बेलापूर ( प्रतिनिधी )- आत्महत्या करण्यास निघालेल्या महीलेचे प्राण एका जागृक पत्रकारामुळे वाचले असुन ती महीला श्रीरामपूर येथील दवाखान्यात उपचार घेत आहे या बाबत सविस्तर हकीकत अशी की उक्कलगाव आठवाडी येथील एक २२ वर्षीय महीला रागारागाने घरातुन निघुन प्रवरा पुलावर आली या पुलावरुन तीने मी औषध घेत असुन प्रवरा नदीच्या पुलावर उभी असल्याचे सांगून कसले तरी विषारी औषध सेवन केले असा फोन नवर्याला केला अन लगेच पुलावरुन प्रवरा नदीपात्रात उडी घेतली रविवार बेलापूरचा आठवडे बाजार असल्यामुळे प्रवरा पुलावर गर्दी होती नागरीकांनी आरडा ओरड करताच अनेक जण गोळा झाले प्रवरा नदीवरील वहातुक ठप्प झाली ही बाब पत्रकार दिलीप दायमा यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी धावले गावातील काही सुजाण नागरीकांनी तिला पाण्याबाहेर काढले तो पर्यंत बेलापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे बाळासाहेब गुंजाळ निखील तमनर पोपट भोईटे तातडीने घटनास्थळी धावले त्या महीलेला किरण बारहाते दिपक महाडीक यांनी बेशुध्दावस्थेत बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर अनेक मोबाईल बहाद्दरांनी शुंटीग फोटो काढण्यास सुरुवात केली परंतु मदतीस कुणीही पुढे येईना ही बाब पत्रकार दिलीप दायमा यांच्या लक्षात येताच त्यांनी आपली स्वतःची रिक्षा सुरु केली त्यामहीलेला रिक्षात टाकले त्या महीलेच्या पतीला रिक्षात बसविले हवालदार लोटके व त्यांंच्या साहकार्यांनी पुलावरील गर्दी बाजुला करुन रिक्षाला वाट मोकळी करुन दिली दायमा यांनी कसलीही पर्वा न करता रिक्षा वेगाने चालवुन त्या महीलेला दवाखान्यात दाखल केले वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महीलेचा जिव वाचला पत्रकार दिलीप दायमा व बेलापूर पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे काही वेळातच ती महीला शुध्दीवर आली दायमांनी दाखविलेल्या तत्परते बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
Post a Comment