Latest Post

मुंबई : (१९ मार्च ) करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ (३० एप्रिल पर्यंत)देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री ,व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली एसटीने आपल्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना संभाव्य संसर्ग होऊ नये म्हणून, विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या सवलत स्मार्ट -कार्ड ची मुदत ३१ मार्च ऐवजी एक महिना वाढवून 30 एप्रिल अशी करण्यात आली आहे .त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या 31 मार्च पर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई गडबड करू नये असे आवाहन मंत्री, अॅड. परब यांनी केले आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या 250 आगारामध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी वितरका मार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु करोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आला असून १ एप्रिल नंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची ची व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे .तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत असुन त्याचाच एक भाग म्हणून कार्डधारकांना तीन महीन्याचे धान्य एकाच वेळी देण्यात यावे अशी मागणी अहमदनगर  जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार  संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी पुरवठा मंत्र्याकडे केली आहे   पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना सुरु केल्या आहेत गर्दीच्या ठिकाणी  एकत्र न येण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे शासनाने कार्डधारकाना वितरीत करावयाचा धान्याचा कोठा एकाच वेळेस तिन महीन्याचा दिल्यास कार्डधारकाची दुकानात गर्दी होणार नाही तसेच दुकानदार टप्प्याटप्प्याने दुकानावर गर्दी होवु न देता वितरण करतील कारण धान्य दुकानात धान्य आल्यास कार्डधारक एकाच वेळेस गर्दी करतात एकाच वेळेस तीन महीन्याचे धान्य दिल्यावर दुकानावर जास्त गर्दी होणार नाही शासनाने या मागणीचा विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर देविदास देसाई  रज्जाक पठाण मिनाताई कळकुंबे विश्वासराव जाधव बाळासाहेब दिघे कैलास बोरावके ज्ञानेश्वर  वहाडणे सुरेश उभेदळ बाळासाहेब देवखीळे सुरेश कोकाटे रावसाहेब भगत बाबा कराड भाऊसाहेब वाघमारे बजरंग दरंदले माणिक जाधव बाबासाहेब ढाकणे मुकुंद सोनटक्के आदिच्या सह्या आहेत

बेलापूर (प्रतिनिधी  )-माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार बेलापूर ग्रामपंचायत व बेलापूर पोलीस स्टेशन यांनी आवाहन करताच ग्रामस्थांनी तातडीने आपापली दुकाने बंद करून शासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला कोरोणा विरोधात लढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यानी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसायिकांनी आपापले व्यवहार बंद करावेत असे आवाहन केले होते या आवाहनानुसार बेलापूर ग्रामपंचायत तसेच बेलापूर पोलीस स्टेशन यांनी गावात दवंडी देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते  त्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायिक यांनी तातडीने आपापली दुकाने बंद केली बेलापूर गावात केवळ दवाखाने मेडिकल किराणा दुकाने भाजीपाला व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती बेलापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता नागरिकांनीदेखील चौकाचौकात गर्दी न करता दुरदर्शन संचासमोर बसणे पसंत केले

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ३० अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडनीय
आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस आदींना मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील. जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांच्या आयोजनास बंदी राहील. मंदिर, मशिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणारी दुकाने/सेवा आस्थापना, उपाहारगृहे/खाद्यगृहे/
खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर आदी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.
यांना आदेशातून वगळले-शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील. परंतु येथेही गर्दी टाळण्याचे आवाहन आहे. दहावी, बारावी, तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाºया सर्व स्पर्धा परीक्षा विद्यापीठ/विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती, प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालिके/टीव्ही न्यूज चॅनेल) कार्यालय चालू राहतील.
कारवाईस पात्र -कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १९६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ४३ (१) मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर(प्रतिनिधी )भोजडे ता.कोपरगाव येथील सुरेश शामराव गिरे व रवि आप्पसाहेब शेटे व त्याचे टोळीतील साथीदारांसोबत
सुरेश गिरे हे रवि शेटे यांचे पुर्व वैमनस्य होते. सदर वैमनस्यातुनच वारंवार भांडणे होवुन त्यांचे एकमेकांविरुद्ध कोपरगाव
तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. त्यातुनच सन-२०१२ मध्ये रवि शेटे व त्याचे साथीदारांनी सुरेश गिरे यांचा
मित्र बंटी ऊर्फ विरेश पुंजाहरी शिनगर यांचा खुन केला होता. सदर गुन्ह्यामध्ये रवि शेटे व त्याचे इतर साथीदारांना जन्म
ठेपेची शिक्षा झालेली आहे.दिनांक.१५/०३/२०२० रोजी सायंकाळी ०६:४५ वाजेचे सुमारास भोजडे ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथे सुरेश शामराव गिरे हे त्यांचे राहते घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुटूंबासह बसलेले असताना एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार व एक काळे रंगाची पल्सर मोटारसायकल अशा गाड्या त्यांच्या घरासमोर येवुन थांबल्या. स्विफ्ट कार मधुन ४ लोक व पल्सर मोटारसायकलवर १) रवि आप्पासाहेब शेटे २) विजु खर्डे व अनोळखी इसमांनी येवुन सुरेश गिरे यांचे दिशेने पिस्तुल मधुन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने सुरेश गिरे हे जिव वाचविण्यासाठी घराचे पाठीमागे पळु लागल्याने रवि शेटे, विजु खर्डे व त्यांचे सोबतचे अनोळखी साथीदार मारेकऱ्यांनी सुरेश गिरे यांचा पाठलाग करुन त्यांचेवर गावठी कट्याने गोळीबार करुन, हातातील कोयत्याने तोंडावर व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर वार करुन सुरेश गिरे यांना जिवे ठार मारुन त्यांचा निघुन खुन करुन मारेकऱ्यांनी आणलेल्या वाहनांवर निघुन गेले वगैरे मजकुराची फिर्याद फिर्यादी श्री.शामराव भिमराव गिरे रा.भोजडे ता.कोपरगाव यांनी दिलेल्या फियादीरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं। ८८/२०२० भा.दं.वि.कलम.३०२, ४४२, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५, ७/२५, २७
प्रमाणे दिनांक.१६/०३/२०२० रोजी ०४:४३ वाजता दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.सागर पाटील सोा. अहमदनगर यांचे आदेशाने
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पवार सो. यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी
मिळाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवि आप्पासाहेब शेटे याने सुमारे १५ दिवसांपासुन गुन्ह्याचा नियोजनबद्ध कट करुन तळेगाव जि.पुणे येथुन भाडोत्री मारेकरी आणुन गुन्हा केलेला आहे. त्याअनुशंगाने गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करत असताना रवि शेटे व विजु खर्डे याचे सोबत असलेले अनोळखी मारेकरी व इतर आरोपी नामे १) नितीन सुधाकर अवचिते राहणार-तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, लाख्ने वस्ती शेजारी, खांडगे कॉलनी समोर, भारत पेट्रोलपंप मागे,ता-मावळ, जि-पुणे २) शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे मुळ रा. घर.नं ३४५,गारख्नेडा परिसर, इंदीरानगर, ता.जि.औरंगाबाद ३) रामदास माधव बलटे रा.लौकी पोस्ट दहेगाव बोलका ता.कोपरगाव जि.अहमदनगर ४) आकाश मोहन गिरी रा.खराबवाडी, संजिवनी हॉस्पिटल समोर, चाकण ता.खेड जि.पुणे यांना सदर गुन्ह्यात विवीध ठिकाणी सापळा लावुन शिताफीने नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन त्यांनी सदर गुन्हा केल्याची
कबुली दिली आहे.गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नामे नितीन सुधाकर अवचिते रा.तळेगाव जि.पुणे हा सहाईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) तळेगाव दाभाडे पो स्टे जि.पुणे गु.र.नं २०४/२०१६ भा.दं.वि.३०२, १४३, १४७, १४८, १२०(ब), २०१
२) तळेगाव दाभाडे पो स्टे जि.पुणे गु.र.नं ७६/२००८ भा.दं.वि.३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४
३) वडगाव मावळ पो स्टे जि.पुणे गु.र.नं २४/२०१८ भा.ह.का.३/२७
४) वाकड पो स्टे जि.पुणे गु.र.नं ५६१/२०१८ भा.ह.का.४/२५
५) दत्तवाडी पो स्टे जि.पुणे गु.र.नं ३०६३/२०१५ म.पो.अधि.३७(१),७, १३५
६) येरवडा पो स्टे जि.पुणे गु.र.नं ५८६/२०१७ म.पो.अधि.३७(१),३, १३५
गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नामे शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे मुळ.रा. घर.नं ३४५, गारखेडा परिसर, इंदीरानगर, ता.जि.औरंगाबाद हा सहाईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 
१) चाकण पो स्टे जि.पुणे गु.र.नं.६२२/२०१९ भा.दं.वि.३४१, ३२३, ४२७, १२०(ब), ३४
२) जी.आर.पी पो स्टे जि.पुणे गु.र.नं २५/२०१६ भा.दं.वि.३७६
३) चाकण पो स्टे जि.पुणे गु.र.नं ३४२/२०१९ म.पो.अधि.३७, १३५
सदरची कारवाई ही मा.प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर श्री.सागर पाटील सो, अपर पोलीस
अधीक्षक, श्रीरामपुर श्रीमती.दिपाली काळे मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री.सोमनाथ
वाकचौरे सोा. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
अहमदनगर, पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके कोपरगाव तालुका पो स्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे
सपोनि-संदिप पाटील, सपोनि-शिशीरकुमार देशमुख, पो उपनिरी- गणेश इंगळे कर्मचारी सफौ- नानेकर,
गाजरे, पोहेकॉ- मुळीक, गोसावी, वेठेकर, गव्हाणे, पोना-कर्डीले, सोनटक्के, शिंदे, चौधरी, लोढे, दळवी, पोकॉ-
सातपुते, वाघ, ढाकणे, धनेधर, मासाळकर, बर्डे, मिसाळ, सोळंके, ससाणे, घोडके, माळी, जाधव, पवार, वाबळे,
कोल्हे, गायकवाड, चालक- भोपळे, बेरड, कोतकर, बुधवंत, कोळेकर, काळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे करत आहेत.

सावळीविहीर प्रतिनिधी
   राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे गुरुवारचा आठवडे बाजार जिल्हाधिकारी यांचा प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही रुई  रोड येथे भरला गेला,
 या  बाजाराकडे येथील शासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, संपूर्ण राज्य, देश कोरोनो व्हायरसमुळे शांततेत असताना येथे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,
   । कोरनो व्हायरसमुळे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी जमावबंदीचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू केलेले असताना व जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे मात्र आज गुरुवारचा आठवडे बाजार जागा बदलून रुई रोड येथे भरला गेला या बाजारात अनेक व्यापारी शेतकरी किराणा दुकानदार भेळे वाले, भाजीपाला वाले, मोठ्या प्रमाणात आल्याने आसपासच्या गावातील लोकही खरेदी करण्यासाठी येथे येऊन मोठी गर्दी करण्यात आली असे असतानाही शासकीय कर्मचारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होते रस्त्यावर बाजार भरल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता
  या भरलेल्या आठवडे बाजारात अनेक बाजार विक्रेते व भाजीपाला व इतर सामान खरेदी करणाऱ्या लोकांनीही महिलांनी ही दक्षता म्हणून कोणतीही काळजी घेताना दिसत नव्हते दुपारी या बाजारात आणखी गर्दी वाढत होती तरी प्रशासन मात्र होते,जमाव बंदी आदेशाचे उल्नघन,
सावलीविहिर येथिल शासकीय अधिकारी यांच्यावर  कर्तव्यात कसूर केल्यामुळे ,मा जिल्हा अधिकारी यांनी कारवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे
सगळीकडे कोरोना चा प्रसार होत असताना खबरदारी म्हणून  जमाव बंदी चा आदेश असतांना  सावळीविहीर येथे गुरुवारचा आठवडे बाजार
 सुरूच ,प्रशासनाचे ही गोस्ट गांभीर्याने घेतली नाही, जर या जमावातील बाजारात कोणाला कोरोनाचा रुग्ण असेल तर त्या पासून अनेक रुग्ण तयार होतील
याला जबाबदार कोण, आशा या नाजूक घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधीकारी यांच्यावर कारवाही करून त्याची बदली करावी अशी मागणी परिसरात जोर धरून आहे

बुलडाणा - 17 मार्च
वैद्यकिय क्षेत्रातील शिक्षणासाठी फिलीपीन्स येथील अमा विद्यापिठात भारतातुन शिकायला
जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यात बुलडाणा जिल्ह्यातील 13 विद्यार्थांचाही समावेश असून या विद्यार्थांना स्वदेशी आणण्यासाठी योग्य ती ठोस पाऊले उचलण्यात यावीत अशी आग्रही मागणी केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी भारत सरकारचे विदेश मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकरजी यांच्याकडे आज केली आहे.
        विद्यमान परिस्थीतीत करोना विषाणु वेगाने फैलत आहे. त्यामुळे 17 मार्चला यात्रा प्रतिबंधित आदेश भारत सरकारने लागु केला आहे. या आदेशान्वये परदेशातुन येणाऱ्यांना रोखण्यात आले आहे. सोबतच पर्यटनही थांबविले आहे. फिलीपीन्स मध्ये बुलडाणा जिल्हयातील सुमारे 13 जण वैद्यकिय उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत.करोनाच्या चिंतेमुळे हे विद्यार्थी घराकडे स्वदेशी यावेत अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडुन केली जात आहे. सद्या त्या राष्ट्रातील नियमानुसार माहिती शिवाय विद्यार्थांना परत आणण्यावर निर्बंध आहे. विना परवानगी ते विद्यार्थी परत आले तर त्यांचे पारपत्र (पास पोर्ट) आणि त्यांचा शिक्षण प्रवेशही रद्द केला जाऊ शकतो. तसेच त्यांना पुन्हा देशात प्रवेश मिळणे अथवा शिक्षण प्रवेश मिळणे थांबविले जाणार आहे. यातील अनेक विद्यार्थांसमोरील मोठे संकट म्हणजे त्याचा व्हिजा सुध्दा संपला असुन त्यांनी नविन व्हिजा मिळण्यासाठी संबधित कॉलेज आणि संस्थेच्या अनुमतीने अर्ज दाखल केला आहे. मात्र करोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमिवर या संबधी काही निबंध लादले असुन व्हिजा मिळायला आडकाठी झाली आहे. बुलडाणा जिल्हयातील सुमारे 13 विद्यार्थी यांच्या नातेवाईंकाची मागणी असुन या विद्यार्थांना स्वदेशात आणण्यासाठी ठोस योग्य निर्णय घेतल्या जावा अशी मागणी भारत सरकार चे विदेश मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकरजी यांच्याकडे केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी केली आहे. सोबत सदर विद्यार्थांची माहीती सुध्दा दिली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget