Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन उन्नती अभियानांतर्गत ग्रामिण भागातील महीला बचत गटांना एकत्र आणून ग्राम संघाच्या माध्यमातून महीला सबलीकरण व सक्षमीकरण करण्याचे काम सुरु असुन महीलांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन संध्या विरखडे यांनी केले आहे                                       जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत महीला बचत गटांना ग्राम संघाची स्थापना कार्य या बाबत माहीती देण्याकरीता वर्धा येथील संध्या विरखडे वर्षा नगराळे शुभांगी उके या तीन वरिष्ठ वर्धिनी बेलापूरात दाखल झाल्या होत्या या वर्धिनींनी पाच दिवस महीला बचत गटांच्या महीलांचे प्रशिक्षण घेतले या प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले तर प्रमुख पाहुणे म्हणून  जेष्ठ पत्रकार देविदास देसाई  पाणी पुरवठा समितीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड सरपंच राधाताई  बोंबले अतीष देसर्डा उपस्थित होते या वेळी
बोलताना बाजार समितीचे संचालक सुधीर  नवले म्हणाले की बेलापूर व परिसरात जवळपास तीस महीला बचत गट असुन या सर्व बचत गटांना एकत्र आणुन  जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांना निमंत्रीत करुन विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाईल वर्धा येथुन आलेल्या वर्धीनींनी पाच दिवस बेलापूरातील महीलांना प्रशिक्षण दिले आहे बेलापूरातील बचत गटांनी ग्रामसंंघाची स्थापना केलुली असुन त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल या वेळी पत्रकार देविदास देसाई  मनोज श्रीगोड  वर्षा नगराळे शुभांगी उके सरपंच राधाताई बोंबले आदिंनी मनोगत व्यक्त केलेया वेळी ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली असुन ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी रुपाली देसर्डा सचिव पदी योगीता अमोलीक खजिनदार पदी निलीमा कुमावत तर सेक्रेटरी म्हणून सुजाता बारगळ यांची निवड करण्यात आली या वेळी संगीता देसाई  आशा गायकवाड  सुशिला तेलोरे लता दहीवाळ ईंदु जाधव कल्पना शिंदे माया पवार परविन सय्यद रंजना कारले प्रतिभा देसाई  आदिसह विविध महीला बचत गटाच्या महीला उपस्थित होत्या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली देसर्डा यांनी केले तर सूत्रसंचलन सुजाता बारगळ यांनी केले निलीमा कुमावत यांनी आभार मानले

शिर्डी/राहाता (प्रतिनिधी)
 -- रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय पातळीवर आयोजित वक्तृत्व  स्पर्धेत ३२ शाळांतील संघातून राहाता येथील शारदा कन्या विद्या मंदिर विद्यालयातील कुमारी हर्षिता जयंत गायकवाड हिने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावित अजिंक्य ठरली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान प्रकल्पाअंतर्गत नाशिक, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गटपातळीवरुन विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांला या विभागीय स्पर्धेत पात्र ठरविण्यात आले होते. संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान,  कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, भारताची चांद्रयान-२ मोहीम, माझा आवडता शास्त्रज्ञ, संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान या विषयावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेत सहभागी वक्त्यांनी सभागृह गाजवले.
हर्षिता गायकवाड हिने अतिशय ओघवत्या शैलीत तामिळनाडूचा गरीब होतकरू विद्यार्थी कलाम ते थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, राष्ट्रपती, भारतरत्न ए.पी.जे. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना प्रभावी आशय, अचूक शब्दफेक, इंग्रजी-हिंदीचा वापर, योग्य देहबोली, आवाजातील चढ- उतार, कोटेशन्स यामुळे सभागृह जिंकले. उपस्थित सर्वच स्पर्धक, शिक्षक, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून हर्षिताच्या भाषणाला भरभरून दाद दिली. यामुळे राहात्याचे  शारदा संकुल पहिल्यांदाच विभागीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेत अजिंक्य ठरले आहे. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतही हर्षिताने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हर्षिता ही सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. गायकवाड सर व सौ. डी.डी. गायकवाड यांची नात तर  ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. जयंत गायकवाड सर यांची कन्या असून तीने यापूर्वी देखील अनेक स्पर्धेत सुयश संपादन केले आहे.
याकामी हर्षिताला वर्गशिक्षिका तथा विज्ञान शिक्षका कमल साबळे, सुनंदा जाधव, शैला देठे, प्रमोद तोरणे, गमे बि.डी. विजय जेजूरकर, पर्वत उर्हे, सरीफा शेख, शाम जगताप सर आदींनी मार्गदर्शन केले.
हर्षिताच्या यशाबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, शिवप्रहारचे सचिन चौगुले, शारदा संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे, मुख्याध्यापिका जयश्री ननावरे, प्राचार्य अरविंद काकडे, प्राचार्य राजेंद्र बर्डे, रयत सेवक संघाचे रामभाऊ गमे, पर्यवेक्षक बाबासाहेब नाईकवाडी,  भारत सावंत, एस.एस. तेलोरे, फादर गिल्बर्ट डेनीस, एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जीवडे, कोपरगाव नगरपरिषदेचे रामा जाधव,  पीपल्स रिपब्लिकनचे नेते संपतराव भारूड, संतोष मोकळ आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- आत्महत्या करण्यास निघालेल्या महीलेचे प्राण एका जागृक पत्रकारामुळे वाचले असुन ती महीला श्रीरामपूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहे          या बाबत सविस्तर  हकीकत अशी की उक्कलगाव आठवाडी येथील एक २२ वर्षीय महीला रागारागाने घरातुन निघुन प्रवरा पुलावर आली या पुलावरुन तीने मी औषध घेत असुन प्रवरा नदीच्या पुलावर उभी असल्याचे सांगून कसले तरी विषारी औषध सेवन केले असा फोन नवर्याला केला  अन लगेच पुलावरुन प्रवरा नदीपात्रात उडी घेतली रविवार बेलापूरचा आठवडे बाजार असल्यामुळे प्रवरा पुलावर गर्दी होती नागरीकांनी आरडा ओरड करताच अनेक जण गोळा झाले प्रवरा नदीवरील वहातुक ठप्प झाली ही बाब पत्रकार दिलीप दायमा यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी धावले गावातील काही सुजाण नागरीकांनी तिला पाण्याबाहेर काढले तो पर्यंत बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे बाळासाहेब गुंजाळ  निखील तमनर पोपट भोईटे तातडीने घटनास्थळी धावले त्या महीलेला किरण बारहाते दिपक महाडीक यांनी बेशुध्दावस्थेत बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर  अनेक मोबाईल बहाद्दरांनी शुंटीग फोटो काढण्यास सुरुवात केली परंतु मदतीस कुणीही पुढे येईना ही बाब पत्रकार दिलीप दायमा यांच्या लक्षात येताच त्यांनी आपली स्वतःची रिक्षा सुरु केली त्यामहीलेला रिक्षात टाकले त्या महीलेच्या पतीला रिक्षात बसविले  हवालदार लोटके व त्यांंच्या साहकार्यांनी पुलावरील गर्दी बाजुला करुन रिक्षाला वाट मोकळी करुन दिली दायमा यांनी कसलीही पर्वा न करता रिक्षा वेगाने चालवुन त्या महीलेला दवाखान्यात दाखल केले वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महीलेचा जिव वाचला पत्रकार दिलीप दायमा  व बेलापूर पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे काही वेळातच ती  महीला शुध्दीवर आली  दायमांनी दाखविलेल्या तत्परते बद्दल अनेकांनी  त्यांचे अभिनंदन केले आहे

जामखेड - येथे गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोन आरोपींना ६ तासात अटक करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. विकास बाबासाहेब थोरात, विशाल मगर असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, विकास थोरात व विशाल मगर (दोघे रा.सावरगाव, ता.जामखेड) यांनी जामखेड येथे बीड रस्त्यावर बाळू दादा डोके (रा.भुतवडा ता.जामखेड) याला १५ दिवसांपूर्वी त्यांच्या भावाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरून थोरात याने बाळू डोके याला पिस्टलमधून गोळी मारुन ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद डोके याने जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती, त्याची दखल घेत मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून डोनगाव परिसरातून आरोपी थोरात व मगर याना अवघ्या ६ तासात पोलिसांनी जेरबंद केले. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे पो.नि. प्रभाकर पाटील, सपोनि अवतारसिंग चव्हाण, पोना रुदय घोडके, पोकाँ सागर जंगम आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेत शनिवारी अखेर CAA ला विरोध करणारा ठराव एकमताने संमत करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या नगरपालिकेत विरोधाचा ठराव मंजूर झाल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनीही दिलेला शब्द पाळला आहे.  गत आठवड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य असुनही CAA ला विरोध करणारा ठराव सदस्यांनी फेटाळला होता. त्यामुळे ठरावाला एकप्रकारचे समर्थन केल्याची टीका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर झाली होती. मात्र त्या ठरावाचा व नगरपालिकेचा काही संबंध नाही. तसेच ऐनवेळी ठराव मांडल्याने तो ठराव नगरसेवकांनी फेटाळला होता. त्यानंतरही टीका झाल्याने यावेळी हा विषय नगराध्यक्षा आदिक यांनी सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर घेतला. त्यानंतर याच विषयासाठी शनिवारी विशेष सभा झाली. ठरावावर चर्चा झाल्यानंतर हा ठराव सभेत मंजूर झाला.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )--श्रीरामपूर तहसील कार्यालयाची जुनी परंतु आजही भक्कम अवस्थेत उभ्या असलेल्या ईमारतीचा वापर कैद्या करीता करण्यात यावी अशी मागणी पुढे येवु लागली असुन कमी खर्चात प्रशासनास भक्कम असा तुरुंग उभा करता येईल त्या करीता प्रशासनाने योग्य पावले उचलावीत                           श्रीरामपूर  तहसील कार्यालयास नविन ईमारत झाल्यामुळे श्रीरामपूर तहसील कार्यालयाचा तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय नविन ईमारतीत स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे जुन्या दगडी बांधकाम असलेल्या ईमारत आज खंडर बनली आहे भविष्यात श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कच्च्या कैद्यासाठी तुरुंग बनविण्यात यावा     कमी खर्चात भक्कम असा तुरुंग या ठिकाणी  उभा राहु शकतो  असे अनेकांचे मत आहे             
 श्रीरामपूर     तहसील कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जुन्या ईमारतीतुन नविन ईमारतीत स्थलांतरीत झाल्यामुळे जुनी ईमारत मोकळी पडलेली आहे या ईमारतीत आता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन व कैद्यासाठी तुरुंग आहे या ठिकाणी कैद्यासाठी चार खोल्या व महीला कैद्यासाठी एक खोली असुन श्रीरामपूर शहर व तालुक्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या ठिकाणी भक्कम असा तुरुंग उभारणे गरजेचे आहे काही वर्षापुर्वी याच तुरुंगातुन कैदी पळाल्याच्या घटना घडलेल्या होत्या त्यामुळे संबधीत अधीकार्यांनी तात्पुरती उपाय योजना केली होती परंतु आज या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे अन वाढती गुन्हेगारी लक्षात घेवुन कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस अशी उपाय योजना करणे गरजेचे आहे आजही प्रत्येक बराकीत क्षमतेपेक्षा जादा कैदी भरलेले आहेत एखादी घटना घडल्यास कैद्याची संख्या वाढल्यास कैदी ईतर ठिकाणी  स्थलांतरीत करावे लागतात त्यात प्रशासनाचा वेळ व पैसा खर्च  होतो त्यामुळे श्रीरामपूर तहसील कार्यालयाची दगडी बांधकांम असलेली ईमारत मजबुत स्थितीत आसुन या ईमारतीचा वापर कैद्यासाठी झाला तर प्रशासनाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल

भैरवनाथ नगर-प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील गोन्धवनी भैरवनाथ नगर परिसरात काल रात्री स्व.बापूसाहेब गाडे यांच्या वस्तीवर  येउन गावरान गाय व दोन दिवसाच्या कालवडीवर हल्ला केला.वासराला बिबट्याचे दात लागल्याच्या खुणा पड़लेल्या आहेत. यावेळी धनंजय मधू कर गाडे यांन्नी प्रत्यक्ष दर्शनी बिबट्यास  बघीतले आहे.यावेळी धनंजय गाडे यांनी फटाके फोडताच  बिबट्याने तेथून धुम ठोकली.           दरम्यान श्री.प्रणय गाडे यांनी लागलीच भ्रमनध्वनी वरुन वनविभाग आधिकारी श्री.देवखिळे अ.नगर  यांना ही माहिती दिली आहे. सन 2005 साली याच वस्तीवर एक बिबट्या जेरबंद झाला आहे . बिबट्याच्या धुमाकुळीमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भितिचे वातावरन निर्मान झाले आहे.वनविभागाने संबंधीत ठिकानी पिंजरे लावावेत आशी मागणी होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget