बेलापूर ( प्रतिनिधी )- बेलापूर पढेगाव रोडवर असणार्या कानिफनाथ मंदिराजवळ असणार्या काटवनात एका तरुणाने आत्महत्या केली असुन या आत्महत्ये बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे बेलापूर येथील रविंद्र अरुण पाटोळे वय वर्ष २६ याने पढेगाव रस्त्यावर असणार्या कानिफनात मंदिराजवळ असणार्या काटवनात झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली या बाबतची फिर्याद मयताचा भाऊ सुभाष पाटोळे याने बेलापूर पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहीती समजताच अनेकांंनी बेलापूर पोलीस स्टेशनला गर्दी केली रविंद्र यांने आत्महत्या का केली याचे कारण समजले नसले तरी नागरीकात वेगवेगळी चर्चा चालु आहे घटनेची माहीती समजताच पोलीस हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत रविंद्र यास तातडीने साखर कामगार हाँस्पीटलला हलविले
Post a Comment