राहात्याची हर्षिता जयंत गायकवाड वक्तृत्व स्पर्धेत प्रथम.. महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांसह मान्यवरांनी केले अभिनंदन..

शिर्डी/राहाता (प्रतिनिधी)
 -- रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय पातळीवर आयोजित वक्तृत्व  स्पर्धेत ३२ शाळांतील संघातून राहाता येथील शारदा कन्या विद्या मंदिर विद्यालयातील कुमारी हर्षिता जयंत गायकवाड हिने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावित अजिंक्य ठरली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान प्रकल्पाअंतर्गत नाशिक, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून गटपातळीवरुन विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांला या विभागीय स्पर्धेत पात्र ठरविण्यात आले होते. संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान,  कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान, भारताची चांद्रयान-२ मोहीम, माझा आवडता शास्त्रज्ञ, संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान या विषयावर सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धेत सहभागी वक्त्यांनी सभागृह गाजवले.
हर्षिता गायकवाड हिने अतिशय ओघवत्या शैलीत तामिळनाडूचा गरीब होतकरू विद्यार्थी कलाम ते थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, राष्ट्रपती, भारतरत्न ए.पी.जे. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना प्रभावी आशय, अचूक शब्दफेक, इंग्रजी-हिंदीचा वापर, योग्य देहबोली, आवाजातील चढ- उतार, कोटेशन्स यामुळे सभागृह जिंकले. उपस्थित सर्वच स्पर्धक, शिक्षक, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून हर्षिताच्या भाषणाला भरभरून दाद दिली. यामुळे राहात्याचे  शारदा संकुल पहिल्यांदाच विभागीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेत अजिंक्य ठरले आहे. यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतही हर्षिताने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हर्षिता ही सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. गायकवाड सर व सौ. डी.डी. गायकवाड यांची नात तर  ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. जयंत गायकवाड सर यांची कन्या असून तीने यापूर्वी देखील अनेक स्पर्धेत सुयश संपादन केले आहे.
याकामी हर्षिताला वर्गशिक्षिका तथा विज्ञान शिक्षका कमल साबळे, सुनंदा जाधव, शैला देठे, प्रमोद तोरणे, गमे बि.डी. विजय जेजूरकर, पर्वत उर्हे, सरीफा शेख, शाम जगताप सर आदींनी मार्गदर्शन केले.
हर्षिताच्या यशाबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, रावसाहेब बोठे, श्रीकांत मापारी, शिवप्रहारचे सचिन चौगुले, शारदा संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे, मुख्याध्यापिका जयश्री ननावरे, प्राचार्य अरविंद काकडे, प्राचार्य राजेंद्र बर्डे, रयत सेवक संघाचे रामभाऊ गमे, पर्यवेक्षक बाबासाहेब नाईकवाडी,  भारत सावंत, एस.एस. तेलोरे, फादर गिल्बर्ट डेनीस, एम.सी.ई.डी.चे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जीवडे, कोपरगाव नगरपरिषदेचे रामा जाधव,  पीपल्स रिपब्लिकनचे नेते संपतराव भारूड, संतोष मोकळ आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget