Latest Post

बुलढाणा - 17 मार्च
बुलढाणा के अन्न व औषध प्रशासन विभाग में कार्यरत दो विवादित अधिकारियों को आखिर एक आदेश के तहत निलंबित कर दिया है.इन दोनों अधिकारियों पर अनेक प्रकार के आरोप लगे हुए थे जिसकी जांच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे के निर्देश पर की गई थी जिसमें वे दोषी पाए गए.
    बुलढाणा में बस स्टैंड के सामने प्रशासकीय इमारत में अन्न व औषध प्रशासन विभाग का कार्यालय है जो पिछले कुछ महीनों से जिले में की गई अवैध गुटको की कार्रवाई को लेकर संदेह के घेरे में था.जिले भर में कार्रवाई के बाद जप्त किया गया गुटका इसी कार्यालय में लाकर रखा जाता था किंतु दो बार जप्त गुटका चोरी होने का मामला पुलिस तक जा पहुंचा था.अन्न व प्रशासन मंत्री का पदभार डॉ राजेंद्र शिंगणे को मिलने के बाद उन तक भी अन्न विभाग की कई शिकायतें पहुंची थी तब अचानक डॉ.शिंगणे ने प्रशासकिय इमारत में पहुंचकर कार्यालय का मुआयना किया तब उन्हें भी कुछ गड़बड़ी नजर आई तब डॉ.शिंगणे ने जप्त किए गए गुटके की जांच के निर्देश स्थानिक पुलिस को दिए थे. पुलिस ने जांच कर अंतिम रिपोर्ट वरिष्ठ अधिकारियों को दी जिसके बाद बुलढाणा में कार्यरत सहायक आयुक्त अ.रा.राठोड व अन्न सुरक्षा अधिकारी नितिन नवलकर को अपने कर्तव्य में दोषी पाए जाने के कारण इन दोनों को राज्य आयक्त अन्न व औषध प्रशासन अरुण उन्हाले द्वारा 13 मार्च को
 जारी आदेश के तहत निलंबित कर दिया गया है.निलंबन काल मे दोनों का मुख्यालय मुंबई दिया गया है.

बुलडाणा - 17 मार्च
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथिल सुधाकर पांडुरंग जाधव व राजरत्न लक्ष्मण गवई हे दोघे दि.16 मार्च रोजी मलकापुर वरुन पिंपलगांव देवी मार्ग धामणगाव बढे कडे दुचाकी वरुन येत असतांना रात्रीचे 10 वाजे दरम्यान गावा पासुन 2 कि.मि.आंतरावर जंगली डुकराच्या जबर धडकेत राजरत्न गवई यास जबर मार लागला तर सुधाकर जाधव याचे डोक्यास जबर मार लागल्याने हा गंभिर अवस्थेत प्रा.आ.कें.धा.बढे येथे आणले असता त्या दरम्यान त्याचा मृत्यु झाला शव विच्छेदना साठी बुलढाणा जि.सा.रु.मधे हलविण्यात आले.घटनेची माहीती सकाळी गावभर पसरल्याने मनमिळावु स्वभावाच्या सुधाकर जाधव याच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर,शिर्डी( प्रतिनिधी )- सध्या कोरोनाची सर्वांनीच धास्ती घेतलेली असुन विदेशातुन येणार्या नागरीकांची विशेष तपासणी केली जात आहे असे असाले तरी विदेशातुन एक व्यक्ती ७ मार्चला शिर्डी येथे आला असुन वैद्यकीय अधिकार्यांना या बाबत माहीती असुन देखील डोळेझाक केली जात आहे.पतंतु पोलीस अधिकार्यांच्या कानावर ही बाब जाताच त्यांनी तातडीने संबधीतांचा शोध घेण्याचा आदेश दिला.
         एक नागरीक ७ मार्चला ईराणहुन शिर्डी येथे आला त्याचा मुक्काम सध्या शिर्डी येथे आसुन त्या नागरीकाची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असताना देखील कुणीही तशी तपासणी केली नाही एका जागृक नागरीकाने ही बिनदास न्यूजला कळविली  बिनदास न्यूजच्या प्रातिनिधींनी तातडीने आरोग्य अधिकार्याशी संपर्क साधला  आमच्या प्रतिनिधीला अपेक्षा  होती तातडीच्या कार्यवाहीची परंतु सबंधीत अधीकार्यावर काहीच परिणाम झाला नाही मग आमच्या प्रातिनिधींनी दुसर्या एका अधीकार्याशी संपर्क साधला खरे तर शासनाने या गंभीर विषयाची जबाबदारीच या अधीकार्यावर टाकलेली आहे त्या अधीकार्याला आमच्या प्रतिनीधीनी फोन केला असाता प्रथम फोन उचलण्यास टाळाटाळ केली अधीकारी कामात असतील असे समजुन  आमच्या प्रतिनिधीने पुन्हा फोन केला त्या वेळी अधीकार्याने फोन उचलला आम्हाला वाटले आम्ही जे सांगतो ते ऐकुन तो अधीकारी लगेच कार्यवाही करेल पण झाले उलटेच त्या अधीकार्याने हातच झटकुन टाकले मी स्वतः रजेवर असल्याचे सांगून हजर झाल्यावर पाहु असे सांगितले  कोरोनाची खबरदारी घेण्याच्या शासन स्तरावर वेगवेगळे उपाय योजीले जात असताना संशयीताची माहीती देवुन देखील अधीकारी ईतके सुस्त कसे असा प्रश्न पडतो अखेरचा पर्याय म्हणून आमच्या प्रतिनीधीनी पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे यांना फोन केला त्यांनी ताबडतोब संबधीत नागरीकाला शोधुन काढण्याच्या पोलीस अधीकार्यांना आदेश दिला ज्यांची जबाबदारी आहे त्यांनीच हात झटकले परतु कुठलेही काम बिनि तक्रार करणार्या पोलीसअधीकार्यांनी बिनदास न्यूजने दिलेल्या वृत्ताच्या अधारे शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरच्या धास्तीमुळे अनेक शासकीय शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक  हजेरी बंद करण्यात आली असून स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्यासाठी वापरले जाणाऱ्या  पाँज  मशीनला देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे सध्या कोरोणा व्हायरची अनेकांनी धास्ती घेतली आहे गर्दीच्या ठिकाणावर एकत्र येण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत असे असले तरी शासनाचा पुरवठा विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे धान्य दुकानदारांना धान्य दुकानातून धान्य वाटप करताना पाँज मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घ्यावा लागतो  अंगठा एकदा जुळला नाहीतर पुन्हा पुन्हा अंगठा घ्यावा लागतो ही बाब लक्षात घेऊन शासनाने पाँज मशीनला तात्पुरता पर्याय  उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे तसेच गेल्या काही दिवसापासून पाँज मशीनच्या वाटपात वारंवार अडथळे येत आहेत राज्यातील सर्व पाँज मशीनचे नियंत्रण हे बेंगलोर येथून केले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे पाँज मशीन चे नियंत्रण हे राज्यात विभागवार देण्यात यावे सध्या 4g चा जमाना आहे परंतु पाँज मशीन वर 2g ची  सुविधा असल्यामुळे देखील वाटपात अडचणी येत आहेत तसेच दुकानात असलेली धूळ व पाँज मशीनच्या अतिवापरामुळे मशीन नादुरुस्त झालेल्या आहेत अनेक ठिकाणी मशीनचे काही भाग तुटलेले आहेत तसेच मशीनच्या बॅटरीही खराब झालेले आहेत तरी खराब झालेल्या मशीन त्वरित बदलून द्याव्यात शासनाने पुरवठा विभागात  पारदर्शकता आणण्यासाठी ही पाँज मशिनचा वापर सुरू केला असला तरी मशीन संदर्भात येणारे तांत्रिक दोष अजूनही दूर झालेले नाहीत पुन्हा पुन्हा सर्वर डाऊन झाल्यामुळे धान्य वाटपात अडथळे निर्माण होत आहेत परिणामी कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद होत आहेत मशीन बंद असल्यामुळे कार्डधारक दुकानदारावर आपला राग काढत आहेत ऐन सणासुदीच्या काळात वाटपात अडचणी येत असून वाटप सुरळीत होण्यासाठी पाँज मशीनला येणारे तांत्रिक दोष दूर करावेत अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे संघटनेच्यावतीने दिलेल्या पत्रकावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  कार्याध्यक्ष मीनाताई कळकुंबे, सचिव रज्जाक  पठाण, मुकुंद सोनटक्के, विजय गायकवाड, सुरेश उभेदळ, चंद्रकांत झुरंगे, कैलास बोरावके, विजय दिघे,विश्वासराव जाधव, रावसाहेब भगत,मच्छिंद्र पवार, गणपतराव भांगरे,गजानन खाडे, बाबासाहेब ढाकणे, श्री. वहाडणे माणिक जाधव, बजरंग दरंदले, बाबा कराड आदींच्या सह्या आहेत.

बुलडाणा - 15 मार्च
कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यानंतर शनिवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दगावलेल्या वृद्धाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला नसल्याचे आज 15 मार्च रविवारी प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
        सदर वृद्धाचा नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत ‘निगेटिव्ह’ आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी स्पष्ट केले.शनिवारी सौदी अरेबियातून आलेल्या एका 71 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.सदर वृद्ध हे चिखली तालुक्यातील असून, ते शुक्रवारी सौदी अरेबिया येथून परत आले होते. ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना आधी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे त्यांना शनिवारी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आले होते. सदर वृद्ध व्यक्तीस आधीपासूनच मधुमेह,रक्तदाब व इतर आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती.जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना 14 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजुन 20 मिनटानी त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाचे नमुने हे नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी या रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांना कोरोनाची लागन झाली नव्हती,असे त्या अहवालात नमुद असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.

शिर्डी प्रतिनिधी- शिर्डीत लग्नाचे आमिष दाखवून मूलिवर बलात्कार गुन्हा दाखल अकोले येथील नातेवाइकांची मूलीवर बलात्कार केले असल्याने शिर्डी पोलिस स्टेशनला 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला. शिर्डीतिल आकाश त्रिभुवन हा भंडारदरा येथे कायम जात असतांना अकोले येथे त्याचे नातेवाइक यांच्या कड़े येणे जाने होते त्या दरम्यान आकाश चे आणि पीडीताचे प्रेम झाले प्रेमातुन जबरदस्तीने  शरीर संबंध  केल्याने पिडिताने शिर्डी पोलिस स्टेशन येथे  1)आकाश रमेश त्रिभुवन 2)रमेश वामन त्रिभुवन3) संजय वामन त्रिभुवन 4)मंगेश वामन त्रिभुवन5) राजेंद्र वामन त्रिभुवन यांच्या विरुद्ध आर.पी.सी.376,420,504,34 प्रमाने बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे  शिर्डी पोलिस स्टेशन मधूण दिलेल्या माहीती वरुण असे की अकोले येथील पीड़िता कड़े शिर्डीतिल आकाश याचे  येणे जाने होते ह्या दोघांमध्ये प्रेम संबंध झाले पीड़िताने दिलेल्या फीर्यादीत म्हटल्या "प्रमाने आकाश याने पहील्यानदा  दी. 13/1/2019  रोजी मला शिर्डीला दर्शाना साठी बोलवले आणि  जबरदस्तीने वेगवेगड्या ठिकाणि मी नकार देत असतांना माझ्यावर  बलात्कार केले घडलेली घटना मी आकाशचे चूलते संजय वामन त्रिभुवन यांना सांगीतले त्यावर आकाशचे चूलते यांनी मला धीर दिला व मला सांगितले की हा विषय कोनाला सांगु नको आपण सर्व बसुन यावर चर्चा करू मी आकाशच्या चूलत्यावर विश्वास ठेवला परंतु माझा विश्वास घात करण्यात आला त्यानंतर आकाश ने माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचे सूरूच ठेवले मी वैतागुण दुबईला निघुन गेले तेव्हा आकाश याने मला आपल्याला लग्न करायचे आहे तू लवकर ये असे म्हण्ताच मी परत आले आणि आकाश यास लग्न कधि करतो वीचारले असता त्याने लग्नाचे विषय काडू नको जस चालले आहे तशे चालू दे म्हनत माझ्यावर वारांवार बलात्कार करित राहीला मी यास वैतागुण विषारि औषध पीले मला हॉस्पिटल मध्ये दाखल केले मी बरी झाली त्यानंतरही आकाश ने माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार करण्याचे सूरूच ठेवलेव मला शिर्डी येथे परत लग्नाचे अमिष दाखउन मावशीच्या घरी ठेवले मी आकाश यास वारांवार लग्न कधि करशील असे विचारित राहीली आणि तो काहीच उत्तर देत नसे व माझ्यावर अत्याचार करीतच राहीला तेव्हा मी परत त्याचे चूलते यांना सांगीतले असता त्यान्नि बैठक बोलवीली त्या बैठकित माझे घरचे सर्व उपस्तीथ होते व आकाश चे घरचे सर्व ऊपस्तिथ होते लग्ना साठी बैठक बोलाउन आकाश ने व आकाशच्या घरच्याने लग्नास नकार दिला त्या मुड़े माझी मानसिकता बिघडलि मी परत   विषारि औषध पीले मला ताबरतोब सूपर हॉस्पिटल शिर्डी येथे हलवले मला फसउन लग्न करण्याचे अमिष दाखउन  माझ्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आल्याने मी फीर्याद दिली आहे" असे पीड़िताने फीर्यादित सांगीतले आहे पुढिल तपास पी.एस.आय मिथुन घूगे करित आहेत.

बुलडाणा - 14 मार्च
बुलडाणा जिल्ह्यात विदेशावरून परतलेला कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला होता. दरम्यान संबंधित रुग्णावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू  असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
    सऊदी अरबला धार्मिक विधि करीता बुलडाणा जिल्ह्यातील काही लोक गेले होते जे काल 13 मार्च रोजी परत आले.त्यापैकी  एक 71 वर्षीय रुग्ण आज सकाळी बुलडाणा येथील एका खाजगी रुग्णालयात आला होता.डॉक्टरांनी लक्षणे पाहून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.संबंधित रुग्णाचे सॅम्पल नागपुर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. रुग्णाची तपासणी सुरु होती. मात्र आज 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजुन 20 मिनटानी सदर कोरोनाचा संशयीत रुग्ण दगावला. सदर रुग्ण जेव्हा विदेशातून परतला तेव्हा त्याची प्रकृती अस्वस्थ होती. त्याला ब्लड प्रेशर, शुगर, अस्थमा व इतर आजाराने ते त्रस्त होते. अर्थात कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत दोन दिवसानंतर लैब मधुन रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल.नागरिकांनी भिऊ नये, दक्षता बाळगावी असे आवाहन डॉ.प्रेमचंद पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक,बुलढाणा यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget