपूर रोडवर असणार्या हाँटेल महाराष्ट्र समोर एका वयोवृध्द ईसमाचा मृतदेह आढळून आला असुन पुढील तपास हवालदार लोटके हे करत आहे.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर पढेगाव रोडवर असणार्या कानिफनाथ मंदिराजवळ असणार्या काटवनात एका तरुणाने आत्महत्या केली असुन या आत्महत्ये बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे     बेलापूर येथील रविंद्र अरुण पाटोळे वय वर्ष २६ याने पढेगाव रस्त्यावर असणार्या कानिफनात मंदिराजवळ असणार्या काटवनात झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली या बाबतची फिर्याद मयताचा भाऊ सुभाष पाटोळे याने बेलापूर पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहीती समजताच अनेकांंनी बेलापूर पोलीस स्टेशनला गर्दी केली रविंद्र यांने आत्महत्या का केली याचे कारण समजले नसले तरी नागरीकात वेगवेगळी चर्चा चालु आहे घटनेची माहीती समजताच पोलीस हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत रविंद्र यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटलला हलविले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget