श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरच्या धास्तीमुळे अनेक शासकीय शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली असून स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्यासाठी वापरले जाणाऱ्या पाँज मशीनला देखील पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे सध्या कोरोणा व्हायरची अनेकांनी धास्ती घेतली आहे गर्दीच्या ठिकाणावर एकत्र येण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत असे असले तरी शासनाचा पुरवठा विभाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे धान्य दुकानदारांना धान्य दुकानातून धान्य वाटप करताना पाँज मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घ्यावा लागतो अंगठा एकदा जुळला नाहीतर पुन्हा पुन्हा अंगठा घ्यावा लागतो ही बाब लक्षात घेऊन शासनाने पाँज मशीनला तात्पुरता पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे तसेच गेल्या काही दिवसापासून पाँज मशीनच्या वाटपात वारंवार अडथळे येत आहेत राज्यातील सर्व पाँज मशीनचे नियंत्रण हे बेंगलोर येथून केले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे पाँज मशीन चे नियंत्रण हे राज्यात विभागवार देण्यात यावे सध्या 4g चा जमाना आहे परंतु पाँज मशीन वर 2g ची सुविधा असल्यामुळे देखील वाटपात अडचणी येत आहेत तसेच दुकानात असलेली धूळ व पाँज मशीनच्या अतिवापरामुळे मशीन नादुरुस्त झालेल्या आहेत अनेक ठिकाणी मशीनचे काही भाग तुटलेले आहेत तसेच मशीनच्या बॅटरीही खराब झालेले आहेत तरी खराब झालेल्या मशीन त्वरित बदलून द्याव्यात शासनाने पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी ही पाँज मशिनचा वापर सुरू केला असला तरी मशीन संदर्भात येणारे तांत्रिक दोष अजूनही दूर झालेले नाहीत पुन्हा पुन्हा सर्वर डाऊन झाल्यामुळे धान्य वाटपात अडथळे निर्माण होत आहेत परिणामी कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद होत आहेत मशीन बंद असल्यामुळे कार्डधारक दुकानदारावर आपला राग काढत आहेत ऐन सणासुदीच्या काळात वाटपात अडचणी येत असून वाटप सुरळीत होण्यासाठी पाँज मशीनला येणारे तांत्रिक दोष दूर करावेत अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे संघटनेच्यावतीने दिलेल्या पत्रकावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई कार्याध्यक्ष मीनाताई कळकुंबे, सचिव रज्जाक पठाण, मुकुंद सोनटक्के, विजय गायकवाड, सुरेश उभेदळ, चंद्रकांत झुरंगे, कैलास बोरावके, विजय दिघे,विश्वासराव जाधव, रावसाहेब भगत,मच्छिंद्र पवार, गणपतराव भांगरे,गजानन खाडे, बाबासाहेब ढाकणे, श्री. वहाडणे माणिक जाधव, बजरंग दरंदले, बाबा कराड आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment