बुलडाणा जिल्ह्यातील शहरी भागात आजपासून जमावबंदी आदेश लागू

🔹जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद
♦5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही
बुलडाणा - 22  मार्च 
राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात आजपासून ते 31 मार्च 2020 चे मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमाव करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.
      नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.
        किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने 100  टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असणारे हातावर शिक्का असणारे व्यक्ती यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने अफवा, अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतिक्रीया व्हॉट्सॲप, ट्विटर व फेसबुक आदी कोणत्याही पद्धतीने प्रसारीत करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

*कलम 144 नुसार यावर असणार मनाई*
जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे कायर्क्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा. कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, मोर्चे, देशातंर्गत व परदेशी सहली. दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा व संग्रहालये. खाजगी ट्रॅव्हल्स, बसेस, राज्य परिवहन महामंडळ बसेस, रूग्ण व अत्यावश्यक सेवेची वाहने सोडून अन्य व्यावसायिक वाहने. सर्व धार्मिक स्थळे भाविकांकरीता बंद राहतील, परंतु नित्य पुजा अर्चा 5 पेक्षा कमी व्यक्तींद्वारे सुरू राहील.

*कलम 144 यांना लागू असणार नाही*
शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूगणालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी. शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, भाजीपाला व फळे विक्रेते, औषधालय, दवाखाने, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, पाच पेक्षा कमी व्यक्ती एकावेळी उपस्थित राहतील असे जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण. प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये, पोस्ट ऑफीसेस, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी. जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक), शासकीय / निमशासकीय कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget