बुलडाणा - 14 मार्च
बुलडाणा जिल्ह्यात विदेशावरून परतलेला कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला होता. दरम्यान संबंधित रुग्णावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
सऊदी अरबला धार्मिक विधि करीता बुलडाणा जिल्ह्यातील काही लोक गेले होते जे काल 13 मार्च रोजी परत आले.त्यापैकी एक 71 वर्षीय रुग्ण आज सकाळी बुलडाणा येथील एका खाजगी रुग्णालयात आला होता.डॉक्टरांनी लक्षणे पाहून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.संबंधित रुग्णाचे सॅम्पल नागपुर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. रुग्णाची तपासणी सुरु होती. मात्र आज 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजुन 20 मिनटानी सदर कोरोनाचा संशयीत रुग्ण दगावला. सदर रुग्ण जेव्हा विदेशातून परतला तेव्हा त्याची प्रकृती अस्वस्थ होती. त्याला ब्लड प्रेशर, शुगर, अस्थमा व इतर आजाराने ते त्रस्त होते. अर्थात कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत दोन दिवसानंतर लैब मधुन रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल.नागरिकांनी भिऊ नये, दक्षता बाळगावी असे आवाहन डॉ.प्रेमचंद पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक,बुलढाणा यांनी केले आहे.
Post a Comment