कोपरगाव येथील सुरेश शामराव गिरे यांचा निघृण खुन करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचेकडुन जेरबंद.

अहमदनगर(प्रतिनिधी )भोजडे ता.कोपरगाव येथील सुरेश शामराव गिरे व रवि आप्पसाहेब शेटे व त्याचे टोळीतील साथीदारांसोबत
सुरेश गिरे हे रवि शेटे यांचे पुर्व वैमनस्य होते. सदर वैमनस्यातुनच वारंवार भांडणे होवुन त्यांचे एकमेकांविरुद्ध कोपरगाव
तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. त्यातुनच सन-२०१२ मध्ये रवि शेटे व त्याचे साथीदारांनी सुरेश गिरे यांचा
मित्र बंटी ऊर्फ विरेश पुंजाहरी शिनगर यांचा खुन केला होता. सदर गुन्ह्यामध्ये रवि शेटे व त्याचे इतर साथीदारांना जन्म
ठेपेची शिक्षा झालेली आहे.दिनांक.१५/०३/२०२० रोजी सायंकाळी ०६:४५ वाजेचे सुमारास भोजडे ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथे सुरेश शामराव गिरे हे त्यांचे राहते घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुटूंबासह बसलेले असताना एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार व एक काळे रंगाची पल्सर मोटारसायकल अशा गाड्या त्यांच्या घरासमोर येवुन थांबल्या. स्विफ्ट कार मधुन ४ लोक व पल्सर मोटारसायकलवर १) रवि आप्पासाहेब शेटे २) विजु खर्डे व अनोळखी इसमांनी येवुन सुरेश गिरे यांचे दिशेने पिस्तुल मधुन अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्याने सुरेश गिरे हे जिव वाचविण्यासाठी घराचे पाठीमागे पळु लागल्याने रवि शेटे, विजु खर्डे व त्यांचे सोबतचे अनोळखी साथीदार मारेकऱ्यांनी सुरेश गिरे यांचा पाठलाग करुन त्यांचेवर गावठी कट्याने गोळीबार करुन, हातातील कोयत्याने तोंडावर व शरीरावर इतर ठिकाणी गंभीर वार करुन सुरेश गिरे यांना जिवे ठार मारुन त्यांचा निघुन खुन करुन मारेकऱ्यांनी आणलेल्या वाहनांवर निघुन गेले वगैरे मजकुराची फिर्याद फिर्यादी श्री.शामराव भिमराव गिरे रा.भोजडे ता.कोपरगाव यांनी दिलेल्या फियादीरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं। ८८/२०२० भा.दं.वि.कलम.३०२, ४४२, १४३, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५, ७/२५, २७
प्रमाणे दिनांक.१६/०३/२०२० रोजी ०४:४३ वाजता दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.सागर पाटील सोा. अहमदनगर यांचे आदेशाने
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिलीप पवार सो. यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी
मिळाली की, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवि आप्पासाहेब शेटे याने सुमारे १५ दिवसांपासुन गुन्ह्याचा नियोजनबद्ध कट करुन तळेगाव जि.पुणे येथुन भाडोत्री मारेकरी आणुन गुन्हा केलेला आहे. त्याअनुशंगाने गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करत असताना रवि शेटे व विजु खर्डे याचे सोबत असलेले अनोळखी मारेकरी व इतर आरोपी नामे १) नितीन सुधाकर अवचिते राहणार-तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, लाख्ने वस्ती शेजारी, खांडगे कॉलनी समोर, भारत पेट्रोलपंप मागे,ता-मावळ, जि-पुणे २) शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे मुळ रा. घर.नं ३४५,गारख्नेडा परिसर, इंदीरानगर, ता.जि.औरंगाबाद ३) रामदास माधव बलटे रा.लौकी पोस्ट दहेगाव बोलका ता.कोपरगाव जि.अहमदनगर ४) आकाश मोहन गिरी रा.खराबवाडी, संजिवनी हॉस्पिटल समोर, चाकण ता.खेड जि.पुणे यांना सदर गुन्ह्यात विवीध ठिकाणी सापळा लावुन शिताफीने नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन त्यांनी सदर गुन्हा केल्याची
कबुली दिली आहे.गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नामे नितीन सुधाकर अवचिते रा.तळेगाव जि.पुणे हा सहाईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) तळेगाव दाभाडे पो स्टे जि.पुणे गु.र.नं २०४/२०१६ भा.दं.वि.३०२, १४३, १४७, १४८, १२०(ब), २०१
२) तळेगाव दाभाडे पो स्टे जि.पुणे गु.र.नं ७६/२००८ भा.दं.वि.३४१, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४
३) वडगाव मावळ पो स्टे जि.पुणे गु.र.नं २४/२०१८ भा.ह.का.३/२७
४) वाकड पो स्टे जि.पुणे गु.र.नं ५६१/२०१८ भा.ह.का.४/२५
५) दत्तवाडी पो स्टे जि.पुणे गु.र.नं ३०६३/२०१५ म.पो.अधि.३७(१),७, १३५
६) येरवडा पो स्टे जि.पुणे गु.र.नं ५८६/२०१७ म.पो.अधि.३७(१),३, १३५
गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी नामे शरद मुरलीधर साळवे रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे मुळ.रा. घर.नं ३४५, गारखेडा परिसर, इंदीरानगर, ता.जि.औरंगाबाद हा सहाईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 
१) चाकण पो स्टे जि.पुणे गु.र.नं.६२२/२०१९ भा.दं.वि.३४१, ३२३, ४२७, १२०(ब), ३४
२) जी.आर.पी पो स्टे जि.पुणे गु.र.नं २५/२०१६ भा.दं.वि.३७६
३) चाकण पो स्टे जि.पुणे गु.र.नं ३४२/२०१९ म.पो.अधि.३७, १३५
सदरची कारवाई ही मा.प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर श्री.सागर पाटील सो, अपर पोलीस
अधीक्षक, श्रीरामपुर श्रीमती.दिपाली काळे मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री.सोमनाथ
वाकचौरे सोा. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
अहमदनगर, पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके कोपरगाव तालुका पो स्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे
सपोनि-संदिप पाटील, सपोनि-शिशीरकुमार देशमुख, पो उपनिरी- गणेश इंगळे कर्मचारी सफौ- नानेकर,
गाजरे, पोहेकॉ- मुळीक, गोसावी, वेठेकर, गव्हाणे, पोना-कर्डीले, सोनटक्के, शिंदे, चौधरी, लोढे, दळवी, पोकॉ-
सातपुते, वाघ, ढाकणे, धनेधर, मासाळकर, बर्डे, मिसाळ, सोळंके, ससाणे, घोडके, माळी, जाधव, पवार, वाबळे,
कोल्हे, गायकवाड, चालक- भोपळे, बेरड, कोतकर, बुधवंत, कोळेकर, काळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री.दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर हे करत आहेत.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget