फिलीपीन्स मध्ये अडकलेले बलडाणा जिल्हयातील 13 विद्यार्थांना स्वदेशी परत आणा, खा.प्रतापराव जाधव यांची विदेश मंत्रीकडे मागणी.

बुलडाणा - 17 मार्च
वैद्यकिय क्षेत्रातील शिक्षणासाठी फिलीपीन्स येथील अमा विद्यापिठात भारतातुन शिकायला
जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यात बुलडाणा जिल्ह्यातील 13 विद्यार्थांचाही समावेश असून या विद्यार्थांना स्वदेशी आणण्यासाठी योग्य ती ठोस पाऊले उचलण्यात यावीत अशी आग्रही मागणी केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी भारत सरकारचे विदेश मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकरजी यांच्याकडे आज केली आहे.
        विद्यमान परिस्थीतीत करोना विषाणु वेगाने फैलत आहे. त्यामुळे 17 मार्चला यात्रा प्रतिबंधित आदेश भारत सरकारने लागु केला आहे. या आदेशान्वये परदेशातुन येणाऱ्यांना रोखण्यात आले आहे. सोबतच पर्यटनही थांबविले आहे. फिलीपीन्स मध्ये बुलडाणा जिल्हयातील सुमारे 13 जण वैद्यकिय उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत.करोनाच्या चिंतेमुळे हे विद्यार्थी घराकडे स्वदेशी यावेत अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडुन केली जात आहे. सद्या त्या राष्ट्रातील नियमानुसार माहिती शिवाय विद्यार्थांना परत आणण्यावर निर्बंध आहे. विना परवानगी ते विद्यार्थी परत आले तर त्यांचे पारपत्र (पास पोर्ट) आणि त्यांचा शिक्षण प्रवेशही रद्द केला जाऊ शकतो. तसेच त्यांना पुन्हा देशात प्रवेश मिळणे अथवा शिक्षण प्रवेश मिळणे थांबविले जाणार आहे. यातील अनेक विद्यार्थांसमोरील मोठे संकट म्हणजे त्याचा व्हिजा सुध्दा संपला असुन त्यांनी नविन व्हिजा मिळण्यासाठी संबधित कॉलेज आणि संस्थेच्या अनुमतीने अर्ज दाखल केला आहे. मात्र करोनाच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमिवर या संबधी काही निबंध लादले असुन व्हिजा मिळायला आडकाठी झाली आहे. बुलडाणा जिल्हयातील सुमारे 13 विद्यार्थी यांच्या नातेवाईंकाची मागणी असुन या विद्यार्थांना स्वदेशात आणण्यासाठी ठोस योग्य निर्णय घेतल्या जावा अशी मागणी भारत सरकार चे विदेश मंत्री श्री.सुब्रमण्यम जयशंकरजी यांच्याकडे केंद्रिय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी केली आहे. सोबत सदर विद्यार्थांची माहीती सुध्दा दिली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget