बेलापूर (प्रतिनिधी )-- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवन उन्नती अभियानांतर्गत ग्रामिण भागातील महीला बचत गटांना एकत्र आणून ग्राम संघाच्या माध्यमातून महीला सबलीकरण व सक्षमीकरण करण्याचे काम सुरु असुन महीलांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन संध्या विरखडे यांनी केले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत महीला बचत गटांना ग्राम संघाची स्थापना कार्य या बाबत माहीती देण्याकरीता वर्धा येथील संध्या विरखडे वर्षा नगराळे शुभांगी उके या तीन वरिष्ठ वर्धिनी बेलापूरात दाखल झाल्या होत्या या वर्धिनींनी पाच दिवस महीला बचत गटांच्या महीलांचे प्रशिक्षण घेतले या प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई पाणी पुरवठा समितीचे उपाध्यक्ष मनोज श्रीगोड सरपंच राधाताई बोंबले अतीष देसर्डा उपस्थित होते या वेळी
बोलताना बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की बेलापूर व परिसरात जवळपास तीस महीला बचत गट असुन या सर्व बचत गटांना एकत्र आणुन जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांना निमंत्रीत करुन विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाईल वर्धा येथुन आलेल्या वर्धीनींनी पाच दिवस बेलापूरातील महीलांना प्रशिक्षण दिले आहे बेलापूरातील बचत गटांनी ग्रामसंंघाची स्थापना केलुली असुन त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल या वेळी पत्रकार देविदास देसाई मनोज श्रीगोड वर्षा नगराळे शुभांगी उके सरपंच राधाताई बोंबले आदिंनी मनोगत व्यक्त केलेया वेळी ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली असुन ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी रुपाली देसर्डा सचिव पदी योगीता अमोलीक खजिनदार पदी निलीमा कुमावत तर सेक्रेटरी म्हणून सुजाता बारगळ यांची निवड करण्यात आली या वेळी संगीता देसाई आशा गायकवाड सुशिला तेलोरे लता दहीवाळ ईंदु जाधव कल्पना शिंदे माया पवार परविन सय्यद रंजना कारले प्रतिभा देसाई आदिसह विविध महीला बचत गटाच्या महीला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली देसर्डा यांनी केले तर सूत्रसंचलन सुजाता बारगळ यांनी केले निलीमा कुमावत यांनी आभार मानले
Post a Comment