बेलापूर (प्रतिनिधी )-माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार बेलापूर ग्रामपंचायत व बेलापूर पोलीस स्टेशन यांनी आवाहन करताच ग्रामस्थांनी तातडीने आपापली दुकाने बंद करून शासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला कोरोणा विरोधात लढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यानी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसायिकांनी आपापले व्यवहार बंद करावेत असे आवाहन केले होते या आवाहनानुसार बेलापूर ग्रामपंचायत तसेच बेलापूर पोलीस स्टेशन यांनी गावात दवंडी देऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायिक यांनी तातडीने आपापली दुकाने बंद केली बेलापूर गावात केवळ दवाखाने मेडिकल किराणा दुकाने भाजीपाला व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती बेलापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता नागरिकांनीदेखील चौकाचौकात गर्दी न करता दुरदर्शन संचासमोर बसणे पसंत केले
Post a Comment