अहमदनगर-दिनांक २४ / ०३ / २०२० रोजी श्री . दिलीप पवार , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि , जिल्हा परीषद उर्दू शाळा रामगड ता . श्रीरामपुर येथे दोन इसम हे एक गावठी कटटा व जिवंत कडतुस हे विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोहेकॉ / मनोज गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , पोना / रविन्द्र आबासाहेब कर्डीले , संतोष लोढे , सचिन अडबल , पोकॉ / राहुल सोळंके , प्रकाश वाघ , मच्छींद्र बर्डे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार जिल्हा परीषद उर्दू शाळा रामगड ता . श्रीरामपुर येथे जावुन सापळा लावुन बातमीतील नमुद दोन इसमास ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव , पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव , पत्ता १ ) राजेंद्र ऊर्फ पप्पु भिमा चव्हाण वय २३ रा बेलापुर बु , खटकळी ता . श्रीरामपुर जि . अ . नगर २ ) सुलतान ऊर्फ इटकर मुक्तार शेख वय २४ रा . रामगड ता . श्रीरामपुर जि . अ . नगर असे सांगीतले . त्यांची पंचासमक्ष पोहेकॉ / मनोज गोसावी यांनी अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये ३० , ००० / - रु . किंमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व ५०० रु . कि . चे जिवंत काडतुस मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेला असुन सदर बाबत श्रीरामपुर शहर पो . स्टे . येथे गुरनं . ॥ / २०२० , भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ . ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई श्रीरामपुर शहर पो . स्टे . हे करीत आहेत . * आरोपी नामे पण ऊर्फ राजेंद्र भिमा चव्हाण याचेविरुध्द दाखल असलेले गुन्हे खालीलप्रमाणे * १ . कालीकानगर पो स्टे , नाशीक गुरजी नं . ५८ / २००२ भा . द . वि कलम ३९९ , ४०२ २ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . २९९ / २०१८ आर्म अॅक्ट ४ / २५ ३ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . ४२५ / २०१९ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ ४ . श्रीरामपुर शहर पो स्टे गुरजी नं . ४०८ / २०१९ भा . द . वि कलम ३९९ , ४०२
सदरची कारवाई मा . श्री . सागर पाटील साहेब , प्रभारी पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . दिपाली काळे / कांबळे मॅडम , अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपुर व मा . श्री . राहुल मदने साहेब , उप . विभा . पोलीस अधिकारी साो , श्रीरामपुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे .
Post a Comment