राहुरी : शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. रविवारी रात्री बिबट्या कात्रड येथील ज्ञानदेव तांबे व रंगनाथ घुगरकर यांच्या शेतातील विहिरीत पडला़ ३० फूट खोलीच्या विहिरीत बिबट्या पडल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन बिबट्यासाठी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पाणी नसल्याने बिबट्याला मुका मार लागला़ बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती उपसरपंच शरद दांगट यांनी वनविभागाला दिली़ वनविभागाचे कर्मचारी गोरक्षनाथा लोंढे, महादू पोकळे, लक्ष्मण किनकर, ताराचंद गायकवाड यांनी विहिरीवर पिंजरा लावला़ विहिरीत पडलेला बिबट्याला मुका मार लागल्याने तो बेशुध्द पडला होता़ ग्रामस्थांनी बिबट्याला शुध्दीवर आणण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकले़ त्यानंतर बिबट्या शुध्दीवर आला़ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पोलीस पाटील आदिनाथ घुगरकर, रायभान घुगरकर, रावसाहेब तांबे, रंगनाथ घुगरकर, धनंजय पटारे, शिवाजी तांबे, माधव घुगरकर आदींनी सहकार्य केले़ सर्वत्र शांतता झाल्यानंतर विहिरीत टाकलेल्या शिडीवर चढून बिबट्यावर आला़ विहिरीवर आलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला़ बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी कात्रड येथे गर्दी केली होती़
Post a Comment