कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौका समोरील मोरे कॉम्पलेक्स मधील प्रवीण कोठारी यांच्या मालकीच्या असलेल्या कोठारी सेल्स एजन्सीमध्ये मंगळवार दि.17 मार्च रोजी रात्री साडे आठवाजेच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा हल्लेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.मोरे कॉम्प्लेक्समध्ये प्रवीण कोठारी यांच्या मालकीचे कोठारी एजन्सी नावाचे दुकान आहे.नेहमी प्रमाणे ते दिवसभराच्या कामकाजाचा हिशोब चालू असताना अज्ञात पाच ते सहा हल्लेखोर मोटरसायकलवर येऊन दुकानात बळजबरीने घुसून पिस्तूलचा व चॉपरचा धाक दाखवून तेथे कामाला असलेल्या कामगाराकडून एकूण रोख 68 हजार रुपयांची रक्कम लुटून पळून गेल्याची घटना मंगळवारी रात्री साडे आठ वाजता घडली.घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच त्याठिकाणी एकच गर्दी उडाली होती. दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद या दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमुळे हल्लेखोरांचा सर्व गुन्हा सीसी टीव्हीत कैद झाला आहे. दरोड्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले होते.
Post a Comment