,
शिर्डी। प्रतिनिधी।
शिर्डीत कोरोनामुळे श्री साईबाबा संस्थान ने प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथे या संस्थान प्रसादालयावर अवलंबून असणारे येथील भिकारी, साधुसंत ,तसेच ठरलेल्या प्रमाणे श्री साईं वर श्रद्धा ठेवून आलेल्या साईभक्तांची त्यामुळे भोजनाची गैरसोय होणार असून येथील ग्रामस्थ व साईभक्तांनी काही दिवसासाठी तरी स्वखर्चातून अशा लोकांसाठी, भक्तांसाठी भोजन प्रसादाची सोय करावी, अशी साईभक्त मधून मागणी होत आहे,
जगात ,देशात कोरोनो व्हायरसमुळे हाहाकार उडाला असून राज्यातील सर्वच देवस्थानानी अनेक महत्त्वाचे निर्णय त्यामुळे घेतले आहेत, शिर्डी हे तर जगद्विख्यात देवस्थान असून येथे दररोज हजारो साईभक्त देश-विदेशातून येत असतात, मात्र सध्याच्या कोरोनो वातावरणामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच रोडावली आहे, श्री साईबाबा संस्थान नेही ही येथे काही महत्वाचे निर्णय घेतले असून मंगळवारपासून प्रसादालय तसेच भक्तनिवास व मंदिरही दर्शनासाठी पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ,परंतु हा आदेश आज जाहीर झाला परंतु येथे रेल्वेने अगोदर बुकींग करून आलेल्या व ज्यांना या आदेशाची माहिती नाही अशा येथे आलेल्या ची तसेच राज्यातुन, परराज्यातून येणाऱ्या साई भक्तांची संख्या कमी परंतू ती आहेस, या माहीत नसलेल्या साईभक्तांसाठी प्रसादालय बंद असल्याने मोठी गैरसोय होणार आहे, तसेच येथील भिकारी, संत साधू, यांचेीही मोठी गैरसोय होणार आहे, अशा शिर्डीत आलेल्या साई भक्त व इतरांसाठी हॉटेलात जाऊन प्रसाद किंवा भोजन घेणे भाग पडणार आहे ,त्यासाठी मोठी रक्कम ही द्यावी लागणार आहे , शिर्डीत श्री साईबाबा हयात असताना ते स्वतः गोरगरिबांना, भक्तांना अन्नदान करत, तीच प्रथा आजपर्यंत येथे सुरू आहे , मात्र प्रसादालय बंद झाल्याने ग्रामस्थांनी येथे ही प्रथा सुरू ठेवत अचानक आलेल्या साईभक्तांसाठी तसेच भिकारी, साधू , यांच्यासाठी शिर्डी करांनी एकत्र येऊन भोजनाची काही दिवसांसाठी तरी व्यवस्था करण्याची गरज आहे ,
शिर्डी करांनी व साई भक्तांनी काही दिवसांसाठी तरी येथे अचानक व काही माहीत नसताना दर्शनासाठी आलेल्या भक्तांची सोय व्हावी म्हणून भोजनाची व्यवस्था करावी तसेच संस्थांचे भक्त निवासस्थाने बंद असल्याने खाजगी लॉज, निवासस्थाने कमी रेटमध्ये द्यावीत अशी येथे आलेल्या काही साईभक्तांनी मागणी केली आहे,
Post a Comment