ज्येष्ठांच्या सवलत स्मार्ट-काडॆला एक महिना मुदतवाढ,-मंत्री,अँड.अनिल परब यांची माहिती

मुंबई : (१९ मार्च ) करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ (३० एप्रिल पर्यंत)देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री ,व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली एसटीने आपल्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना संभाव्य संसर्ग होऊ नये म्हणून, विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बस स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या हेतूने 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या सवलत स्मार्ट -कार्ड ची मुदत ३१ मार्च ऐवजी एक महिना वाढवून 30 एप्रिल अशी करण्यात आली आहे .त्यामुळे स्मार्टकार्ड घेणाऱ्या ज्येष्ठांनी या 31 मार्च पर्यंत स्मार्ट कार्ड घेण्यासाठी घाई गडबड करू नये असे आवाहन मंत्री, अॅड. परब यांनी केले आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या 250 आगारामध्ये तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी वितरका मार्फत ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांकाशी संलग्न असलेली स्मार्ट कार्ड देण्यात येत आहेत. परंतु करोना विषाणूच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आला असून १ एप्रिल नंतर उर्वरित ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची ची व्यवस्था पूर्ववत करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे .तोपर्यंत जुन्या पद्धतीनुसारच ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget