Latest Post

बुलढाणा - 10 मार्च
भयावाह कोरोना वायरस के कारण बुलढाणा जिला प्रशासन ने सैलानी बाबा की यात्रा को स्थगित कर दिया गया है जिसके कारण यहां जलनेवाली राज्य की सबसे बडी होली भी नही जलाई गई और ये 112 वर्षों की परंपरा खंडित हो गई है.
बुलढाणा जिले के ग्राम पिंपलगांव सराय के पास हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा की दरगाह है जहां लाखों की तादाद में हर साल भाविक पहूंचकर अपनी अकीदत पेश करते हैं.बता दे कि सैलानी बाबा की यात्रा का आरंभ होलीका दहन से होता है और इस होलिका दहन में केवल राज्य ही नही बल्कि पूरे देश भर से लाखों भाविक सैलानी में पहूंचते हैं.पडोसी देश चीन के बाद भारत मे भी कोरोना वायरस की चपेट में आए कुछ मरीज़ पाए गए.इस जानलेवा बीमारी के फैलने से पहेले ही उसे रोकने के लिए प्रशासन मुस्तैद हो गया तथा बुलढाणा जिलाधिश श्रीमती सुमन चंद्रा रावत ने 5 मार्च को एक आदेश के तहत सैलानी बाबा की यात्रा को स्थगित कर दिया है ताकि सैलानी में भीड इकट्ठा ना होने पाए.भाविकों को सैलानी में पंहुचने से रोकने के लिए सैलानी की तरफ आनेवाले सभी रास्तों पर कडा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है. सैलानी यात्रा में होलिका दहन का सिलसिला पिछले चला आ रहा है.मुजावर परिवार के हातों से होली को अग्नि देकर यात्रा का आरंभ किया जाता किंतु इस वर्ष कोरोना के कारण होली भी नही जलाई गई और 112 वर्षों से जारी होलिका दहन की ये परंपरा इस साल खंडित हो गई है.खास बात तो ये है कि सैलानी की होली में भक्तगण नारियल के साथ अपने शरीर से उतारे हुए कपड़े जलाते है.भक्तो की ये आस्था है कि ऐसा करने से भूत-प्रेत, करनी-कौटाल, जादू-टोना से निजात मिलती है.इस होली में करीब 10 से 12 ट्रक नारियल जलाए जाते है.होलिका दहन में शामिल होने के लिए आए भाविकों को सैलानी में दाखिल नही होने दिया गया जबकि कुछ भक्त 20 से 25 किलोमीटर पैदल चलकर सैलानी तो पहोंचे किंतु होली नही जलने के कारण काफी निराश हो गए थे.

शिर्डी प्रतिनिधि श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने गुरूस्थान मंदिरासमोर पेटविण्यात आलेल्‍या होळीचे पूजन संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.अंजली डोंगरे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सौ.वैशाली ठाकरे, प्र.मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर कर्मचारी व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-नगर जिल्ह्यातील बेलापूर रेल्वे स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मिनीचंद मिना यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महात्या केली. मीना हे राजस्थान मधील अलवर या गावात रहिवासी होते.मिना सध्या ते  रेल्वे स्टेशन समोरील महात्मा फुले हौसिंग सोसायटी मध्ये भाड्याच्या बंगल्यात दोन वर्षापासून एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व 15 वर्षाची मुलगी गावी राहतात.  काल रात्री 1 वाजेपर्यत मीना हे  मित्रासोबत गप्पा मारत होते. सकाळी आठ वाजता मिना यांना उठविण्यासाठी कर्मचारी गेले होते. दरवाजा उघडला  नसल्याने ते परत गेले. ऑफिसला का आले नाही म्हणून पुन्हा दोन कर्मचारी घरी गेले. दरवाजा वाजविला. पण दरवाजा उघडला नाही म्हणून मागील बाजूच्या खिडकीतून पाहिले असता, मिना हे गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसले. तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव अलवर येथे पाठविण्यात आले.  मीना हे चांगले अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही. 

राहुरी : शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश  मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. रविवारी रात्री बिबट्या कात्रड येथील ज्ञानदेव तांबे व रंगनाथ घुगरकर यांच्या शेतातील विहिरीत पडला़ ३० फूट खोलीच्या विहिरीत बिबट्या पडल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन बिबट्यासाठी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पाणी नसल्याने बिबट्याला मुका मार लागला़ बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती उपसरपंच शरद दांगट यांनी वनविभागाला दिली़ वनविभागाचे कर्मचारी गोरक्षनाथा लोंढे, महादू पोकळे, लक्ष्मण किनकर, ताराचंद गायकवाड यांनी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पडलेला बिबट्याला मुका मार लागल्याने तो बेशुध्द पडला होता़ ग्रामस्थांनी बिबट्याला शुध्दीवर आणण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले़ त्यानंतर बिबट्या शुध्दीवर आला़ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पोलीस पाटील आदिनाथ घुगरकर, रायभान घुगरकर, रावसाहेब तांबे, रंगनाथ घुगरकर, धनंजय पटारे, शिवाजी तांबे, माधव घुगरकर आदींनी सहकार्य केले़ सर्वत्र शांतता झाल्यानंतर विहिरीत टाकलेल्या शिडीवर चढून बिबट्यावर आला़ विहिरीवर आलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला़ बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी कात्रड येथे गर्दी केली होती़

अहमदनगर : खंडकरी शेतक-याचे येथील कूळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणा-या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (९ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता अटक केली. सुनील बाबूराव फापाळे (वय ४८) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.फापाळे हा जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत अव्वल कारकून म्हणून कार्यरत आहे. श्रीरामपूर येथील खंडकरी शेतकºयाचे प्रकरण कायदेशीर मान्यतेसाठी कूळ कायदा शाखेत वर्ग झाले होते. या प्रकरणाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी फापाळे यांनी सदर शेतकºयाकडे लाच मागितली होती. याबाबत शेतक-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचा-यांनी सापळा लावून लाच मागणा-या लिपिकास पकडले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) आम्ही तुम्हांला प्रत्येक वेळी मदत करू. इथं तुमचाच झेंडा वर राहू द्या. पूर्वी आमची हीच भूमिका होती आताही तिच आहे आणि पुढेही तीच राहील, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करण ससाणे आणि श्रीरामपूरकर यांचा संदर्भ देत केले. स्व. जयंतराव ससाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. सदाशिव लोखंडे, आ. लहु कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकरी भारत जगधने उक्कलगाव, महिला क्षेत्रात कार्य करणार्‍या अंबिका पतसंस्थेच्या संस्थापिका सौ. सुशिलाताई नवले, उद्योग क्षेत्रात श्री इम्पेक्सचे अभिजीत कुदळे व राजेंद्र भोंगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल डॉ. कु. गौरी शेळके व डॉ. कु. कल्याणी जगरवाल यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. करण ससाणे यांना उद्देशून आपल्या भाषणात ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, तुमचा संसार तुम्हीच करा. आम्हांला श्रीरामपुरात येऊन राज्य करायचं नाही. मात्र आम्ही तुम्हांला प्रत्येक वेळी मदत करू. इथं तुमचाच झेंडा वर राहू द्या. पूर्वी आमची हीच भूमिका होती आताही तिच आहे आणि पुढेही तीच राहील. पाहुण्यांनी मदत करायची असते संसारामध्ये हस्तक्षेप करायचा नसतो. स्व. जयंतराव ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनात घर केले होते. काम करण्याचे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्ये होते. ते गेल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र उपनगराध्यक्ष करण ससाणे हे सर्वांना बरोबर घेऊन संघटना टिकून ठेवण्याचे काम करत असून तुमचा प्रभाव करणच्या नेतृत्वाने पुढे जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तर केलेले काम लपवून न ठेवता दुसर्‍याला सांगण्याचे मोठेपण स्व. ससाणे यांच्यात होते. वेळप्रसंगी लोणी व संगमनेरकरांना सांभाळायचे कामही त्यांनी केल्याचा उल्लेखही ना. थोरात यांनी केला. खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, स्व. जयंतराव ससाणे यांची काम करण्याची पध्दत आदर्शवत होती. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी श्रीरामपूर शहर व तालुक्याचा विकास साधला. आ.डॉ. सुधीर तांबे म्हणाले, स्व. जयंतराव ससाणे यांनी अथक परिश्रमातून श्रीरामपूरचा विकास साधला. सामान्यांविषयी त्यांना तळमळ होती. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी मोठा विकास केला. धडाडीचा व कल्पकता असलेला नेता आपल्यातून निघून गेला हे आपले दुर्देव आहे.आ. लहु कानडे म्हणाले, कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्व पदे स्व. जयंतराव ससाणे यांनी भूषविली. शहराचा चेहरामोहरा बदलला. तर स्व. ससाणे यांनी आपल्या कर्तबगारीने नाव सर्वदूर पसरविले. सचिन गुजर म्हणाले, चिरकाल लोकांच्या मनात राहिल असे काम व्हावे या संकल्पनेतून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. द्वेषाच्या, अडवाअडवीच्या राजकारणापलिकडे चांगले काम व्हावे, ही संकल्पना स्व. ससाणे यांनी साकारली. दूरदृष्टी, प्रचंड सहनशिलता असलेले ते व्यक्तिमत्व होते. करण ससाणे म्हणाले, प्रामाणिक हेतू ठेवून काम केले पाहिजे, या स्व. जयंतराव ससाणे यांच्या शिकवणीप्रमाणे आमचे प्रामाणिक काम सुरु आहे. श्रीरामपूरच्या जडणघडणीत ज्यांनी योगदान दिले त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, सौ. दिपालीताई ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय छल्लारे, ज्येष्ठ नेते जी.के. बकाल पाटील, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, माजी सभापती इंद्रभान थोरात, पं.स. सदस्य अरुण पाटील नाईक, डॉ. वंदनाताई मुरकुटे, अशिष धनवटे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, नगरसेवक मुजफ्फर शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सुभाष तोरणे यांनी मानले.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-जनसेवा या नावाप्रमाणेच बेलापूर गावात सेवा देणार्या जनसेवा पतसंस्थेने नागरीकांना मोफत झुणका भाकर केंद्र त्याच बरोबर पाणपोई सुरु करुन इतरा समोर एक वेगळा आदर्श ठेवला असल्याचे मत सेवा निवृत्त शिक्षक लक्ष्मणराव डोखे यांनी व्यक्त केले जनसेवा पतसंस्थेच्या वतीने बस स्थानक परिसरात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पाणपोई सुरु करण्यात आली त्या पाणपोईचे उद्घाटन डोखे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते या वेळी बोलताना पतसंस्थेचे चेअरमन सुवालाल लुक्कड म्हणाले की बस स्थानक परिसरात प्रवासी विद्यार्थी विद्यार्थीनीची पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता पतसंस्थेचे पाणपोई सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन सर्वांच्या सहकार्याने पतसंस्थेचे कामकाजही प्रगती पथावर आहे असेही ते म्हणाले  या वेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड हिंद सेवा मंडळाचे संजय जोशी व्हा .चेअरमन सुभाष राठी प्रकाश कोठारी प्रविण लुंक्कड अमात लुंक्कड योगेश कोठारी दिपक वैष्णव सचिन कोठारी बन्सी तागड विजय कटारीया बस डेपो व्यवस्थापक बागुल कचरु वाबळे पतसंस्थेचे सेवकवृंद उपस्थित  होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget