शिर्डी ।प्रतिनिधी ।
शिर्डी हे श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थस्थान असून येथे श्री साईंवर श्रद्धा ठेवूनच नुकतीच शिर्डी परिक्रमा झाली पण पोलीसांनी या शिर्डी परिक्रमा करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले मात्र ज्या पवित्र शिर्डीत बंदी असतानाही राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत, त्यावर मात्र अशी तत्परता ,कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी आत्तापर्यंत कधी केले नाही, हे कशाचे द्योतक आहे ,?असा सवाल शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांना मधून सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे,
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे ,येथे श्री साईंवर श्रद्धा ठेवून अनेक साईभक्त कशाचीही तमा न बाळगता स्वतःहून श्री साई दर्शनासाठी येत असतात, येथे साईंवर श्रद्धा ठेवून साई भक्त सर्वकाही दुःख, ,संकटे विसरून जात असतात ,अशा श्रद्धेतून येथे नुकतीच साईभक्त व शिर्डी करांनी श्री साई बाबांवर श्रद्धा ठेवून शिर्डी परिक्रमा केली शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना बाबांनी सुद्धा शिर्डीत प्लेगची साथ येऊ नये म्हणून शिवेवर जाऊन पीठ टाकायला लावले होते व त्यावेळी भयंकर असा प्लेग आजार सुद्धा शिर्डीत शिरकाव करू शकला नव्हता, हे सत्य असताना ,शिर्डीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून येथील साईभक्त महिलांनी शिर्डीच्या शिवेवर जाऊन श्री साईंवर श्रद्धा ठेवून पीठ टाकले ,कोरोनाचा आजार शिर्डीत येऊ नये म्हणून शिर्डी कर व राज्यातून इतर राज्यातून साई भक्तांनी येथे येवून परिक्रमा काढली, मात्र या परिक्रमा करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हेदाखल केेले,

ज्या शिर्डीत साई संस्थाने सन 1987 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन येथे साईभक्तांना व ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून कायमची दारूबंदी करण्यात यावी असे पत्र दिले असताना व येथे केव्हापासून दारूबंद
असताना आज शिर्डीत राजरोसपणे अनेक अवैध धंदे दारू धंदे ,,मटका, जुगार सर्रासपणे सुरू आहेत ,मात्र त्यावर कारवाई होत नाही ,अधून मधून कागदपत्रे दाखवण्यासाठी थातूरमातूर कारवाई केली जाते,
शिर्डी परिक्रमा करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाते ,तर मग शिर्डीत काही वर्षापासून अनेक अवैध धंदे सुरू असताना त्यावर कारवाई का केली जात नाही ,कुठे माशी शिंकते,हे साई भक्त
जाणत आहे शिर्डीत प्रथम पोलिसांनी हे अवैध धंदे बंद करावेत ,अवैध धंदे करणाऱ्यावर तत्परता दाखवून तातडीने कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,
उगाच कोरनोचा बागुलबुवा दाखवत व कायद्याचा बडगा उगारत साईवर श्रद्धा ठेवणाऱ्या साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये, असा इशाराही साईभक्त यांनी दिला आहे,
Post a Comment