आज मध्यरात्रीपासून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; पंतप्रधान मोदींची घोषणा.

कोरोना महामारीने सर्वांना हतबल केले आहे. जगभरात प्रयत्न केले जात आहेत असे नाहीय, किंवा त्यांच्याकडे यंत्रणा नाहीय असे नाहीय. परंतू कोरोनाचा वेग एवढा आहे की, ते ही काही करू शकत नाहीत. यामुळे आज रात्रीपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे की, एकमेव उपाय त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच एक उपाय आहे. कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या संक्रमणाची सायकल तोडायलाच हवी. सोशल डिस्टंस केवळ रुग्णासाठी नाही तर प्रत्येकासाठी गरजेचा आहे. पंतप्रधानालाही हे गरजेचे आहे. यामुळे चुकीचा विचार करू नका. आप्तेष्ठांना आणि पुढे जाऊन देशाला मोठ्या संकटात टाकाल. बेजबाबदारपणा असाच राहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मोदी यांनी दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची वेळ मी मागत आहे. यामुळे आज मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन करत आहे. पुढील २१ दिवस लोकांनी घरातच थांबावे, ही कर्फ्यूसारखी स्थिती आहे. याला सहकार्य़ करावे असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले आहे. जर आपण २१ दिवस काळजी घेतली नाही तर आपण २१ वर्षे मागे जाऊ. कोरोना इन्फेक्टेड झालेल्या रुग्णाला सुरुवातीचे काही दिवस कोणतीय लक्षणे दिसत नाहीत. यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची शक्यता आहे, असेही मोदी म्हणाले.या लॉकडाऊनची आर्थिक किंमत नक्कीच देशाला सोसावी लागेल. परंतु यावेळी प्रत्येक भारतीयांचे जीवन वाचवणे ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहे. भारत सरकार, देशातील प्रत्येक राज्य सरकार, प्रत्येक स्थानिक संस्था यांची ही जबाबदारी आहे, असे मोदी यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget